A cancer survivor lists ‘toxic’ things: कॅन्सर, अर्थात कर्करोग आजही जगासमोरील एक जीवघेणी समस्या आहे. कर्करोग हा सर्वात वेदनादायक आजारांपैकी एक आहे, ज्यामध्ये आधी कोणतीही लक्षणे, उपचार किंवा खबरदारीची उपाययोजना नाही. हजारो लोक दरवर्षी कर्करोगामुळे मृत्यू पावतात. पहिल्यांदा जेव्हा कर्करोगाचा जगाशी सामना झाला तेव्हा एक समज निर्माण झाला की जे धूम्रपान करतात त्यांनाच कर्करोग होतो किंवा तंबाखू खाल्ल्यानेच कर्करोग होतो. पण, हळूहळू पोटाचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग आणि अन्य कर्करोग जगासमोर उलगडू लागले आणि हे सत्य समोर आले की, कर्करोग कोणालाही आणि कसाही होऊ शकतो आणि तेव्हापासून कर्करोगाची जास्त भीती निर्माण झाली. अशातच कंटेंट क्रिएटर आणि कर्करोगाचा सामना केलेली सुसाना डेमोर यांनी कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी रोजच्या वापरातल्या काही साधनांचा वापर बंद करण्यास सांगितला आहे. याचसंदर्भात द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना हैदराबाद येथील ग्लेनेगल्स हॉस्पिटल्सचे सल्लागार आणि क्रिटिकल केअर विभागाचे प्रमुख डॉ. मनिंद्र यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

सुसाना डेमोर सांगतात की, “सत्य हे आहे की, मी गर्भवती असताना ३५ व्या वर्षी मला झालेल्या कॅन्सरच्या निदानामुळे दररोज किती विषारी पदार्थांचा सामना करावा लागतो आणि ताण, जळजळ, पर्यावरणीय घटक आपल्या आरोग्यावर किती परिणाम करतात हे समजले. म्हणूनच मी जाणूनबुजून अशा उत्पादनांची अदलाबदल केली आहे, जी मला किंवा माझ्या कुटुंबासाठी योग्य नव्हती.

सुसाना डेमोर यांच्या मते, जर तुम्हाला तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्यायचे असेल तर “छोटे, अर्थपूर्ण बदल” करण्याची वेळ आली आहे.

पारंपरिक दुर्गंधीनाशक प्रोडक्ट : आपण रोजच्या वापरामध्ये स्वच्छतेसाठी अनेक दुर्गंधीनाशक प्रोडक्ट वापरत असतो, मात्र नकळतपणे याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो; त्यामुळे हे टाळण्याचा सल्ला दिला आहे.

कपडे धुण्याचे विषारी डिटर्जंट आणि साफसफाईचे साहित्य : या सगळ्यांमध्ये अशा रसायनांचा वापर केलेला असतो, जे कर्करोगजनक आहेत.

फ्लोराइड टूथपेस्ट : आपण दात घासण्यासाठी वापरणारी टूथपेस्टही धोकादायक ठरू शकते.

विषारी शॅम्पू : केस धुण्यासाठी वापरणारा शॅम्पूही धोकादायक ठरू शकतो.

रसायनांनी भरलेले स्किनकेअर : आपण आपली त्वचा चांगली राहण्यासाठी जे प्रोडक्ट वापरतो, तेसुद्धा विषारी असून त्यामध्ये केलेल्या वेगवेगळ्या रसायनांचा वापर धोकादायक ठरू शकते.

हे बदल कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात का?

डॉ. मनिंद्र म्हणाले की, कर्करोगाचे निदान विशेषतः लहान वयात होते. जरी अनेक पर्यावरणीय आणि जीवनशैली घटक एकूण आरोग्यावर परिणाम करतात, तरीही दैनंदिन उत्पादनांमध्ये विषारी पदार्थांच्या दीर्घकालीन संपर्काच्या संभाव्य परिणामांबद्दल जागरूकता वाढत आहे

डॉ. मनिंद्र यांच्या मते, स्वच्छता उत्पादनांमध्ये अस्थिर सेंद्रिय संयुगे आणि कृत्रिम सुगंध असतात. ही रसायने कपड्यांवर किंवा घरातील हवेवर राहू शकतात, ज्यामुळे श्वसनास त्रास होतो आणि दीर्घकालीन धोके निर्माण होतात. टूथपेस्टमध्ये फ्लोराइड हे असतेच, परंतु जास्त प्रमाणात वापरल्याने त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. डॉ. मनिंद्र म्हणाले की, विषारी शॅम्पूचं प्रमाण हल्ली वाढत असून यापैकी अनेक रसायनांवर आधीच बंदी घातली आहे. पारंपरिक स्किनकेअरमध्ये बहुतेकदा पॅराबेन्स, फॅथलेट्स आणि EU नियमांनुसार बंदी घातलेली इतर रसायने असतात, असे डॉ. मनिंद्र म्हणाले. पुढे ते सांगतात की, अनावश्यक रसायनांचा संपर्क कमी करणे हे तत्व शहाणपणाचे आहे, विशेषतः कर्करोग किंवा दीर्घकालीन आजारांचा इतिहास असलेल्यांसाठी. दैनंदिन वापरात विषारी उत्पादने न वापरण्याचा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.