Malayalam TV actor Dr Priya dies of sudden cardiac arrest: प्रसिद्ध मल्याळम टेलिव्हिजन अभिनेत्री डॉ. प्रिया हिचे कार्डियाक अरेस्टने निधन झाले आहे. प्रिया ही आठ महिन्यांची गर्भवती होती, सुदैवाने डॉक्टरांना बाळाला वाचवण्यात यश आले आहे. या धक्कादायक घटनेननंतर गर्भवती महिलांना हृदयाशी संबंधित जोखीम काय आहेत याबद्दल जाणून घेणे हे अत्यंत आवश्यक आहे. पारंपारिकपणे, स्त्रियांच्या हार्मोन्समुळे हृदयाचे रक्षण होते असे मानले जात होते परंतु आता तरुण स्त्रियांना ताणतणावांचा सामना करावा लागत असल्याने हृदयविकारांचा धोका तरुण वयोगटातील विशेषतः वर्किंग वुमन गटात वाढत आहे. अशात गर्भधारणेदरम्यान हृदय आणि रक्ताभिसरण प्रणालीवर अतिरिक्त दबाव येत असल्याने या कालावधीत काळजी घेणे खूप गरजेचे असते.

डॉ. राजीव भागवत, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मुंबई यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, “मला खात्री आहे की सर्व स्त्रीरोग तज्ज्ञ हा सल्ला देतात. गर्भधारणेच्या कालावधीत इकोकार्डियोग्राम करणे आवश्यक आहे. हृदयाचे पंपिंग कार्य योग्य आहे का? हृदयाचे वाल्व सामान्य स्थितीत आहेत का? आणि आई व बाळाच्या जीवाला धोका निर्माण करणारी कोणतीही पूर्वस्थिती आहे का? या तिन्ही प्रश्नांची उत्तरे शोधायला हवी.

hemal ingle bridal to be party
Video : ‘नवरा माझा नवसाचा २’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, मैत्रिणींसह केली Bride To Be पार्टी
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक

गरोदर महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका कशामुळे वाढतो?

१) हृदयविकाराचा झटका किंवा तत्सम स्थिती उद्भवण्यामागे एम्बोलिझम हे देखील एक कारण असू शकते. याचा अर्थ जेव्हा पायाच्या नसा किंवा कोठेही रक्तप्रवाहात गुठळी तयार होऊन हृदयाच्या धमनीमध्ये अडथळा येतो व हृदय बंद पडण्याची शक्यता उद्भवते.

२) अमेरिकन हार्ट असोसिएशन जर्नलनुसार, गर्भवती महिलांमध्ये इतर जोखीम घटक असू शकतात. क्रॉनिक हायपरटेन्शन, गेस्टेशनल हायपरटेन्शन, प्रीक्लॅम्पसिया हे सर्वात धोकादायक घटक आहेत. प्रीक्लॅम्पसिया ही अशी स्थिती आहे जी सामान्यत: गर्भधारणेच्या २० आठवड्यांनंतर उद्भवते, यामध्ये रक्तदाब अचानक वाढतो. तिसऱ्या तिमाहीत मूत्रात प्रथिने वाढल्याने सुद्धा हा धोका वाढू शकतो.

युरोपियन सोसायटी ऑफ कार्डियोलॉजीच्या मते, अभ्यासातून असे दिसून आले आहे की प्री-एक्लॅम्पसिया असलेल्या स्त्रियांना प्री-एक्लॅम्पसिया नसलेल्या स्त्रियांपेक्षा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता चार पट असते. केवळ गर्भारपणातच नव्हे तर प्रसूतीच्या १० वर्षांच्या नंतरही स्ट्रोक येण्याची शक्यता तिप्पट असते.

३) अन्य एक कारण म्हणजे कार्डिओमायोपॅथी ही हृदयाच्या स्नायूची एक स्थिती आहे जिथे हृदयाला शरीराच्या उर्वरित भागात रक्त पंप करणे कठीण होते. हे सहसा अनुवांशिक असते आणि यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होऊन पूर्णपणे बंद होण्याचा सुद्धा धोका असतो.

४) याशिवाय कधीकधी दीर्घकालीन उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, मधुमेह आणि थायरॉईडमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. शरीरातील क्षार, विशेषत: पोटॅशियम आणि मॅग्नेशियम कमी झाल्यावर शरीर डिहायड्रेट व्हायला होते आणि परिणामी हृदयविकाराचा झटका येऊ शकतो /

गरोदर महिलांना हृदयविकारासारख्या आपत्तीतुन वाचवण्यासाठी काय करायला हवे?

गर्भारपणात हृदयविकाराच्या उपचारांसाठी, रुग्णालयांमध्ये एक खास टीम असायला हवी. यामध्ये गर्भधारणेदरम्यान होणारे शारीरिक बदल याविषयी संपूर्ण माहिती असणारे व बेशुद्ध अवस्था, कोमात जाण्यासारखी स्थिती असल्यास उपचार करू शकणारे तज्ज्ञ असायला हवेत.

हे ही वाचा<< १० हजार रुपये वाचवायचे तर चहाबरोबर गोड बिस्कीट खाणं आजच सोडा; ऍसिडिटीचा दातावर काय परिणाम होतो?

डॉ वीरेंद्र सरवाल, डायरेक्टर, कार्डिओव्हस्कुलर आणि थोरॅसिक सर्जरी विभाग, IVY हॉस्पिटल, मोहाली यांनी सांगितले की, जर आईच्या प्रकृतीत अचानक तीव्र बिघाड जाणवला तर हिस्टेरोटॉमी, ज्याला अनेकदा पेरीमॉर्टेम सिझेरियन असे म्हणतात या प्रक्रियेचा आधार घेतला जातो. ही एक अशी प्रक्रिया आहे जी गर्भधारणेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत वापरली जाण्याचे प्रमाण अधिक आहे. जर हृदयविकार किंवा अन्य कोणत्या कारणाने आईचे हृदय बंद पडणे किंवा शुद्ध हरपणे अशी स्थिती घडते तेव्हा प्रथम तिला CPR दिला जातो. यानंतरही प्रतिसाद देण्यास आई सक्षम नसेल तर तात्काळ हिस्टेरोटॉमी आवश्यक असू शकते. प्राप्त माहितीनुसार, प्रत्येक ३६,००० गर्भधारणेपैकी एका आईला अशा प्रकारच्या घटनेला तोंड द्यावे लागत आहे.