औषधाविना उपचार: चैत्री पाडवा हा सण प्रभू रामचंद यांच्या लंकेवरील विजयानंतर पुनरागमनाचा आनंद व शालिवाहन शकाचा आरंभ म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी घरोघर गुढी, तोरण, पताका उभारण्याची पद्धत आहे. त्याचबरोबर कडुलिंबाची ताजी पाने प्रत्येकाने खावी, असा धर्माचा सांगावा आहे. चैत्र, वैशाख हा वसंत ऋतूचा काळ आहे. शिशिर ऋतूत साचलेला कफ वसंत ऋतूतील उष्णतेने पातळ होतो. तो वाढून उपद्रव होऊ नये म्हणून या ऋतूत कडुलिंबाची पाने खावीत, असा विचार वर्षप्रतिपदेच्या निमित्ताने सांगितलेला आहे. गौरीतीज व रामनवमीच्या निमित्ताने सुगंधी जाई-जुई, मोगरा, चाफा, गुलाब अशी फुले, दवणा मरवा यांचा वापर केला जातो. रामनवमीला प्रसाद म्हणून सुंठवडा, खरबुजाच्या फोडी, उसाच्या रसाच्या पोळ्या असा प्रघात काही ठिकाणी आहे. चैत्र महिन्यातील पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. त्यानिमित्ताने मारुतीला रुईच्या पानांचे हार घातले जातात.

वैशाख म्हणजे रणरणत्या उन्हाचा, कमाल तपमानाचा महिना. या काळात अक्षयतृतीयेपर्यंत महिलांचे चैत्र, गौरीचे हळदीकुंकवाचे कार्यक्रम चालतात. त्यानिमित्ताने कैरीचं पन्हे, उसाचा रस, लिंबाचे सरबत, काकडी, वाटली डाळ असा थाटमाट असतो. आयुर्वेदीय ऋतूचर्येप्रमाणे या ऋतूत खूप उन्हाळा असल्यास शरीरातील जलद्रव्यांची कमतरता भरून काढण्यास विविध प्रकारची सरबते, खरबूज, खिरव्या, काकड्या, कलिंगड यांचा वापर करावा, असा शास्त्राचा सांगावा आहे. वैशाखातील पौर्णिमा बुद्ध जयंती म्हणून साजरी केली जाते. भारतीय संस्कृतीत पिंपळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘वृक्षाणां अश्वत्थो अहम्!’ असे त्याचे वर्णन गीतेत केले आहे. सिद्धार्थ राजाला बोधिवृक्षाखाली म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली मानवजातीच्या सफल दु:खांच्या कारणांचा शोध लागला अशी कथा आहे. अजूनही खेडोपाडी पिंपळ या पवित्र वृक्षाच्या झाडाखाली खोटे बोलण्याचे धाडस लहान वा थोर गावकरी करीत नाहीत. वैशाखातील अमावस्या शनिजयंती आहे. त्या दिवशी रुईच्या पानांचा वापर गावाबाहेरील शनीच्या देवळात आहे.

Farmers in Washim district are cultivating chia crop along with traditional crops
वाशीम जिल्ह्यात पीक लागवडीच्या नव्या वाटा; ‘या’ पिकाला मिळतोय चांगला भाव
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Artificial Intelligence, Sugarcane Farming, Lokshiwar ,
लोकशिवार : ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता
farmer cabbage farm destroyed
कोल्हापूर : दर घसरल्याने शेतकऱ्याने कोबीवर ट्रॅक्टर फिरवला
Kalyan-Dombivli Municipal corporation,
महाराष्ट्रातून कोठूनही पाहता येणार कल्याण-डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या
When Is Bhogi Celebrated in 2025
भोगीचा सण केव्हा साजरा केला जातो? जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर…
chaturang article
स्थलांतरातून बहरलेली खाद्यसंस्कृती
India’s culture encourages diversity in practice and thought.
चलनी नोटा, वस्त्राचा तुकडा आणि भारतीय थाळी विविधतेत एकतेचं प्रतीक कसं ठरतात?

