वाढत्या वयात आपली तब्येत चांगली राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. शरीर निरोगी ठेवण्यासाठी निरोगी जीवनशैली अधिक महत्वाची आहे. पण निरोगी राहण्यासाठी बदलत्या काळानुसार खाण्यापिण्यात आणि व्यायामाच्या सवयीतही बदल करण गरजेच आहे. पण व्यायाम बदल करणं म्हणजे काय किंवा नेमका कोणत्या वेळेत व्यायाम केला पाहिजे असा प्रश्न अनेकदा पडतो. याच बरीच चर्चा रंगते पण ठोस उत्तर मिळत नाही. पण आता एका रिसर्चमधून कोणत्या वेळेत व्यायाम करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं याचा खुलासा झाला आहे. जाणून घेऊ हा रिसर्च नेमका काय सांगतो.

गेल्या वर्षी एका रिसर्मचधून समोर आले की, ज्या स्त्रिया सकाळी व्यायाम करतात त्यांच्या पोटावरील चरबी कमी होण्यासोबत रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. पण एका नव्या रिसर्चमधून असे दिसून आले की, सकाळ किंवा संध्याकाळी व्यायाम करण्यापेक्षा दुपारी जेवणाच्या वेळेत व्यायाम केल्याने अकाली मृत्यू होण्याचा धोका कमी होतो. नेचर कम्युनिकेशन्स जर्नलमध्ये हा रिसर्च प्रकाशित करण्यात आला आहे.

Keep Your Hands And Feet Warm In Marathi
Keep Your Hands And Feet Warm : हिवाळ्यात हात-पाय खूप थंड पडतात? शरीर उबदार ठेवण्यासाठी ‘हे’ सोपे उपाय करून पाहा
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Nutritious laddoos Recipe
फक्त १० मिनिटांत बनवा पौष्टिक लाडू; पटकन वाचा साहित्य आणि कृती
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?
What fruits should not be eaten before going to bed
झोपण्यापूर्वी कोणती फळे खाऊ नये? वाचा, तज्ज्ञांचा सल्ला
Moong dal health benefits
दररोज भिजवलेले मूग खाणं आरोग्यासाठी घातक? मग तज्ज्ञ काय सांगतात…

या रिसर्चमध्ये यूके बायोमेडिकल डेटाबेसमधील ९२,००० लोकांच्या आरोग्य आणि लोकसंख्याशास्त्रीय डेटाचे मूल्यांकन केले आहे, जे सुमारे ५,००,००० यूके रहिवाशांसाठी आरोग्य डेटा तयार करतात.

झोपताना इअरफोन लावून गाणी ऐकताय? मग सावधान! वाचा, रिसर्च काय सांगतो?

रिसर्चमधील सहभागी व्यक्तींना एक्सीलरोमीटर देण्यात आले, ज्यात या व्यक्ती सात दिवसांच्या कालावधीत केव्हा आणि किती तीव्रतेने व्यायाम करतात हे मोजण्यात आले. यावेळी शास्त्रज्ञांच्या टीमने अनेक वर्षांनंतर सहभाही व्यक्तींच्या मृत्यूच्या नोंदी पाहिल्या. ज्यात असे आढळले की, सुमारे 3,000 सहभागी व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी सुमारे 1,000 लोकांचा हृदयरोग आणि 1,800 लोकांचा कर्करोगाने मृत्यू झाला आहे.

आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ज्या पुरुष आणि स्त्रियांनी बहुतेक वेळा मध्यम किंवा जास्त शारीरिक हालचाली केल्या, (जसे की, वेगवान चालणे) ते कमी क्वचित व्यायाम करणाऱ्या लोकांच्या तुलनेत जास्त काळ जगले. तसेच दुपारी व्यायाम करणं आणि दीर्घायुष्य याचा एक चांगला संबंध असल्याचेही उघड झाले आहे.

दुपारची वेळ ही व्यायामासाठी उत्तम वेळ आहे, कारण या वेळेत ह्रदयविकाराचा झटका येण्याची शक्यता फार कमी असते, असही रिसर्चमधून समोर आलं आहे. यामुळे मध्यम आणि काही वेळी जास्त शारिरीक हालचाली करणाऱ्या किंवा व्यायाम करणाऱ्या पुरुष आणि वृद्धांना आरोग्यात सुधारणा करणं शक्य झालं आहे.

Story img Loader