नवरात्रीदरम्यान भेसळयुक्त कुट्टूच्या पिठ्ठाचे सेवन केल्यानंतर उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये १५० हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, मथुरा येथील अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन (एफएसडीए) ने चाचणीसाठी विविध बाजारांमधून कुट्टूच्या(बकव्हीट) आणि शिंगाडा (वॉटर चेस्टनट) पिठासह १० नमुने गोळा केले आहेत. “अहवाल प्राप्त झाल्यानंतर, अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, २००६ अंतर्गत योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे पीटीआयने सहायक आयुक्त (अन्न) धर्मेंद्र प्रताप सिंग यांच्या हवाल्याने सांगितले.

या घटनेच्या पाश्वभूमीवर कुट्टूच्या पिठातील भेसळ आणि त्याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो याबद्दल अधिक जाणून घेऊया.

Suspension of police, police indecent behaviour with girl,
पुणे : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Manghar Transformation into India First Honey Village in crisis
महाबळेश्वरमधील ‘मांघर’च्या मधमाश्यांवर संकट
liquor Nashik district, Illegal liquor stock Nashik district,
नाशिक जिल्ह्यात १५ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त
16-year-old boy runs away from home after mother gets angry over mobile phone use
पालकांनो सावध व्हा… मोबाईलचे व्यसन मुलांसाठी ठरू शकते घातक; वाचा काय घडलं ते…
How To Identify Fake Amul Butter Packets Food shocking Video goes Viral on social media
“आता काय जीव घेणार का?” तुम्हीही डुप्लीकेट अमुल बटर खात नाहीये ना? आत्ताच तपासा; VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
Gisele Pelicot
पत्नीवर १० वर्षे ५० हून अधिक लोकांकडून बलात्कार, पती आढळला दोषी; फ्रान्सला हादरवणारे सामूहिक बलात्कार प्रकरण काय?
Dough kept in the refrigerator for a long time dangerous
रेफ्रिजरेटरमध्ये जास्त दिवस ठेवलेली कणीक आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ काय सांगतात…

सहसा नवरात्रीच्या उपवासात पराजगिरा, क्विनोआ, कुट्टू(बकव्हीट) यासारख्या स्यूडोसेरियल्स((खाद्य बिया तयार करणारी वनस्पती जी तांत्रिकदृष्ट्या धान्य किंवा तृणधान्ये नाही) खाल्ले जातात. या शुभ काळात वापरल्या जाणाऱ्या इतर धान्याच्या पिठांमध्ये सिंघाड्याचे पीठाचा वापर केला आणि वरई (Samak) यांचा समावेश होतो. तज्ज्ञांनी असे सुचवले आहे की, “या धान्य पिठांमध्ये समानता अशी आहे की, ते सर्व ग्लूटेन-मुक्त आहेत आणि त्यात बरेच पोषक तत्व असतात.

मुंबईमध्ये झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटल, आहारतज्ज्ञ जिनल पटेल यांनी स्पष्ट केले की,”भेसळयुक्त कुट्टू पिठाचा अर्थ असा होतो की. त्यात स्वस्त घटक किंवा धान्य, रसायने किंवा परदेशी पदार्थ मिसळले जातात. “भेसळयुक्त कुट्टू पीठाचे सेवन केल्याने आरोग्यास विविध धोके निर्माण होतात आणि एखाद्याला गॅस, अतिसार, बद्धकोष्ठता, पोटदुखी आणि मळमळ यासारख्या पाचक समस्या होऊ शकतात. संवेदनशील पोट असल्यास आणि गंभीर ऍलर्जी असलेल्या लोकांनी भेसळयुक्त कुट्टू पीठ खाणे टाळावे कारण त्यामुळे त्यांना ऍलर्जी होऊ शकते.”

तुम्हाला जर ही लक्षणे दिसू लागली तर पुढील निदानासाठी डॉक्टरांना भेटणे महत्त्वाचे ठरते.

“किरकोळ गैरसोय म्हणून याकडे दुर्लक्ष केल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. चांगले मूल्यांकन करण्यासाठी तुमचे डॉक्टर रक्त आणि स्टूल ( stool tests) चाचण्यांसह विविध चाचण्या सुचवू शकतात. या चाचण्या तुमच्या डॉक्टरांना या लक्षणांमागील नेमके कारण ओळखण्यात मदत करू शकतात,” पटेल म्हणाले.

धर्मशिला येथील नारायण हॉस्पिटलच्या मेडीकलचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, वरिष्ठ सल्लागार, डॉक्टर महेश गुप्ता यांच्या मते,”डॉक्टर शरीरातील विष किंवा दूषित घटक ओळखण्यासाठी चाचण्या करू शकतात.”

हेही वाचा – भारतात Instagram बंद पडल्याने वापरकर्ते हैराण! #instagramdown हॅशटॅग होतोय ट्रेंड

पटेल यांच्या मते,” उपचाराच्या पर्यायामध्ये पुरेसे द्रव पिऊन शरीरातील पाण्याची पातळी राहणे समाविष्ट असू शकते, कारण अतिसारसारख्या पाचक समस्यांमुळे तुम्हाला सहज निर्जलीकरण(पाण्याची पातळी कमी) होऊ शकते. म्हणूनच कुट्टूचे पीठ खरेदी करताना योग्य आणि आरोग्यदायी निवड करणे अत्यावश्यक ठरते. तुमची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ताजे आणि शुद्ध खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या अस्सल आणि विश्वासार्ह किराणा दुकानातून तुम्ही कोणतेही खाद्यपदार्थ खरेदी केल्याची खात्री करा,”.

डॉ. गुप्ता पुढे म्हणाले की,”योग्य लेबलिंग आणि गुणवत्ता प्रमाणपत्रे तपासली पाहिजेत आणि विकृत किंवा दुर्गंधीची सर्व चिन्हे तपासली पाहिजेत. सैल किंवा ब्रँड नसलेले पीठ खरेदी करणे टाळा आणि दूषित होऊ नये म्हणून ते थंड, कोरड्या जागी साठवा,” असे डॉ गुप्ता म्हणाले.

Story img Loader