ज्वारी, बाजरी, नाचणी खा आणि चांगलं आरोग्य कमवा

ज्येष्ठ महिना हा वटपौर्णिमेच्या सणामुळे अतिशय पवित्र मानला गेला आहे. या दिवशी जेथे जमेल तेथे वडाच्या झाडाची पूजा, नाहीच जमले तर वडाच्या फांद्यांची पूजा महिला आवर्जून करतात. आषाढ महिन्यापासून कार्तिक महिन्यापर्यंत सण, उपवास, खाण्यापिण्यावरील निर्बंध, व्रतवैफल्ये यांची रेलचेल दिसून येते. आषाढातील पहिल्या नवमीला कांदेनवमी म्हणून खूप महत्त्व आलेले आहे. आषाढातील पहिला आठवडा म्हणजे नवमीपर्यंत सर्व मंडळी कांद्याचे विविध पदार्थ खाऊन आपल्या पोटाला तृप्त करत असतात. आषाढ शुद्ध द्वादशीपासून चातुर्मास सुरू होतो. आषाढी एकादशीपासून आळंदी एकादशीमुळे विठ्ठलभक्तीचा महिमा सुरू होतो. तुळस म्हणजे साक्षात लक्ष्मी. तिला मातास्वरूपामुळे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळस ही नुसती कफाकरिता उपयुक्त आहे असे नसून घराला घरपण देणारी मातास्वरूपी सर्व कुटुंबाची, परिवाराची काळजी घेणारी असे वर्णन पद्मापुराणात आहे. जेथे जेथे तुळस आहे तेथे अस्वच्छता राहत नाही. आषाढातील अमावास्येला दिव्यांची आरास म्हणून दीपपूजन होते. त्या दिवसापासून आघाडा, दूर्वा, फुले या वनस्पतींचे महत्त्व सुरू होते. लाह्या, आघाडा, दूर्वा वाहून दिव्यांची पूजा केली जाते.

श्रावणातील सर्वच दिवस हे वेगवेगळ्या देवतांच्या पूजेचे आहेत. श्रावणी सोमवार हा शिवामूठ वाहण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा दिवस. त्या दिवशी बेलाची त्रिदळे व पांढरे फूल महादेवाला वाहण्याचा प्रघात आहे. श्रावणातील शुक्रवारी आघाडा, दूर्वा, फुले वाहून जिवतीची पूजा धार्मिक वृत्तीच्या महिलांकडून आवर्जून केली जाते. शनिवारी मारुती व शनिदेवता या दोघांच्या पूजेच्या निमित्ताने रुईच्या पानांना महत्त्व येते. श्रावणातील नागपंचमीच्या दिवशी चुकूनही जीवहत्या होऊ नये म्हणून स्वयंपाकातसुद्धा बऱ्यापैकी काळजी घेतली जाते. या दिवशी पुरणाचे उकडलेले दिंडे खाऊन सण साजरा करण्याचा प्रघात आहे. ज्वारीच्या लाह्या त्यानिमित्ताने सगळ्याच घरांत आणल्या जातात.

आषाढातील पावसाचा जोर संपल्यानंतर श्रावण पौर्णिमेपर्यंत खवळलेला समुद्र बहुधा शांत झालेला असतो. कोकणात, कोळी लोक, मासेमारीवर अवलंबून असणारी मंडळी समुद्रात नारळ टाकून समुद्रपूजन करून आपल्या व्यवसायाला पुन्हा नव्याने दमदार सुरुवात करतात. नारळीभात घरोघर करतात. गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने दूध, दही, लोणी यांची आठवण करून देणाऱ्या श्रीकृष्णाची पूजा होते. दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा वाढत्या उत्साहाचा सण गोपाळकाला खाऊन साजरा केला जातो. श्रावण वद्या चतुर्दशीला बैलपोळ्याच्या निमित्ताने पुरणपोळी बैलांना खायला घालून व त्यानिमित्ताने वर्षभर श्रम करणाऱ्या बैलांचे ऋण मानले जाते.

