‘पावसाळ्यात एसीची काय गरज?’, असेच तुम्हाला वाटत असेल. मात्र आजकाल वर्षाचे बारा महिने एसी लावल्याशिवाय झोप येत नाही,असे सांगणारे महाभाग आपल्याकडे वाढत चालले आहेत.(देश संपन्न होत आहे ना!) वास्तवात होतं असं की ,उन्हाळ्यातल्या उष्म्याच्या दिवसांमध्ये एसीच्या गारेगार हवेमध्ये झोपायची एकदा सवय लागली की पाऊस सुरू झाला तरी लोक एसीमध्येच झोपत राहतात. बघताबघता शरीराला अशी काही सवय लागते की एसी नसेल तर लोक झोपेशिवाय तळमळत राहतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कधीकाळी आपल्याकडे पंखे कुठे होते? पण लोक पंख्याशिवाय झोपत होते ना! आपण मात्र आज पंख्याशिवाय झोपू शकत नाही.अगदी तसेच एसीबाबतही होते. थंडी असो वा पावसाळा लोकांना एसीची अशी चटक लागते की एसी शिवाय झोप येत नाही.मात्र हे योग्य नाही.त्यात पावसाळ्यात बाहेरचे वातावरण गार असताना,पाण्याचा वर्षाव होत असताना तर अजिबात योग्य नाही,त्यातही वात व कफ़प्रकृतीच्या मंडळींना.सर्दी-ताप-खोकला-दमा-सायनस असे श्वसनविकार,थंडीताप, सांधेदुखी, सांध्यांना सूज येणे-सांधे आखडणे,शरीर जड होणे-आखडणे,एखाद्या अंगावर वा शरीरावर सूज,सांधे-हाडे-स्नायु-कंडरा-नसा यांमधील वेदना वगैरे समस्यांनी त्रस्त रुग्णांना रात्री एसीमध्ये झोपणे बंद केल्यानंतरच त्यांच्या त्यांच्या त्या समस्यांपासुन आराम मिळतो,असा अनुभव उपचार करताना येतो. हे त्रास टाळायचे असतील तर पावसाळ्यात होताहोईतो एसीमध्ये झोपू नका.झोपलात तरी खोलीतले वातावरण २६ अंशाच्या आसपास राहील असे पाहा. अंगावर ऊबदार कपडे घाला.
पावसाळ्यातील शीत वातावरणाचा विचार करून आयुर्वेदाने केलेले एक महत्त्वाचे मार्गदर्शन म्हणजे शीत विहाराचा त्याग. लक्षात घ्या इथे आपण ’शीत आहार’ म्हणत नसून ’शीत विहार’ म्हणतोय. शीत म्हणजे थंड आणि विहार म्हणजे दैनंदिन व्यवहार. पावसाळ्यामधील शीतत्वाचा विरोध करण्यासाठीच शीत आहाराबरोबरच शीत विहारसुद्धा टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.शीत विहार म्हणताना थंड वारे,थंड पाणी,थंड जमीन,थंड कपडे,थंड स्पर्श वगैरे दिनचर्येशी संबंधित अनेक थंड गोष्टी टाळणे अपेक्षित आहे. याचसाठी आयुर्वेदाने पावसाळ्यात दिनचर्येमधील विविध व्यवहारांमध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत व झोप घेतानाही थंड टाळावे आणि उष्ण स्वीकारावे असा सल्ला दिलेला आहे अर्थात जिथे-जिथे शक्य होईल तिथे-तिथे शरीराला ऊब मिळेल असे पाहावे. (अष्टाङ्गहृदय १.३.४४)
वातावरणातल्या ओलसर-गारव्याच्या विरोधात हा उष्ण उपचार आवश्यक आहे. पावसाळ्यात जेव्हा पाऊस पडत असतो आणि सभोवतालचे वातावरण ओलसर-थंड झालेले असते तेव्हा त्या विरोधात हा उष्ण उपचार आवश्यक आहे. उष्ण उपचार म्हटल्यावर उबदार घरामध्ये निवास, आनंद वाटेल इतपत गरम हवा,अग्निच्या सान्निध्यात राहणे,उबदार कपडे,उबदार पांघरुण वगैरे प्रयत्नांनी शरीराला उष्मा (ऊब) मिळेल असे पाहावे.
शीतत्व टाळण्याच्या दृष्टीने अंगावर ऊबदार कपडे घालणे हा झाला एक सर्वसाधारण नियम. पावसाळ्यात कफ़विकार,श्वसन-रोग,वातविकार,संधिविकारांनी त्रासणार्या रुग्णांनी या सल्ल्याचे पालन कटाक्षाने केले पाहिजे. श्वसनविकाराच्या रुग्णांनी छाती-गळा-कान झाकले जातील याची काळजी घ्यावी आणि नाक-चेहर्यावर थेट थंडगार वारे लागणार नाहीत,असे पाहावे. संधिविकाराच्या रुग्णांनी सांधे ,विशेषतः दुखणारे-सुजलेले सांधे, ऊबदार कपड्यांनी झाकावे. हा सल्ला रात्री पाळणे अधिक महत्त्वाचे.कारण झोपताना पंखा लावला जातो,मात्र रात्री तापमान कमी झाले की खोलीतला थंडावा वाढतो व तो त्रासदायक होतो. वातानुकूलित (एअरकंडिशन्ड ) खोलीमध्ये झोपणाऱ्यांचे हाल तर विचारू नका. पावसाळ्यात बाहेरचे वातावरण थंड असताना पुन्हा खोलीतले वातावरण अजून थंड करण्याची गरज काय?अशाप्रकारे पावसाळ्यातल्या गार वातावरणातही रात्रभर जे आपल्या खोलीमध्ये थंडावा वाढवतात त्यांना रात्री वारंवार लघवीसाठी उठावे लागणे, सकाळी उठल्यावर सांधे-कंबर धरणे, उठल्या उठल्या शिंका सुरु होणे, नाक वाहणे, नाक चोंदणे, थंडी वाजून ताप येणे वगैरे तक्रारी त्रस्त करतात. अशा मंडळींना एसीच्या गार वातावरणात राहणे हे आपल्या अनेक तक्रारींचे कारण आहे, हेसुद्धा माहित नसते. दुर्दैव त्यांच्या आरोग्याचे!