‘डिप्रेशन’ हा शब्द आपण सध्याच्या काळात अनेकदा ऐकतो. हा आजार मूड डिसऑर्डर प्रकारात मोडतो. एखाद्या व्यक्तीचं/माणसाचं उदास असणं, चिड्चिड करणं किंवा त्याच्या आयुष्यावर परिणाम करणार्‍या, त्याचं नुकसान करणार्‍या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी हे तो व्यक्ती डिप्रेशनमध्ये असल्याचं लक्षण आहे. भारतातील तरुणांमध्ये डिप्रेशन ही गोष्ट मोठ्या प्रमाणावर आढळून येते. अशीच आयुष्यात खूप आनंदी असलेली बॉलीवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. हिने काही वर्षांपूर्वी सोशल मीडिया पोस्टद्वारे ती ऐकेकाळी डिप्रेशनची शिकारही झाली असल्याचा मोठा खुलासा केला होता. इराने डिप्रेशनचा देखील सामना केला आहे. सध्या सर्वत्र आमिर खान याची लेक इरा खान याची चर्चा रंगत आहे.

इरा खान कशी झाली डिप्रेशनची शिकार?

इराला पाच वर्षांपूर्वी मेजर डिप्रेशन डिसऑर्डर ( एमडीडी ), निदान झाले होते. ज्याला क्लिनिकल डिप्रेशन असेही म्हणतात. ती डिप्रेशनमध्ये असताना तिचे वडील आमिरकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आता तिने उघडपणे सांगितले आहे आणि आमच्या कुटुंबात मानसिक आरोग्याचे विकार चालतात, असेही इराने एका मुलाखतीदरम्यान नमूद केले.

shah rukh khan
शाहरुख खानने आर्यन व सुहानासाठी चाहत्यांना केली ‘ही’ विनंती; म्हणाला, “त्यांना ५० टक्के प्रेम…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Bollywood actors Aamir Khan Reaction To Being Called A 60 Year Old Goes Viral
Video: “६० वर्षांचा झालास”, असं म्हणताच आमिर खान झाला नाराज, पापाराझीला टोला लगावत म्हणाला…
Bharti Singh
Video : शाहरुख खानचं ‘ते’ कृत्य पाहून भारती सिंगला अश्रू झाले अनावर; किस्सा सांगत म्हणाली…
Myra Vaikul Upcoming Movie Mukkam Post Devach Ghar review
छोट्यांची मोठी गोष्ट
Shahid Kapoor
“मी आत्मसन्मान गमावला…”, लग्नाआधीच्या रिलेशनशिपबद्दल शाहिद कपूर म्हणाला, “हृदय तुटल्याने…”
Myra Vaikul
मायरा वायकूळ रडण्याचा सीन शूट करण्यासाठी काय करायची? म्हणाली, “मी एका जागेवर…”
dada kondke
Video : “हाडाचा कलाकार आहे भाऊ! रडला पण डान्स नाही विसरला”; दादा कोंडके स्टाईल चिमुकल्याचा डान्स पाहून पोट धरून हसाल

इराला तिच्या अनुभवाबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने सांगितले की, तिला तिच्या वागण्यात बदल जाणवला. डिप्रेशनमध्ये असताना ती तासोंतास रडायची. चार-चार दिवस ती जेवत देखील नव्हती. शिवाय सतत ती झोपायची… काही तरी चुकत आहे, असे तिला नेहमी वाटत होते. रीना दत्ता आणि आमिर खान यांनी परस्पर सहमतीने घटस्फोट घेतला हाेता, ज्यामुळे या घटस्फोटाचा तिच्यावर फारसा परिणाम झाला नाही, तरीही इराला काहीतरी चुकतं असल्याचे जाणवायचे. नंतर तिने नेदरलँड्समधील एका सामान्य चिकित्सकाला भेट दिली, ज्यांनी अँटीडिप्रेसेंट्स लिहून दिली. तिला थोडे बरं वाटत होते. पण लवकरच तिची प्रकृती आणखी बिघडली. यावेळी, तिने मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतला. नंतर, तिला नैराश्यताचे निदान झाले, नंतर तिने नेदरलँड्समधून भारतात परत येण्याचा निर्णय घेतला, तेथील कॉलेजमध्ये ती लिबरल आर्ट्सचा अभ्यास करत होती. ती म्हणाली की, ‘माझ्या आईने सांगितले की मला जगायचे नाही, म्हणून मी दिवसभर झोपत हाेते जेणेकरून मला एका दिवसात जगण्यासाठी कमी तास मिळतील.’

(हे ही वाचा : ‘बाईपण भारी देवा’च्या चारूला ४१ व्या वर्षीच आला मेनोपॉज; मासिक पाळी लवकर बंद होण्याची कारणे काय? )

पाच वर्षांच्या नियमित थेरपी आणि औषधोपचारानंतर, इरा तिच्या खासगी आयुष्यात प्रचंड आनंदी आहे. तिच्या वडिलांनी तिला यातून बाहेर पडण्यात मदत केल्याचे तिने सांगितले. आयुष्यात योग्य निर्णय न घेतल्यामुळे डिप्रेशन आल्याचं वक्तव्य इराने केलं होतं. स्वतःने डिप्रेशनचा सामना केल्यामुळे इरा आता इतरांना डिप्रेशनमधून बाहेर काढण्यासाठी मोठी मदत करत आहे. तिने mental health crusader बनण्याचा निर्णय घेतला आहे.

इरा खानने अलीकडेच लोकांना मानसिक आरोग्य सहाय्य देण्यासाठी ‘अगस्तू’ फाउंडेशन सुरू केले आहे. अलीकडील एका मुलाखतीत इराने सांगितले की, आमिर आणि तिची आई रीना दत्ता फाउंडेशनच्या सल्लागार मंडळावर आहेत आणि त्यांनी संस्थेला निधी सहाय्य केला. इरा ही आमिरची पहिली पत्नी रीनापासूनची दुसरी मुलगी आहे. नुकतेच इराने नुपूर शिखरेसोबत लग्न केले.

Depression वर कशी करावी मात?

  • जीवनशैलीमध्ये व्यायामाचा समावेश करा. व्यायामानं सेरोटोनिन, अँडोर्फिन आणि मनाला चांगले वाटणारे मेंदूतील रसायने स्त्रवायला चालना मिळते. ते अँटीडेप्रेसेंट्सप्रमाणे मेंदूत नवीन पेशीचा त्या रसायनांशी संपर्कही वाढवते. 
  • तणाव आणि नैराश्याची समस्या दूर करण्यासाठी संगीत उपयुक्त ठरते. तणावातून मुक्ती मिळवायची असेल तर, तुमच्या आवडीची गाणी आणि संगीत ऐकायलाच हवे. यामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा संचारते.
  • निरोगी राहण्यासाठी संतुलित आहार आणि व्यायाम आवश्यक आहे. जर तुम्हाला तणाव आणि चिंतापासून मुक्ती मिळवायची असेल तर दररोज आणि संतुलित आहार घ्या.

Story img Loader