भाद्रपद तृतीया, चतुर्थी व पंचमी यापासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत अनेक वनस्पती व खाद्य द्रव्यांना धार्मिक व सामाजिक महत्त्व असल्याचे ठायीठायी आढळते. भाद्रपद शुद्ध तृतीयेला काही महिला हरतालिकेचा कडक उपवास करतात. दिवसभर पूर्ण निर्जळी उपवास करून रात्रौ रुईच्या पानाला तूप लावून ते रात्री १२ वाजता चाटून खाण्याचा प्रघात अजूनही अनेक महिला करतात. एरवी अन्य महिला फलाहार करतात. गणेशचतुर्थीच्या निमित्ताने दूर्वा, केवडा, कमळ, शमी, रुई, आघाडा, धोत्रा, डोरली, देवदार, दवणा, जुई, मालती, माका, बेल, अगस्ती, डाळिंब, कण्हेर, पिंपळ, विष्णुकांता, जास्वंद इ. वनस्पती आपल्या परिसरात असाव्यात असा उद्देश यामागे आहे.

ऋषीपंचमीच्या निमित्ताने आपल्या परिसरात आपल्या हाताने लावलेल्या स्वकष्टाच्या भाज्या व फळधान्याचा वापर करावा असा उद्देश दिसून येतो. भाद्रपदातील गौरी येणे, जेवणे व विसर्जन या काळात चढाओढीने सुगंधी फुलांची देवाणघेवाण होते. या तीन दिवसांत मोगरा, जाई, जुई या फुलांना भलताच भाव येतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी पांढरेशुभ्र सुगंधी फूल असलेल्या अनंताची पूजा अनेक घराण्यांत आवर्जून केली जाते. या दिवशी अनेक भाज्यांचा प्रसाद केला जातो. भाद्रपदातील दुसºया पंधरवड्यास पितृपंधरवडा म्हणून काळे तीळ, सातू, दर्भ, केळीची पाने, माका, विड्याची पाने, कर्टोली अशा अनेक वेगवेगळ्या वनस्पतींचा वापर आवर्जून केला जातो. या पंधरवड्यात माक्याची पाने ही अत्यावश्यक बाब असते.

आश्विन शुद्ध एकपासून नऊ दिवस नवरात्र व विजयादशमीपर्यंत देवीचा मोठा सण घरोघर व सार्वजनिक ठिकाणी साजरा केला जातो. नवरात्राचे नऊ दिवस म्हणून वाढत्या मालेचा फुलांचा वापर होतो. याच काळात शेतात नव्याने पिके तयार होत असतात. त्यानिमित्ताने तांदळाच्या ओंब्या, आंब्याचे डहाळे यांचाही घराच्या प्रवेशदारी देवदेवतांच्या सजावटीकरिता उपलब्धतेनुसार वापर केला जातो. विजयादशमीच्या दिवशी शमीच्या झाडाची आठवण येत असली तरी आपट्याच्या पानांचा म्हणजे कांचनाच्या जातीचा, पण कडक पानांची सोने म्हणून देवाणघेवाण होते.

आश्विनातील नरकचतुर्दशी या दिवशी नरकासुर म्हणून पायाखाली कवंडळाची फळे चिरडून मगच आंघोळ करण्याचा प्रघात आहे. त्यानिमित्ताने कोकणातून खेडोपाड्यांतून कवंडळाची फळे हजारोंच्या संख्येने पुणे, मुंबई व इतर नागरी वस्तीत विक्रीला येतात.

