दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिला मायोसिटिस आजाराचे निदान झाले होते, पण आता उपचार घेतल्यानंतर ती या आजारातून बरे होण्याच्या मार्गावर आहे. मायोसिटिस ही एक स्वयंप्रतिकार (myositis) स्थिती आहे. फॅमिली मॅन २
फेम अभिनेत्री समंथाने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत आपल्या दिनचर्येचा खुलासा केला. व्हिडीओनुसार, समंथाचा दिवस सकाळी ६.३० वाजता सूर्यप्रकाशात सुरू होतो, त्यानंतर ती तेल वापरून तोंडाची स्वच्छता करते, (oil pulling), तेलाने मालिश करते आणि सकाळी ७ वाजता व्यायाम करते; ज्यात शरीराचे सामर्थ्य आणि वजन प्रशिक्षण (strength and bodyweight training) यांचा समावेश असतो. काम सुरू करण्यापूर्वी ती देवासमोर प्रार्थना करते आणि कृतज्ञता व्यक्त करते. कामावर जाण्यापूर्वी ती रेड लाईट थेरपी मास्क वापरते आणि चेहरा बर्फाच्या पाण्यात बुडवून डोळ्यांची काळजी घेते. संध्याकाळी ६ वाजता पुन्हा रेड लाइट थेरपी घेते, त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता पिकलबॉल (pickleball) खेळते. रात्री ९.३० वाजता ध्यान करते आणि रात्री १० वाजता झोपते.” हा व्हिडीओ पोस्ट करताना तिने, “Life’s Golden” असे कॅप्शन दिले आहे. समंथाच्या दिनचर्येबाबत तज्ज्ञांचे मत काय आहे ते जाणून घेऊ या…
चांगल्या आरोग्यासाठी सक्रिय राहणे का आवश्यक आहे?
याबाबत हैदराबादच्या लकडी पूल येथील ग्लेनेगल्स हॉस्पिटल्समध्ये कार्यरत मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. भावना पी यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “शिस्तबद्ध जीवनशैली, नियमित व्यायाम आणि योग्य पोषण हे उत्तम आरोग्याचा पाया आहे.”
व्यायामात सातत्य राखणे महत्त्वाचे आहे. स्क्वॅट्स, डेडलिफ्ट्स आणि बेंच प्रेससारखे कंपाऊंड व्यायाम समाविष्ट करा, जे एकाच वेळी अनेक स्नायूंवर सक्रिय ठेवते आणि चयापचय वाढवतात. शरीरातील फॅट्स कमी करण्यासाठी आणि स्नायूंची मजबुती वाढविण्यासाठी हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी व्यायामदेखील महत्त्वपूर्ण आहे. हाय-इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग (HIIT) फॅट्स कमी करण्यात आणि स्नायू वस्तुमान (muscle mass) टिकवून ठेवण्यासाठी विशेषतः प्रभावी ठरू शकते”, असे डॉ. भावना यांनी सांगितले.
हेही वाचा – Menopause बाबत ‘या’ चांगल्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? तज्ज्ञांनी केला खुलासा
तज्ज्ञांच्या मते, “स्वत:ला हायड्रेट (शरीरात पाण्याची पातळी राखणे) ठेवणे महत्त्वाचे आहे.”
डॉ. भावना म्हणाल्या की, “एक दिवस लवकर काम संपवणे हा चांगला पर्याय आहे. पुरेशी झोप आणि तणाव व्यवस्थापनाकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, परंतु ते शरीर पुन्हा बरे होण्यासाठी आणि स्नायूंच्या वाढीसाठी आवश्यक आहेत.
“दीर्घकाळचा ताण आणि कमी झोपेमुळे हार्मोनल असंतुलन होऊ शकते, जे प्रगतीमध्ये अडथळा ठरू शकतात,” असे डॉ. भावना म्हणाल्या.
सर्वात महत्त्वाच्या पैलूंपैकी एक म्हणजे चांगला, संतुलित आहार. लीन प्रोटीन, संपूर्ण धान्य, निरोगी फॅट्स आणि भरपूर फळे आणि भाज्या यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. “स्नायू बरे होण्यासाठी आणि वाढीसाठी प्रथिने आवश्यक आहेत, तर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटमध्ये इंटेन्स वर्कआउटसाठी आवश्यक ऊर्जा प्रदान करते. ॲव्होकॅडो आणि नट्समध्ये आढळणारे हेल्दी फॅट्स, एकूणच आरोग्य आणि हार्मोन्सच्या उत्पादनास समर्थन देते,” असेही डॉ. भावना यांनी स्पष्ट केले.