जंक फूड खाणे आरोग्यासाठी वाईट आहे हे सर्वांनाच माहीत आहे. तरीही आपण सातत्याने अल्ट्रा-प्रोसेस्ड, पॅकबंद खाद्यपदार्थांचा वापर करीत असतो. लहान वयात मुलांच्या आहारात आरोग्यासाठी हानिकारक फॅट्स, प्रिझर्व्हेटिव्ह व अ‍ॅडिव्हेटिव्हज् पदार्थांचा समावेश होतो. जंक फूड सेवनामुळे सतत काहीतरी खाण्याची लालसा वाढते आणि ही लालसा दीर्घकाळ राहू शकते.

‘नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन’मध्ये प्रकाशित २०२४ च्या अभ्यासानुसार, “जंक फूड, गोड व अल्कोहोलयुक्त पेये यांचा समावेश मेटाबॉलिक सिंड्रोमचा मोठा धोका असलेल्या खाद्यपदार्थांच्या श्रेणीमध्ये केला जातो; जी आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम करू शकतात. तसेच असंतुलित आणि बैठी जीवनशैली असलेल्या व्यक्तीने दीर्घकाळपर्यंत जंक फूडचे अतिसेवन केल्यास अकाली मृत्यूचा धोका वाढू शकतो.

Eating Papaya With Seeds know benefits risks from experts
पपईच्या बिया फेकताय? तज्ज्ञांनी सांगितले पपई बियांसह खाण्याचे फायदे; पण खायचे कसे हे पाहा आधी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Jaggery in India
जागतिक स्तरावर केले जाते आरोग्यदायी गुळाचे सेवन; घ्या जाणून…
bhakri
भाकरी थापताना नेहमी मोडते, भाजताना चिरते का? टेन्शन घेऊ नका; टम्म फुगलेली मऊसूत ज्वारीची भाकरी बनवा, फक्त या सोप्या टिप्स वापरून पाहा
Nutrition Diet , Maharashtra School, Sweet Food ,
पोषण आहार बदल! साखर लोकांना मागा पण गोडधोड खाऊ घाला, अनुदान नाहीच
Gut health expert claims taking 16 spoons of ghee daily keeps
“मी दिवसातून १६ चमचे तूप खातो”, आतड्याच्या आरोग्यतज्ज्ञांनी केला दावा; पण, हे खरंच योग्य आहे का? वाचा, पोषणतज्ज्ञांचे मत…
do you know Why dogs eat their own poop sometimes expert Answered
श्वान कधीकधी स्वतःची विष्ठा का खातात? तज्ज्ञांनी सांगितले कारण….
Ashutosh Joshi Konkan Nature Raigad
…एक पत्थर तो तबियत से उछालो यारो

कोणते घटक जंक फूडचे व्यसन निर्माण करतात?

या संदर्भात द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना क्लिनिकल आहारतज्ज्ञ व प्रमाणित मधुमेह प्रशिक्षक कनिका मल्होत्रा यांनी सांगितले, “जंक फूडमध्ये असलेल्या विविध घटकांमुळे त्याचे व्यसन लागू शकते.”

जैविक घटक
जंक फूडमध्ये साखर, मीठ व आरोग्यासाठी हानिकारक फॅट्स यांसारखे व्यसनाधीन करणारे काही घटक (addictive substances) असतात ज्यामुळे मेंदूमध्ये डोपामाइन सोडण्यास चालना मिळते. एकंदरीत यातून जंक फूड सतत खाण्याची इच्छा वाढते ते सतत खाण्याची सवय लागू शकते.

मानसशास्त्रीय घटक
Emotional eating म्हणजेच तणाव, कंटाळवाणेपणा आणि मनःस्थिती चांगली नसणे अशा नकारात्मक भावना दूर करण्यासाठी जलद व सोपा उपाय म्हणून जंक फूड खाण्यामुळे आराम मिळू शकतो. तात्कालिक आराम देणारा जलद व सोपा उपाय म्हणून जंक फूडचा पर्याय अवलंबला जातो.

पर्यावरणाचे घटक
जंक फूड परवडणाऱ्या किमतीमध्ये बाजारात सहजपणे उपलब्ध होते आणि आक्रमक मार्केटिंगमुळे जंक फूडचे सेवन सामान्य होऊ शकते. त्यामुळे व्यग्र जीवनशैलीतही तो एक सोईस्कर पर्याय बनतो.

