“मॅम मला ड्राय निडलिंग घ्यायचं आहे, माझे मानेचे स्नायू आखडले आहेत आणि फार वेदना होत आहेत” , ३२ वर्षे वयाचा सॉफ्टवेअर इंजिनीयर असलेला तरुण मला सांगत होता. “मला १५ मिनिटांपेक्षा जास्त एक स्थितीत बसता येत नाही, रात्री आणि सकाळी उठल्यावर मान आणि पाठ आखडून जाते. मला खूप त्रास होतो आहे.” त्यावर मी म्हटलं, “आपण बघूया ड्राय निडलिंगची गरज आहे का, पण त्याआधी मला हे जाणून घ्यायचं आहे की, तू कोणत्या प्रकारचं काम करतोस?, खूप वेळ एक ठिकाणी बसून किंवा एका स्थितीत राहून काम करावं लागतं का?”

“हो! रोजच, अहो इंजिनीयर आहे मी”, त्याने अधीरपणे उत्तर दिलं.
“रोज काही व्यायाम करतोस का ? कॅल्शियम, बी १२, या चाचण्या कधी केल्या होत्या?”
“व्यायाम कधी करतो, कधी नाही, जिमला जात होतो, मग सोडून दिलं चाचण्या कधी केलेल्या ते आठवत नाही. माझ्या वेदना कमी झाल्या पाहिजेत बास्स. मी इतका बिझी असतो मला वेळही मिळत नाही. खूप दुखलं की, मी एखादी पेनकिलर घेत असतो आणि परवा इन्स्टाग्रामवर रील पहिलं त्यात निडल्स घालून आखडलेला स्नायू एकदम मोकळा झालेला पहिला. मला तसंच करायचं आहे म्हणजे माझी मान मोकळी होऊन जाईल!”

Drinking water with food
जेवताना पाणी पिणे खरंच फायदेशीर आहे? जाणून घ्या, पाणी प्यायल्याने पचनक्रियेवर कसा होतो परिणाम?
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
What changes does arthritis cause in the body
Health Special: आर्थरायटिसमुळे शरीरात काय बदल होतात?
Future medical directives
रुग्णशय्येवरील उपचारांबाबत इच्छापत्रानुसार निर्णय
The ultimate vitamin cheat sheet: Top foods packed with vitamins A to K for better health
केस गळतात? चिडचिड होते? ‘या’ व्हिटॅमिन्सची असू शकते कमतरता; कोणते व्हिटॅमिन्स शरीरात काय काम करतात? घ्या जाणून…
cancer vaccine marathi news
विश्लेषण: कर्करुग्णांसाठी आशेचा किरण? नवी लस लवकरच उपलब्ध होणार?
cardiac arrest, organ transplants, life support,
अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेतील व्यक्तींना आशेचा किरण! हृदयक्रिया बंद पडलेल्या रुग्णांमुळे मिळेल जीवदान
loksatta analysis indian government new draft guidelines on passive euthanasia
विश्लेषण : इच्छामरणासाठी भारत सरकारकडून मसुदा मार्गदर्शक तत्त्वे तयार… काय आहेत प्रस्तावित तरतुदी?

हेही वाचा…दिवसातून एकदाच जेवण अन् मध्यरात्री ३ वाजता व्यायाम; अभिनेता शाहरुख खानचा ‘हा’ फिटनेस फंडा खरंच फायदेशीर आहे का? वाचा तज्ज्ञांचे मत

शारीरिक, मानसिक, दैनंदिन, सामाजिक आणि भावनिक अशा विविध घटकांच्या कमी- अधिक योगदानाने निर्माण होणाऱ्या वेदनेचं ऑनलाइन रील्स पाहून केलेलं इतकं सोप्पं निराकरण बघून मी थक्क झाले! “हे बघ, मानेच्या वेदना कमी करण्यासाठी ड्राय निडलिंग करता येईल, पण त्याचा उपयोग हा फक्त वेदना तात्पुरती कमी करण्यासाठी होईल. आपल्याला वेदना कायमची बरी तर करायची आहेच, पण त्यासोबत तुझं पॉस्चर सुधारायचं आहे, मानेच्या आणि पाठीच्या स्नायूंची कार्यक्षमता वाढवायची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं या वेदनेमुळे कमी होणारी जगण्याची गुणवत्ता वाढवायची आहे. यासाठी आधी मला महत्वाच्या स्नायूंची कार्यक्षमता पाहावी लागेल, त्यानुसार आपल्याला व्यायाम करावे लागतील, तुझा आहार, जीवनशैली, झोप यात बदल करावे लागतील. तुझे बैठ्या कामाचे तास कमी करावे लागतील, कामाची पद्धत बदलावी लागेल आणि सगळ्यात महत्वाचं व्यायामाला आयुष्याचा भाग करावं लागेल.”

