Vicky Kaushal Weight Gain for Chhaava: बॉलीवूड अभिनेता विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्याच्या या चित्रपटात अभिनेता छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकरतो आहे आणि याच भूमिकेसाठी त्याने तब्बल २५ किलो वजन वाढवले आहे. यादरम्यान, विकी कौशलने त्याच्या ट्रान्सफर्मेशनबद्दल सांगितले.
“मी केलेला शेवटचा ॲक्शन चित्रपट ‘उरी’ होता. तेव्हापासून मला पुन्हा एकदा अॅक्शन चित्रपट करण्याची संधी मिळावी यासाठी मी धडपडत होतो. मला माहीत नव्हते की ते मला घोड्यावर बसवतील किंवा तलवार चालवायला देतील. पण, सर्व काही माझ्यासाठी नवीन होते. मला घोडेस्वारी माहीत नव्हती, म्हणून मी तलवारबाजी आणि भाल्याच्या लढाईसह त्यासाठी प्रशिक्षण घेतले, प्रत्येक गोष्टीत सहा-सात महिन्यांचे योग्य प्रशिक्षण समाविष्ट होते. त्यादरम्यान मी ८० किलोवरून १०५ किलोपर्यंत गेलो,” असे विकी कौशलने चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी सांगितले.
“ते जीवन जगण्यापेक्षा संस्कृती, इतिहास आणि मूल्ये समजून घेणे ही चित्रपटाची सर्वात मोठी कमाई होती आणि ती गोष्ट मी कधीही विसरणार नाही,” असेही कौशल पुढे म्हणाला.
हा संकेत घेऊन, व्यावसायिक उपक्रमांसाठी वजन कसे वाढवायचे ते समजून घेऊ.
जेव्हा एखाद्या व्यक्तीचे वजन वाढते, तेव्हा शरीराचा आकार आणि फॅट्सच्या पेशींची संख्या वाढते. किरकोळ वजन वाढणे (२ किलोपर्यंत) हे सहसा पाणी टिकवून ठेवणे किंवा पौष्टिक समायोजन यांसारख्या घटकांना कारणीभूत ठरू शकते. “अधिक प्रमाणात वजन वाढणे, जर पुरेसे निरीक्षण केले नाही तर इन्सुलिन प्रतिकाराशी जोडलेले आहे”, असे डॉ. स्वाती गायकवाड, सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ मातृत्व रुग्णालय, पुणे, म्हणाल्या.
नियमित व्यायाम आणि निरीक्षण केलेल्या आहाराद्वारे या मूळ समस्येचे निराकरण करून, वजन प्रभावीपणे व्यवस्थापित करणे शक्य आहे.
काय लक्षात घ्यावे?
पौष्टिक समायोजन : सोडियम, साखर आणि अनहेल्दी फॅट्स असे प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा. त्याऐवजी फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि पातळ प्रथिनेसमृद्ध आहार निवडा, असे डॉ. गायकवाड म्हणाल्या.
नियमित व्यायाम : आपल्या दैनंदिन दिनचर्येत शारीरिक हालचालींचा समावेश करा. कार्डिओ, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि योगा यांसारख्या उपक्रमांमुळे चयापचय वाढण्यास, वजन नियंत्रित करण्यास आणि नंतर कमी होण्यास मदत होते, असे डॉ. गायकवाड म्हणाल्या.
जीवनशैलीतील बदल : निरोगी वजनासाठी स्ट्रेस मॅनेजमेंट, पुरेशी झोप आणि एकूणच आरोग्य याला प्राधान्य द्या. जीवनशैलीत बदल करून व्यक्ती वजन वाढण्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन करू शकतात आणि त्यांच्या एकूण जीवनाची गुणवत्ता सुधारू शकतात.
फिटनेस ट्रेनर वरुण रतन यांनी सांगितले की, “व्यावसायिक असाइनमेंटसाठी वेगाने वजन वाढवण्यासाठी “उच्च-कॅलरी आहाराला इंटेन्स वर्कआउट्स आणि स्ट्रॅटेजिक रिकव्हरी” सोबत जोडणे आवश्यक आहे. त्याने एक सॅंपल मील आणि वर्कआउट प्लॅनदेखील शेअर केला.
मील प्लॅन
- दररोज एकूण ४,०००-६,००० कॅलरीजचे ५-६ मील घ्या.
- पातळ प्रथिने (चिकन, मासे, अंडी), कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट (रताळे, तपकिरी तांदूळ) आणि निरोगी चरबी (अवोकॅडो, नट्स) वर लक्ष केंद्रित करा.
- जेवणादरम्यान प्रोटीन शेकचा आणि मास गेनर्सचा समावेश करा.
- कॅलरी द्रव स्वरूपात वापरा. पीनट बटर किंवा बदाम बटर यांसारख्या चरबीयुक्त स्मूदीज निवडा.
व्यायामाची पद्धत
- आठवड्यातून पाच-सहा दिवस ट्रेन करा, प्रमुख मसलवर लक्ष द्या.
- कंपाऊंड हालचालींवर जोर द्या : स्क्वॉट्स, डेडलिफ्ट्स, बेंच प्रेस, रनिंग
- हेवी लिफ्टिंग (३-५ रिप्स) आणि हायपरट्रॉफी वर्क (८-१२ रिप्स) दोन्ही समाविष्ट करा.
- सुपरसेट, ड्रॉप सेट आणि प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड यासारखी तंत्रे वापरा.
सप्लिमेंट्स आणि रिकव्हरी
- स्नायू रिकव्हरीसाठी व्हे आणि केसीन प्रोटीन
- ताकद आणि मसल व्हॉल्यूमसाठी क्रिएटिन मोनोहायड्रेट
- एनर्जी आणि फोकससाठी प्री-वर्कआउट
- ओमेगा 3 आणि अश्वगंधा स्नायूंचे संरक्षण आणि पुनर्प्राप्तीसाठी
- ८-९ तासांच्या झोपेला प्राधान्य द्या