सामाजिक घटक
मित्र-मैत्रिणींसह वेळ घालविताना निर्माण होणारा दबाव, सांस्कृतिक नियम आणि लग्न समारंभ अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे यांमुळे बहुतेकदा जंक फूडचे सेवन वाढू शकते. यातूनच एखाद्याला सतत जंक फूड खाण्याची सवय लागू शकते.

हेही वाचा – रसाळ, लाल दाणे असलेले डाळिंब कसे ओळखावे? उत्तम प्रकारे पिकलेले डाळिंब कसे निवडावे? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स

जंक फूड खाण्याची सवय सोडणे एखाद्यासाठी अनेकदा कठीण का असते?

कोणत्याही प्रकारच्या व्यसनावर पूर्णपणे मात करणे कठीण आहे. जंक फूडचे व्यसन हे त्यापैकीच एक आहे. अनेकांना आरोग्यास हानिकारक खाद्यपदार्थ खाणे थांबवायचे असते; पण ते स्वत:ला रोखू शकत नाहीत. मल्होत्रा यांच्या मते, अनेक कारणांमुळे तुमची लालसा सोडणे आव्हानात्मक असू शकते.

शारीरिक अवलंबित्व
नियमितपणे जंक फूडचे सेवन केल्यास एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या अवलंबून राहू शकते. कारण- त्यातील काही घटक काहीतरी खाण्याची लालसा किंवा सतत बदलणारे मूड शांत करू शकतात.

सवय
जंक फूडचे दीर्घकाळ सेवन करण्यातून लागलेली सवय मोडणे पुढे कठीण होऊन बसते.

मानसिक अवलंबित्व
काही खाद्यपदार्थांच्या बाबतीत आपण भावनिकरीत्या जोडलेले असतो. त्यामुळे निरोगी आहार पद्धतींचा अवलंब करणे मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरू शकते.

सामाजिक दबाव
जंक फूडच्या सेवनाला प्रोत्साहन देणारे किंवा ते सेवन सामान्य करणाऱ्या सामाजिक वातावरणामुळे जंक फूड खाण्याची सवय लागते. मग ती सवय सोडणे आणि आरोग्यदायी बाबींची निवड करणे कोणत्याही व्यक्तीसाठी अवघड होऊ शकते.

हेही वाचा – तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय

जंक फूडची सवय सोडण्यासाठी काय करावे?

जंक फूड खाण्याची सवय सोडण्यासाठी धडपडणाऱ्या व्यक्तींना मल्होत्रा यांनी सुचविलेल्या गोष्टी खालीलप्रमाणे :

हळूहळू बदल करा
आपल्या आहारात अधिक संपूर्ण आणि पौष्टिक घटकांनी समृद्ध अशा आहाराचा समावेश करा. जंक फूडचा वापर हळूहळू कमी करण्यास सुरुवात करा.

जेवणाचे नियोजन करा
आहारात आरोग्यदायी जेवण आणि स्नॅक्स असावे याची आधीच योजना आखा आणि त्याप्रमाणेच आहार घ्या. यामुळे तुमची स्वयंपाक करण्याची सवय विकसित होईल; जी दररोज जंक फूड खाणे टाळण्यास मदत करील.

मन लावून खाणे
भुकेच्या संकेतांकडे लक्ष द्या. भूक लागल्यानंतर जेवण करा. प्रत्येक चवीचा आस्वाद घ्या. तुम्ही जर कोणत्याही भावनिक कारणामुळे जास्त खात असाल, तर त्याबद्दल जागरूक राहा.

मदत घ्या
जंक फूड व्यसनमुक्तीच्या गटामध्ये सामील व्हा. पात्र वैद्यकीय आहारतज्ज्ञांची मदत घ्या किंवा निरोगी खाण्याच्या सवयींच्या दिशेने करावयाच्या तुमच्या प्रवासात मित्र आणि कुटुंबीयांची मदत घ्या.

निरोगी पर्याय शोधा
तुमच्या आवडत्या जंक फूडसाठी आरोग्यदायी पर्याय कोणते आहेत ते ओळखा. घरगुती तयार केलेले स्नॅक्स किंवा हेल्दी स्नॅक्स पर्याय आज बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत.

Story img Loader