Baking Soda Water: काही वर्षांपासून भारतातील शेती उद्योगात कीटकनाशकांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे, ज्यामुळे आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होण्याची चिंता निर्माण झाली आहे. उत्पादनांवर अल्कधर्मी वॉश आणि सेंद्रिय लेबले लावली जात असली तरी कीटकनाशकांच्या विषारी परिणामांमुळे शास्त्रज्ञ चिंतेत आहेत.

अलीकडेच, इन्स्टाग्रामवर एक व्हायरल रील समोर आली आहे, त्यामध्ये असा दावा केला गेलाय की, पिण्याच्या पाण्यात चिमूटभर बेकिंग सोडा टाकल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. “कारण त्यात ग्लायफोसेटची खूप जास्त ओढ असते, जी राउंडअप असते”.

व्हिडीओमधील कंटेंट क्रिएटरच्या मते, “तुम्ही जरी सेंद्रिय पदार्थ खाल्ले आणि फिल्टर केलेले पाणी प्यायले तरी ग्लायफोसेट हे एक असे न्यूरोटॉक्सिन आहे, जे लिम्फोमा, कर्करोग, पार्किन्सन आणि अगदी एमएस यांसारख्या गोष्टींशी जोडलेले आहे”. या व्हिडीओत तिने हे विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी दररोज पाण्यात एक चिमूटभर किंवा चमच्याचा आठवा भाग बेकिंग सोडा टाकण्याची शिफारस केली.

पॅकेजिंगवर एक नजर टाकल्यास दोन्ही उत्पादनांमधील फरक दिसून येतो. बेकिंग सोड्यात सोडियम हायड्रोजन कार्बोनेट हा एक घटक असतो. त्याला सोडियम बायकार्बोनेट किंवा फक्त बायकार्ब, असेही म्हणतात. बेकिंग सोडा स्वच्छता, स्वयंपाक आणि एक दुर्गंधीनाशक पदार्थ म्हणून वापरण्यासाठी प्रसिद्ध आहे.

आम्ही उत्सुकतेने याबाबतच्या काही स्पष्टतेसाठी आरोग्य तज्ज्ञांकडे वळलो.

चेन्नईतील प्रॅग्मॅटिक न्यूट्रिशनच्या मुख्य पोषणतज्ज्ञ मीनू बालाजी म्हणाल्या की, ग्लायफोसेट हे अनेक देशांमध्ये वापरले जाणारे तणनाशक आहे. पचन समस्या आणि कर्करोग होण्याचा धोका वाढण्याशी त्याचा संबंध असल्याने अलीकडच्या काळात त्यावर टीका झाली आहे .

“काही अभ्यासांतून असे दिसून आले आहे की, बेकिंग सोडा उत्पादनाच्या पृष्ठभागावरून ग्लायफोसेट काढून टाकू शकतो. कारण- ग्लायफोसेट अल्कधर्मी माध्यमात स्थिर नाही; परंतु याचे आमच्याकडे ठोस वैज्ञानिक पुरावे नाहीत. जरी बेकिंग सोडा पृष्ठभागावरून ग्लायफोसेट काढून टाकत असला तरी ग्लायफोसेट एक तणनाशक आहे. याचा अर्थ असा की, ते ऊतींमध्ये आणि वनस्पतीच्या इतर भागांमध्येदेखील आढळते,” असे ती म्हणाली.

ग्लायफोसेट काढून टाकण्याचे इतर कोणते मार्ग आहेत?

बालाजी यांनी नमूद केले की, ग्लायफोसेटच्या स्वरूपामुळे इतर मार्ग तितके प्रभावी नसले तरी काही फळे सोलून खाल्ली तर याबाबत मदत होऊ शकते. “अँटीऑक्सिडंट्स आणि सल्फोराफेनसमृद्ध अन्न समाविष्ट केल्याने यकृताच्या कार्याला चालना देऊन हे विषारी पदार्थ काढून टाकता येतात. जर तुम्हाला दूषित नसलेले पदार्थ खायचे असतील, तर सेंद्रिय पदार्थ शोधा. तुम्ही ग्लायफोसेट रेसिड फ्री लेबल असलेली उत्पादनेदेखील तपासून पाहू शकता,” असे त्या म्हणाल्या.