Shah Rukh Khan Smoking : शाहरुख खानने मुंबईत त्याच्या नुकत्याच झालेल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये जाहीर केले की, त्याने अखेर धूम्रपान सोडले आहे. दरम्यान, ही सवय सोडण्यासाठी तो खूप दिवसांपासून संघर्ष करीत होता. त्याबद्दल सांगताना शाहरुख म्हणतो, “ही चांगली गोष्ट आहे की, मित्रांनो, मी आता धूम्रपान करीत नाही.” सिगारेट सोडल्यानंतर मला श्वास घेण्यास कमी त्रास होईल, असे वाटले होते; पण तरीही तसे होत नाही. मला श्वास घ्यायला थोडा त्रास होतोच आहे. तो या बदलाशी जुळवून घेत असल्याचे त्याने कबूल केले. तो म्हणाला, “मला वाटले की, मला श्वासोच्छ्वासाचा त्रास होत नाही; पण तरीही मला ते जाणवते. इन्शाअल्लाह, तेही लवकर बरे होवो.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाहरुख खान यापूर्वी धूम्रपान सोडण्याच्या आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याच्या त्याच्या इच्छेबद्दल बोलला आहे. शाहरुख सांगतो की, धूम्रपान सोडण्यासाठी त्याला मुलगा अबराम याने प्रेरित केले आहे. २०१७ मध्ये इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये शाहरुख खानने एक गोष्ट शेअर केली, “वयाच्या ५० व्या वर्षी माझ्या लहान मुलाची उपस्थिती असणे ही चांगली गोष्ट आहे. मात्र, तो जेव्हा मोठा होईल तेव्हा माझी उपस्थिती असेल का ही चिंता मला सतावते. त्यामुळे तुम्हीही कमी धूम्रपान, कमी मद्यपान अन् अधिक व्यायाम करीत राहा. मीसुद्धा सर्व सोडण्याचा आणि निरोगी व आनंदी राहण्याचा प्रयत्न करीत आहे.

धूम्रपान सोडल्यानंतरही दम का लागतो?

शाहरुख खानने सांगितल्याप्रमाणे धूम्रपान सोडल्यानंतरही दम का लागतो? या संदर्भात बेंगळुरूचे सार्वजनिक आरोग्य विचारवंत डॉ. जगदीश हिरेमठ यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे. “दीर्घकाळ धूम्रपान केल्याने फुप्फुसांच्या उतींचे नुकसान होते, ज्यामध्ये लहान हवेच्या पिशव्यांमधील लवचिकता कमी होते. त्यामुळे धूम्रपान सोडल्यानंतरही फुप्फुसांना बरे होण्यास बराच वेळ लागतो.” नवी दिल्ली येथील विभू नर्सिंग होमचे वरिष्ठ सल्लागार पल्मोनोलॉजिस्ट डॉ. विभू कवात्रा स्पष्ट करताना सांगतात, ”धूम्रपान सोडल्यानंतर फुप्फुसे हळूहळू बरी होऊ लागतात; ज्यामुळे तात्पुरती जळजळ किंवा संवेदनशीलतेबाबतचा अधिक त्रास होऊ शकतो. धूम्रपान सोडल्यानंतर काही दिवसांत तुमच्या रक्तातील कार्बन मोनोऑक्साइडची पातळी सामान्य होते; ज्यामुळे तुमच्या उतींपर्यंत जास्त ऑक्सिजन पोहोचतो.” डॉ. कवात्रा पुढे नमूद करतात की, पहिल्या काही आठवड्यांत तुमच्या श्वासनलिकेतील लहान केसांसारखी रचना (सिलिया) पुन्हा कार्य करते आणि त्यामुळे फुप्फुसांतील श्लेष्मा आणि कचरा साफ होण्यास मदत होते. अनेक महिन्यांत फुप्फुसांचे कार्य सुधारत असल्याने खोकला आणि श्वासोच्छ्वास कमी झाल्याचे लक्षात येते.

धूम्रपान सोडल्यानंतर आपल्या रोजच्या जीवनशैलीत काय बदल करावेत?

हायड्रेटेड राहा, समृद्ध संतुलित आहाराचे पालन करा
वायुमार्गांना त्रास होऊ शकतो असा धूर आणि तीव्र गंध टाळा.

श्वासोच्छ्वासाचे व्यायाम

१. श्वास घेण्याचा सराव करा
२. चालणे किंवा पोहणे यांसारख्या सौम्य अॅरोबिक क्रियाकलापांमध्ये व्यग्र राहा
३. लवचिकता आणि श्वसन नियंत्रण एकत्र करण्यासाठी योगाचा विचार करा
४. “योगा आणि व्यायामाला हळूहळू सुरुवात करा आणि हळूहळू त्यांची तीव्रता वाढवा. “तुमच्या शरीराचे ऐका आणि आवश्यक असेल तेव्हा विश्रांती घ्या.”

हेही वाचा >> आहारात नियमित अंडी खाल्ल्याने उंची वाढते का? डॉक्टरांनी दिलेली माहिती एकदा वाचा

डॉ. हिरेमठ सांगतात, “धूम्रपान सोडल्यानंतर केवळ २४ तासांच्या आत रक्तातील कार्बन मोनोऑक्साईडची पातळी कमी होते; ज्यामुळे हृदय आणि स्नायूंमध्ये अधिक ऑक्सिजन पोहोचू शकतो. तर दोन आठवड्यांपासून तीन महिन्यांपर्यंत फुप्फुसांचे कार्य आणि रक्ताभिसरण सुधारते. धूम्रपान सोडल्याने आरोग्य आणि जीवनाच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होऊ शकतात. तसेच सुमारे १९ वर्षांनंतर फुप्फुसाच्या कर्करोगाने मृत्यू होण्याचा धोका सध्याच्या धूम्रपान करणाऱ्यांपेक्षा निम्म्यावर येतो.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhi bhi feel kar raha hu shah rukh khan opens up about struggle with breathlessness after quitting smoking experts decode his experience srk