Walking Benefits: आजकालच्या व्यग्र जीवनशैलीमध्ये कामापलीकडे स्वतःच्या आरोग्यासाठी काही वेळ काढणे अनेकांना शक्य होत नाही. ज्यांना जिम किंवा योगा क्लासेसमध्ये जाता येत नाही त्यांच्यासाठी, ६-६-६ चालण्याचा नियम एक सरळ उपाय आहे. हा सर्वांत सोपा आणि सहज शक्य होणारा उपाय तुमच्या दिनचर्येमध्ये ६ या अंकाचा समावेश करतो. म्हणूनच हा अंक आता व्यग्र जीवनशैलीशी जुळवून घेणाऱ्या लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे.

६-६-६ चालण्याचा नियम संतुलित आणि संरचित मार्गाने चालण्यासाठी प्रोत्साहित करतो. त्यासाठी ६ मिनिटांच्या वॉर्म-अपसह सुरुवात करा आणि सकाळी ६ किंवा संध्याकाळी ६ वाजता ६० मिनिटे चालत राहा व ६ मिनिटांच्या कूल-डाऊनने समाप्त करा. या संतुलित संरचनेचे उद्दिष्ट हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या आरोग्याला समर्थन देणे, मानसिक कल्याण सुधारणे आणि शारीरिक हालचालींना आपल्या दैनंदिन दिनचर्येचा एक शाश्वत भाग बनवणे आहे.

इंडियन एक्सप्रेस डॉट कॉमने या दिनचर्येचे फायदे आणि व्यावहारिकतेचा सखोल अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांचे मत जाणून घेतले आहे.

टोन३० पिलेट्समधील फिटनेस व पिलेट्स विशेषज्ज्ञ डॉ. वजल्ला श्रावणी सांगतात की, “६-६-६ चालण्याचा नियम तुमच्या जीवनशैलीमध्ये नियमित व्यायामाचा समावेश करण्यासाठी एक संरचित आणि अनुकूल फ्रेमवर्क प्रदान करतो. वॉर्म-अप आणि कूल-डाउन दिनचर्या, सातत्यपूर्ण चालण्याचे फायदे आणि आपल्या वैयक्तिक गरजांनुसार याचे महत्त्व समजून घेऊन त्याचा वापर करू शकता.”

डॉ. श्रावणी सांगतात, “६ मिनिटांचा वॉर्म-अप तुमची शारीरिक तयारी हळूहळू वाढवून चालण्याच्या शारीरिक गरजांसाठी तुमच्या शरीराला प्राधान्य देतो. हे हळूहळू तुमच्या हृदयाचे ठोके वाढवते, तुमच्या स्नायूंमध्ये रक्तप्रवाह वाढवते आणि तुमच्या हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या प्रणालीला कामाच्या वाढीव भारासाठी तयार करते.”

वॉर्म-अप ॲक्टिव्हिटीज तुम्ही चालत असताना वापरत असलेले स्नायू सक्रिय करतात. डॉ. श्रावणी म्हणतात की, चालल्यामुळे शरीराची लवचिकता आणि हालचालींची श्रेणी सुधारते. त्याव्यतिरिक्त ६ मिनिटांचे कूल-डाउन हळूहळू विश्रांतीच्या स्थितीत परत येण्याची सुविधा देते, रक्तदाबात अचानक होणारे बदल प्रतिबंधित करते आणि पुनर्प्राप्तीस प्रोत्साहन देते. “हे तुमच्या हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छ्वास हळूहळू मंद होण्यास अनुमती देते, शरीराच्या खालच्या भागात रक्त जमा होण्यास प्रतिबंध करते आणि चक्कर येणे किंवा डोके दुखण्याचा धोका कमी करते.”

“कूल-डाऊनदरम्यान हलकी क्रिया आपल्या स्नायूंमधून लॅक्टिक अॅसिडसारख्या चयापचय कचरा उत्पादनांना बाहेर काढण्यास मदत करते, स्नायू दुखणे आणि थकवा कमी करते. हलक्या स्टॅटिक स्ट्रेचेस, प्रत्येकाला सुमारे ३० सेकंद धरून ठेवल्याने, लवचिकता व गतीची श्रेणी सुधारू शकते आणि त्यामुळे दुखापतीचा धोका कमी होतो”, असे त्यांनी सांगितले.

आरोग्याच्या फायद्यासाठी तुम्ही दिवसातून ६० मिनिट चालणे सुरू करू शकता.

चालणे, ज्याला व्यायामाचा एक प्रकार म्हणून कमी लेखले जाते, ते सातत्याने केल्यावर अनेक आरोग्यदायी फायदे होतात, असे डॉ. श्रावणी यांनी सांगितले.

हेही वाचा: आता तुमचे पाळीव प्राणीही घेऊ शकतात शाकाहारी आणि वीगन आहार? तज्ज्ञ काय सांगतात…

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य

चालणे ही एक लयबद्ध, अॅरोबिक क्रिया आहे, जी तुमचे हृदयाचे स्नायू मजबूत करते, रक्त परिसंचरण सुधारते आणि रक्तदाब व कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. आर्टिरिओस्क्लेरोसिस, थ्रोम्बोसिस व व्हॅस्क्युलर बायोलॉजीमधील अभ्यासात असे आढळून आले की, नियमित चालण्याने परिधीय धमनी रोग (पीएडी)चा धोका कमी होतो.

वजन प्रबंधन

६० मिनिट चालणे अनेक कॅलरीज बर्न करू शकतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. ही क्रिया चयापचय वाढवते आणि ऊर्जेसाठी चरबी वापरण्याची शरीराची क्षमता सुधारते.

हाडांचे आरोग्य

चालल्याने हाडांच्या वाढीस उत्तेजन मिळते आणि ऑस्टिओपोरोसिसच्या प्रतिबंधास मदत होते, हे विशेषतः वृद्ध आणि स्त्रियांसाठी महत्त्वाचे आहे.

मनःस्थिती सुधारणे

चालणे यासह व्यायाम, एंडोर्फिन, नैसर्गिक मूड एलिव्हेटर्स सोडण्यास ट्रिगर करतो, जे तणाव, चिंता व नैराश्य कमी करू शकतात.

Story img Loader