हे सगळं समजावल्यावर मात्र हा तरुण विचारात पडला, वेगवेगळ्या प्रकारची वेदनाशमन करणारी उपकरणे, (अल्ट्रासाऊंड, ट्रान्सकयूटॅनियस नर्व स्टीमुलेटर, लेसर आणि अशी बरीच उपकरणं) किंवा अगदी अलीकडच्या काळात उदयास आलेली निडलिंग, कपिंग सारख्या उपचार पद्धती हे खरं तर वरदानच म्हणायला हवं, कारण या सगळ्या पद्धती (निडलिंग वगळता ) नॉन-इनवॅसिव आहेत. आणि वेदनेची तीव्रता कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. मग प्रश्न कुठे येतो?

हेही वाचा…उकडलेल्या बटाट्यांपेक्षा थंड केलेले बटाटे खाणे आरोग्यदायी आहे का? तज्ज्ञांनी केला खुलासा

या उपचार पद्धती निश्चितपणे वेदनेची तीव्रता कमी करून रुग्णाला आराम देऊ शकतात पण त्या वेदनेवरचं कायमस्वरूपी उत्तर होऊ शकत नाहीत.

बहुतेकवेळा रुग्ण या उपकरणांच्या वेदनाशमक फायद्यांमुळे पूर्णपणे आकर्षित होतात, बरं होण्याच्या प्रवासातली ही सुरुवातीची पायरी आहे आणि आपल्याला पुढच्या अर्थपूर्ण पायऱ्या चढायच्या आहेत याचा त्यांना विसर पडतो. खाली दिलेले एक किंवा अनेक गैरसमज रुग्णांना होऊ शकतात…

-आपली वेदना ही फक्त अमुक एक उपकरणानेच पूर्ण बरी होऊ शकते.
-आपल्या वेदनेवर आपलं काहीच नियंत्रण नाही किंवा मला स्वतःला वेदना कमी करण्यासाठी कोणतेही प्रयत्न करण्याची गरज नाही.
-आपल्याला वेदना कमी करायची असेल तर अमुक एक प्रकारची उपकरणं किंवा उपचार पद्धती कायमस्वरूपी घ्यावी लागेल.
-मी अशाच डॉक्टरकडे किंवा क्लिनिकमध्ये उपचार घ्यायला हवेत जिथे अमुक एक प्रकारची उपकरणं किंवा उपचार पद्धती उपलब्ध आहे.
-व्यायाम, आहार, झोप यात बदल केल्याने मला होत असलेल्या वेदनेत कोणताही बदल होणार नाही.
-हे गैरसमज साहजिकच रुग्णाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर दूरगामी परिणाम करतात.
-अशावेळी रुग्णांनी काही तथ्यं समजून घेणं आवश्यक आहे.

हेही वाचा…one legged balances: तुम्ही दहा सेकंद एका पायावर उभं राहू शकता का? नाही! तर तुमचं आयुष्य होऊ शकतं कमी? वाचा डॉक्टरांचे मत

-वेदना किंवा त्रासातून मुक्त होण्यासाठीची पहिली महत्वाची पायरी म्हणजे उपकरणं वापरुन केले जाणारे उपचार.
-प्रत्येकच वेळी प्रत्येकच रुग्णाला उपकरणांद्वारे उपचाराची गरज असेलच असं नाही.
-हा निर्णय फक्त फिजिओथेरपी डॉक्टर घेऊ शकतात, सोशल मीडिया वर दिसणारे रील्स हे कितीही आकर्षक आणि परिणामकारक ‘दिसले’ तरी ही ते सरसकट सगळ्यांना लागू होऊ शकत नाहीत.
-वेदना कमी करण्यापासून सुरू झालेला हा प्रवास रुग्ण-केंद्रित व्यायाम, पेन एज्युकेशन, जीवनशैलीतील बदल, क्रमाने अवघड होत जाणारे व्यायाम आणि दैनंदिन जीवनाची गुणवत्ता अशी वळण घेत पूर्ण होणं अपेक्षित आहे.
-वेदनाशमक उपचारांमुळे केवळ ‘रिसीवर्’ म्हणून असलेली रुग्णाची भूमिका हळूहळू वाढत जाऊन जास्त अॅक्टिव होत जाणं आणि शेवटी रुग्णाने पूर्ण स्वयंपूर्ण होऊन गुणवत्तापूर्ण आयुष्य जगणं हे फिजिओथेरपी उपचारांचं ध्येय आहे.