What happens to body if you sit AC room all day : अलीकडे उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी एसीचा वापर वाढला आहे. अनेकांच्या घरीही एसी आणि ऑफिसमध्येही एसी. लोकांना एसीची इतकी सवय झाली आहे की, प्रवास करायचा म्हटला तरी एसी बस किंवा कॅब वापरली जाते. मात्र, तुम्हाला माहीत आहे की, रोज आणि दिवसभर एसीमध्ये राहिल्यानं तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो? हैदराबाद येथील केअर हॉस्पिटल्सचे सल्लागार पल्मोनोलॉजिस्ट डॉ. सतीश सी. रेड्डी यांनी सतत एसीमध्ये राहिल्यानं तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. तसेच घरामध्ये थंड आणि निरोगी वातावरण राखण्याच्या काही टिप्सही सांगितल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एसीमुळे आपण घरातील तापमान नियंत्रित करू शकतो; मात्र एसीमुळे सर्वांत मोठी होते समस्या होते ती आपल्या शरीराला स्वच्छ हवा न मिळणे. एसी ऑन करण्याआधी आपण खिडक्या-दरवाजे बंद करतो. या कारणाने खोलीमध्ये तेवढ्याच परिसरात हवा बंद होते; ज्यामुळे आपल्या शरीराला स्वच्छ हवा मिळत नाही. हल्ली आधुनिक एसी सिस्टीममध्ये धूळ, परागकण व हवेतील इतर कण काढून टाकणारे फिल्टर समाविष्ट आहेत. त्यामुळे घरातील हवेची गुणवत्ता सुधारते आणि श्वसनाच्या समस्यांचा धोकाही कमी होतो. पण, आपल्यासभोवतालचे असे वातावरण दीर्घकाळ फायदा देऊ शकत नाही

एसीमध्ये सतत राहिल्याने शरीरावर होणारे दुष्परिणाम

डॉ. रेड्डी यांच्या मते, थंड खोलीत सातत्याने राहण्यामुळे होणारे दुष्परिणाम खालीलप्रमाणे :

डिहायड्रेशन : एसीमध्ये जास्त वेळ बसल्याने डिहायड्रेशन होऊ शकते. त्यामुळे स्वत:ला हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या.

कोरडी त्वचा आणि सर्दीचा त्रास : एसीमध्ये जास्त वेळ बसल्याने त्वचा कोरडी होते. तसेच सततच्या थंडीमुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होऊ शकते; ज्यामुळे तुम्हाला सर्दी होण्याची अधिक शक्यता असते.

श्वासोच्छ्वासाच्या समस्या : सतत एसीमध्ये बसल्याने अॅलर्जी निर्माण होऊ शकते; ज्यामुळे श्वसनाच्या समस्या उद्भवू शकतात. थंड तापमानामुळे स्नायू आणि सांधे कडक होऊ शकतात, विशेषतः जर तुम्ही जास्त हालचाल करीत नसाल, तर कालांतराने तुमच्या शरीराला सतत एसीमध्ये बसण्याची सवय होऊ शकते; ज्यामुळे नैसर्गिक हवेत राहणे कठीण होते.

एसीमुळे आपल्याला काही फायदे नक्कीच होतात; पण यामुळे होणारे नुकसानही जास्त आहे. आपण आराम मिळावा म्हणून अशा प्रकारे यात इतके गुंतून जातो की, आरोग्याकडे लक्षच देत नाही. मग साहजिकच यामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागते. त्यामुळे आपण एसीचा वापर फारच काळजीपूर्वक करायला पाहिजे.

हेही वाचा >> झोप नाही तर गाढ झोप घेणं आहे गरजेचं; नाईट शिफ्टमध्ये काम करत असाल तर डॉक्टरांनी दिलेला सल्ला एकदा पाहा

एसीचा योग्य वापर कसा करायचा?

पूर्णपणे एसी बंद करणे गरजेचे नाही. मात्र, हायड्रेशन ही मुख्य गोष्ट आहे. एसीच्या कोरडेपणाच्या प्रभावाचा सामना करण्यासाठी भरपूर पाणी प्या. तुमच्या शरीराला वेगवेगळ्या तापमानांशी जुळवून घेण्यासाठी घराबाहेर किंवा नैसर्गिकरीत्या हवेशीर भागात फिरायला जा. धूळ, बुरशी व जंतू रोखण्यासाठी तुमचा एसी नियमितपणे स्वच्छ करण्यासह त्याची देखभाल करा. तुमची त्वचा हायड्रेटेड आणि निरोगी ठेवण्यासाठी मॉइश्चरायझर वापरा. या सोप्या टिप्स वापरून आपण एसीमध्येही ताजेतवाने राहून आनंद घेत, घरात थंड आणि आरोग्यदायी वातावरण तयार करू शकता.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ac side effects know what happens to the body if you sit in an ac room all day every day srk