कार्तिकातील शुद्ध नवमी ही कुष्मांड नवमी म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी खूप पोसलेला कोहळा हा प्रसाद म्हणून ग्रहण केला जातो. एरवी आपल्या समाजात कोहळ्याच्या भाजीचा वापर फारसा नसतोच. वर्षाचे पापड करण्याकरिता कोहळ्याचे पाणी वापरण्याचा प्रघात होता. कार्तिक एकादशीने पौर्णिमेपर्यंत तुळशीचे लग्न अनेक ठिकाणी थाटामाटात झोकात केले जाते. त्यानिमित्ताने या दिवसात आवळे, चिंचा, ऊस ही त्या त्या ऋतूतील फळांची आठवण ठेवली जाते. त्यांच्या माला तुळशीच्या लग्नाच्या निमित्ताने सजावटीकरिता वापरल्या जातात.

कार्तिक चतुर्दशी ही वैकुंठ चतुर्दशी आहे व कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमा ही तुलसी विवाह समाप्ती म्हणून साजरी केली जाते. या दोन दिवसांत ज्यांना स्वास्थ्य आहे अशी मंडळी जवळच्या आवळ्याच्या झाडाचे पूजन करून त्या झाडाखाली आवळी भोजन करून साजरा करतात. कार्तिक वद्या एकादशी ही आळंदी एकादशी म्हणून साजरी होते. त्या दिवशी तुळशीचे पानांना महत्त्व असते. मार्गशीर्षाच्या देवदिवाळीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे चंपाषष्ठीला चातुर्मासच्या सुरुवातीला व्रत वा कुळाचार म्हणून कांदा व वांगी हे निषिद्ध मानलेले पदार्थ असतात. त्यांचा वापर चंपाषष्ठीला नैवेद्या दाखवून केला जातो.

पौष महिन्यातील संक्रांतीच्या निमित्ताने मातीच्या सुगडात ऊस, पावट्याच्या शेंगा, बिबोट्या, गाजर, गव्हाच्या ओंब्या, बोर या विविध फळे व आहार पदार्थांचा मुक्त वापर होतो. संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळाच्या देवाणघेवाणीला मोठंच महत्त्व आहे.

शाकंभरीचा उत्सव पौष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमेपर्यंत असतो. यानिमित्ताने अनेक भाज्यांचे महत्त्व स्थानपरत्वे आहे. माघातील शुद्ध चतुर्थी गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. त्या दिवशी गणेश चतुर्थीच्या पत्रीपेक्षा केवळ दुर्वांनाच मोठे महत्त्व असते. माघ वद्या पंचमी म्हणजे महाशिवरात्र. या दिवशी बेलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या शिकारीवर दृष्टी ठेवताना आपल्या समोर येणारी बेलाची पाने खुडत नकळत महादेवाची पूजा केली, अशी कथा आहे. त्या दिवशी फिरताना कडक उपवास घडला; पण आपल्या समाजात मात्र महाशिवरात्र व आषाढी एकादशी या दोन दिवसांत चवीचवीने दुप्पट खाशीचा प्रकार चालतो. चढाओढीने भगर किंवा वऱ्याचे तांदूळ, साबुदाणा, खोबरे, शेंगदाणे, शिंगाडा, केळी, बटाटे व फळे यांचा मन:पूर्वक आस्वाद घेतला जातो.

फाल्गुन शुद्ध एकादशी ही आमलकी एकादशी म्हणून ओळखली जाते. आवळ्याचा हंगाम या सुमारास संपत आलेला असतो. एवढीच आठवण या नावात असावी असे वाटते. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला होळीकरिता एरंडाचे झाड व पुरणपोळीचा महिमा मोठाच आहे. फाल्गुन वद्या एक हा वसंतोत्सवाचा प्रारंभ आहे. सुश्रुत संहितेप्रमाणे फाल्गुन चैत्र वसंत ऋतू आहे. काही फाल्गुन वद्या तृतीया व पंचमीला रंगपंचमीला रंग खेळण्याची प्रथा आहे.

Story img Loader