निरोगी शरीर असावे, असे प्रत्येकालाच वाटते. बारीक असणाऱ्या लोकांना मध्यम जाड व्हावेसे वाटते, तर जाड असणाऱ्या लोकांना योग्य प्रमाणात बारीक व्हावेसे वाटते. यासाठी लोक प्रोटिन्स पावडर, वेट-लॉस-गेन यासाठी उपलब्ध असणारी औषधे घेताना दिसतात. रासायनिक घटक असणारी औषधे शरीराला नुकसान पोहोचवू शकतात. योग्य पद्धतीने वजन वाढवण्याचे काही उपाय आयुर्वेदात सांगितले आहेत. त्या उपायांमध्ये कोणते दोन पदार्थ आपल्याला वजन वाढविण्यास साहाय्य करतात आणि त्या पदार्थांचे औषधी महत्त्व जाणून घेणे माहितीपूर्ण ठरेल.

आपल्यापैकी बरेच जण वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करतात, जे नक्कीच सोपे नाही. पण वजन वाढवणे हेही काही सोप्पे नाही आणि जे वजन वाढवण्याच्या प्रयत्नात आहे, त्यांनीही योग्य पद्धतीने वजन वाढवावे. अन्यथा केवळ स्थूलता येण्याची शक्यता असते.

Arjun Bijlanis Wife Neha Swami make 14 kg Weight Loss
Arjun Bijlani’s Wife : पत्नी नेहा स्वामीने १४ किलो वजन कसे कमी केले? अर्जुन बिजलानीने सांगितले सीक्रेट; म्हणाला, “तुम्ही तुमच्या जोडीदारावर प्रेम करत असाल…”
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ
Can even 1.5 grams of weight gain increase the risk
१.५ ग्रॅम वजन वाढल्यानेही वाढू शकतो मधुमेहाचा धोका? तज्ज्ञांचे मत काय…
Robotic Bariatric Surgery, Obesity, Robotic Bariatric,
‘रोबोटिक बॅरिएट्रिक’ शस्त्रक्रियेद्वारे लठ्ठपणाला कात्री! अधिक अचूकपणे, कमी वेळेत होणाऱ्या प्रक्रियेविषयी जाणून घ्या…
Common lifting mistakes and how to avoid them
Lifting Heavy Objects Tips : जड वस्तू उचलताना तुम्हीसुद्धा श्वास रोखून ठेवता का? मग थांबा! डॉक्टरांचा हा सल्ला वाचा
Heart Attack Prevention
Heart Attack: हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून वयाच्या विशीत अन् तिशीत ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश; वाचा तज्ज्ञ काय सांगतात

हेही वाचा : Health Special : तुम्ही रोज पेनकिलर घेत आहात ? वेदनाशामक औषधांचे ‘हे’ दुष्परिणाम माहीत आहेत का ?

रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांनुसार, (सेंटर फॉर डीसीस कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन) जर तुमचा बॉडी मास इंडेक्स (BMI) १८.५ ते २४.९ च्या दरम्यान असेल, तर ते सामान्य किंवा निरोगी वजन श्रेणीमध्ये येतात. या श्रेणीपेक्षा कमी किंवा जास्त काहीही अनुक्रमे कमी वजनाच्या किंवा लठ्ठ श्रेणीमध्ये येतात आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार यांनी अत्यंत सोपे आणि योग्यरीतीने वजन वाढवता येईल, असे उपाय सांगितले आहेत. योग्य रीतीने वजन वाढवण्यासाठी तूप आणि गुळाची आवश्यकता असते, असे त्यांचे म्हणणे आहे. वजन वाढवण्यासाठी गूळ आणि तूप समप्रमाणात आणि नियमित घेतले पाहिजे. यामुळे शरीराला आवश्यक ऊर्जा मिळेल, असे त्या म्हणाल्या. महिनाभर रोज तूप आणि गूळ यांचे सेवन केले पाहिजे. गाईच्या तुपापेक्षा म्हशीचे तूप अधिक फायदेशीर ठरते. त्यांना म्हशीचे तूप पचत नाही, ते गाईच्या तुपाचे सेवन करू शकतात. देशी गाईचे तूप वापरावे.
तूप आणि गुळाचे मिश्रण शरीराला फायदेशीर असते. ते शरीराला डिटॉक्सिफाई करण्यास मदत करते. त्वचा, नखे आणि केसांचे आरोग्यही यामुळे सुधारते. गुळामुळे साखरेची गरज भरून निघते, तसेच शरीराला लोहसुद्धा मिळते.

हेही वाचा : शिजवलेल्या अन्नासह सॅलड खाताय ? ‘हे’ पदार्थ ठरू शकतात धोकादायक

तुपाचे फायदे

इतर रासायनिक घटक वापरून वजन वाढवण्यापेक्षा तुपाचे सेवन करावे. तूप हे निरोगी पद्धतीने वजन वाढविण्यास कारण ठरते. कारण, तुपामुळे चरबी वाढत नाही, तर स्नायूंमध्ये बळकटी येते. तसेच, पचनक्रिया सुधारते. उतींचे पोषण होते. आवाज, स्मृती, केस, त्वचा, प्रजनन क्षमता, प्रतिकारशक्ती, बुद्धिमत्ता आणि एकूण आरोग्य सुधारते. तूप वात आणि पित्तदेखील कमी करते.

हेही वाचा : तारांकित/अतारांकित प्रश्न म्हणजे काय? अधिवेशनातील शून्य प्रहर म्हणजे काय?

गुळाचे फायदे

गुळाला ‘हेल्दी स्वीटनर’ असे म्हणतात. “हे चवीला गोड असते आणि वात आणि पित्त यांचे संतुलनही राखते. रोगप्रतिकारशक्तीदेखील सुधारते. थंड पाण्यासह गुळाचा खडा खाल्ल्यास ताजेतवाने वाटते. गूळ हा वर्षभर जुना असेल, तर तो अधिक औषधी असतो.

गूळ आणि तूप यांचे योग्य मिश्रण वजन वाढवण्यास तसेच निरोगी राहण्यास साहाय्य करतात.