एका आश्चर्यकारक नवीन अभ्यासाने धूम्रपानामुळे आयुर्मानावर होणाऱ्या विध्वंसक परिणामांची आठवण करून दिली आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (यूसीएल)च्या संशोधकांनी, अमेरिकन डिपार्टमेंट फॉर हेल्थ अॅण्ड सोशल केअरने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, धूम्रपानामुळे प्रत्येक सिगारेटमागे पुरुष त्यांच्या आयुष्यातील १७ मिनिटे गमावतात; तर महिलांच्या बाबतीत ही नुकसान आणखी जास्त आहे. धूम्रपानात प्रत्येक सिगारेटमागे महिला त्यांच्या आयुष्यातील २२ मिनिटे गमावतात.
हे नवीन निष्कर्ष मागील अंदाजांना मागे टाकतात, ज्याने प्रति सिगारेट ११ मिनिटांची कपात सुचवली होती.
धूम्रपानामुळे आयुर्मान का कमी होते? (Why smoking reduces life expectancy)
प्रत्येक सिगारेटमुळे निकोटिन, कार्बन मोनोऑक्साइड व टार यांसारखी हानिकारक रसायने शरीरात प्रवेश करतात. हा निष्कर्ष धूम्रपानाचा दीर्घायुष्यावर होणारा गंभीर परिणाम अधोरेखित करतो. या पदार्थांमुळे हृदय, फुप्फुसे आणि रक्तवाहिन्यांसह महत्त्वाच्या अवयवांचा हळूहळू ऱ्हास होतो, असे फरिदाबाद येथील यथार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स, इंटर्नल मेडिसिन आणि संधिवातशास्त्र (Rheumatology) विभाग संचालक डॉ. जयंता ठाकुरिया यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना स्पष्ट केले.
धूम्रपान शरीराला त्रास वा आजारांची ‘भेट’ देते : (Smoking is a significant contributor to:)
- हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे रोग (Cardiovascular Diseases) : जसे की हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक.
- फुप्फुसाचा कर्करोग (Lung Cancer) : जगभरातील फुप्फुसाच्या कर्करोगाचे धूम्रपान हे प्रमुख कारण आहे.
- क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) Chronic Obstructive Pulmonary Disease (COPD): श्वासोच्छ्वासाच्या समस्या अधिक तीव्र वा दुर्धर होतात.
- कमकुवत रोगप्रतिकारक प्रणाली (Weakened Immune System): शरीराची प्रतिकारशक्ती कमी होत जाणे
डॉ. ठाकुरिया स्पष्ट करतात, “धूम्रपान केल्याने केवळ आयुष्यच कमी होत नाही, तर त्यामुळे आरोग्य खालावत जाते ज्यामुळे मृत्यूपूर्वीच अनेक वर्षे दीर्घकालीन आजार होतात.
हेही वाचा –हिवाळ्यात खूप जास्त थंडी जाणवत असेल तर काळी वेलची चघळा! पोषणतज्ज्ञांनी दिला सल्ला, जाणून घ्या कारण….
स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त वेळ का गमावतात(Why women lose more time than men)
या अभ्यासात लिंग-आधारित असमानता अधोरेखित करण्यात आली आहे, ज्यामध्ये स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत प्रतिसिगारेट अधिक मिनिटांचा वेळ गमावतात. यात जैविक घटक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, असे डॉ. ठाकुरिया म्हणाले.
- संप्रेरक असुरक्षा (Hormonal Vulnerability): हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यावर परिणाम करणारे इस्ट्रोजेन, स्त्रियांना धूम्रपान-प्रेरित नुकसानास अधिक संवेदनक्षम बनवते.
- निकोटीन चयापचय (Nicotine Metabolism) : स्त्रिया निकोटीनला वेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देतात ज्यामुळे त्यांच्यावर होणारे हानिकारक प्रभाव वाढतात.
- आजार होण्याची उच्च जोखीम (Higher Disease Risk): धूम्रपानामुळे स्त्रियांमध्ये फुप्फुसाचा कर्करोग आणि हृदयविकाराची शक्यता अधिक लक्षणीय वाढते.
“स्त्रियांचे शरीरविज्ञान (Women’s physiology) धूम्रपानावर वेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देते, ज्यामुळे अनेकदा समान वर्तनासाठी जास्त धोका निर्माण होतो,” डॉ. ठाकुरिया नोंदवतात.
हेही वाचा –तिरुपतीच्या प्रसादाच्या लाडूमध्ये बीफ टॅलो वापरल्याचा दावा! भेसळयुक्त तूप खाल्ल्याने आरोग्यावर कसा परिणाम होतो?
धूम्रपानाच्या परिणामांचा प्रतिकार करणे (Countering the effects of smoking)
डॉ. ठाकुरिया यांच्या म्हणण्यानुसार, धूम्रपानामुळे होणारे नुकसान खूप मोठे असू शकते, परंतु वयाची पर्वा न करता, धूम्रपान सोडल्याने आरोग्यासाठी खूप फायदे होतात.
धूम्रपान प्रभावीपणे कसे थांबवायचे ते येथे आहे( Here’s how to effectively stop smoking):
डॉ. ठाकुरिया यांच्या म्हणण्यानुसार, धूम्रपानामुळे होणारे नुकसान खूप मोठे असू शकते; परंतू धूम्रपान सोडल्याने आरोग्यासाठी खूप फायदे होतात.
धूम्रपान प्रभावीपणे कसे थांबवायचे ते येथे आहे ( Here’s how to effectively stop smoking) :
- धूम्रपान बंद करण्याचे कार्यक्रम (Smoking Cessation Programs) : समुपदेशन किंवा थेरपीद्वारे तज्ज्ञांच्या समर्थनाने या सवयीवर मात करण्यासाठी अनुकूल धोरणे अवलंबणे.
- निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी (Nicotine Replacement Therapy (NRT)) : पॅचेस, हिरड्या b लोजेंझ हे लालसा नियंत्रित करण्यात मदत करतात आणि निकोटीनचे छोटे, नियंत्रित डोस देऊन धूम्रपान सोडण्यामुळे उदभवणारी लक्षणे कमी करण्यास मदत करते.
- औषधोपचार साह्य (Medication Assistance) : व्हॅरेनिकलाइन किंवा बुप्रोपियन (varenicline or bupropion) सारखी वैद्यकीय सल्ल्यानुसार घेतलेली औषधे धूम्रपानाची लालसा कमी करू शकतात आणि धूम्रपान सोडण्यामुळे उदभवणारी त्रासदायक लक्षणे कमी करू शकतात.
- जीवनशैलीतील आरोग्यदायी बदल (Healthy Lifestyle Changes) : नियमित व्यायाम, संतुलित आहार व तणावमुक्तीचे तंत्र हे शरीराला धूम्रपानाशी संबंधित हानीपासून मुक्त होण्यास मदत करते.
- समर्थन नेटवर्क (Support Networks) : कुटुंब, मित्र किंवा समर्थक गट तुम्हाला धूम्रपान सोडविण्यासाठी आवश्यक ते प्रोत्साहन देऊ शकतात.
डॉ. ठाकुरिया यांनी, “धूम्रपान सोडणे हा आरोग्यासाठी सर्वांत प्रभावी निर्णय आहे, जो कोणीही घेऊ शकतो. वर्षानुवर्षे धूम्रपान केल्यानंतरही शरीरात बरे होण्याची अविश्वसनीय क्षमता असते,” असे बजावून सांगितले.
हेही वाचा –अंकुरलेले नारळ म्हणजे काय? ते खाणे योग्य आहे का? तज्ज्ञ काय सांगतात…
मुख्य फायद्यांमध्ये समाविष्ट बाबी (Key benefits include) :
सुधारित फुप्फुसाची क्षमता आणि रक्ताभिसरण.
हृदयरोग आणि कर्करोगाचा धोका कमी होतो.
वर्धित रोगप्रतिकार प्रणाली आणि ऊर्जा पातळी.
दीर्घ, निरोगी आयुष्य.
डेटा स्पष्ट करतो की, धूम्रपान केवळ आयुष्यच कमी करत नाही, तर आयुष्याच्या गुणवत्तेशी तडजोडदेखील करते. म्हणूनच आजपासून धूम्रपान करणे बंद करा.
(टीप : हा लेख सार्वजनिक डोमेन आणि/किंवा तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे. कोणतीही दिनचर्या सुरू करण्यापूर्वी नेहमी आपल्या आरोग्य चिकित्सकाचा सल्ला घ्या.)