Air pollution causing eye problems: वायुप्रदूषण ही केवळ आपल्या फुप्फुसांसाठीच नाही, तर आपल्या डोळ्यांसाठीही एक गंभीर समस्या आहे. “प्रदूषणात वाहने, कारखाने आणि इंटेरिअर यांमधून होणाऱ्या उत्सर्जनाचा समावेश होतो, ज्यामुळे डोळ्यांशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात,” असे डॉ. अंकिता सबरवाल, एमएस (ऑप्थॅल्मोलॉजी), सीनियर कन्सल्टंट, श्रीजीवन हॉस्पिटल, न्यू दिल्ली यांनी सांगितले.

डोळ्यांमध्ये कोरडेपणा, लालसरपण व खाज येणे ही सामान्य समस्या असते आणि जास्त गंभीर समस्यांमध्ये कंजन्क्टिवायटिस, ग्‍लुकोमा, कॅटॅरॅक्ट आणि वयाशी संबंधित समस्यांमध्ये मॅक्युलर डीजनेरेशन (एएमडी) यांचा समावेशआहे. “जास्त धुक्याच्या वातावरणात, जसं की हिवाळ्यात, डोळ्यांच्या आरोग्याचा धोका खूप वाढतो आणि त्यामुळे आपल्या डोळ्यांसाठी अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे,” असे डॉ. सबरवाल यांनी सांगितले.

What is the Leidenfrost effect
Leidenfrost Effect : जेवण बनवण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा पॅन वापरताय? मग नक्की जाणून घ्या ‘या’ हॅकबद्दल
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Ayurvedic Guide for drinking water During Winter Season
Health Special : हिवाळ्यात प्या औषधी पाणी
Coconuts Are Not Allowed On Planes
Coconuts Are Not Allowed On Planes : विमान प्रवासात नारळ घेऊन जाण्यावर का आहे बंदी? वाचा नियम, तोटे अन् तज्ज्ञांचे मत
Mangal rashi parivrtan 2024
पुढील ८४ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशींचे लोक कमावणार बक्कळ पैसा
what prithvik pratap wife prajakta vaikul do
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची पत्नी काय काम करते? प्राजक्ताचे शिक्षण किती? म्हणाली, “मी ९ वर्षांपासून…”
Narak Chaturdashi 2024
Narak Chaturdashi 2024 : नरक चतुर्दशीपासून ‘या’ पाच राशींचे नशीब चमकणार, मिळणार अपार पैसा अन् धनसंपत्ती
Mother Lakshmi loves people of these five zodiac signs
माता लक्ष्मीला प्रिय असतात ‘या’ पाच राशी! गरीब कुटुंबात राहूनही होतात कोट्याधीश-अब्जाधीश

हेही वाचा… “सकाळी ब्लॅक कॉफी प्यायल्याने…”, बॉलीवूड अभिनेता वरुण धवनच्या वक्तव्यावर झाली टीका, पण तज्ज्ञ म्हणाले…

डॉ. सबरवाल यांच्या मते, प्रदूषणामुळे डोळ्यांना त्रास होतो आणि सूज येते; ज्यामुळे खाज सुटणे, डोळ्यांतून पाणी येणे, पापण्यांजवळ सूज येणे व दृष्टिदोष यांसारख्या समस्या उद्भवतात. “या प्रदूषणाचा ठिकाणी दीर्घकाळ संपर्क झाल्याने डोळ्यांच्या संवेदनशील भागांचे नुकसान होते, ज्यामुळे दृष्टी कायमची कमजोर होऊ शकते. या प्रदूषणांचा सततचा संपर्क डोळ्यांना हानी पोहोचवतो आणि डोळ्यांचे आरोग्य खराब करतो. म्हणूनच हे प्रदूषण जास्त असताना प्रतिबंधात्मक उपाय करणं खूप महत्त्वाचं आहे,” असे डॉ. सबरवाल यांनी सांगितले.

आपल्या डोळ्यांची काळजी कशी घ्याल?

तुमच्या डोळ्यांचे प्रदूषणापासून रक्षण करण्यासाठी तुम्ही करू शकाल असे सोपे उपाय खालीलप्रमाणे :

  • दीर्घकाळ प्रदूषणाच्या ठिकाणी जाऊ नका
  • प्रदूषणाच्या हानिकारक कणांपासून डोळ्यांचे संरक्षण करणारे गॉगल्स किंवा सनग्लासेस घाला.
  • स्वच्छतेबाबत काळजी घ्या. हात वारंवार धुवा आणि प्रदूषणाचा डोळ्यांशी थेट संपर्क येऊ देऊ नका.

“जर तुम्हाला लालसरपणा, खाज सुटणे किंवा धूसर दिसाणे यापैकी कोणतीही समस्या जाणवत असेल, तर डोळ्याच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या. स्वतः उपचार करण्याचा प्रयत्न करू नका. कारण- चुकीच्या उपचारामुळे स्थिती आणखी वाईट होऊ शकते,” असे डॉ. सबरवाल यांनी सांगितले.

हेही वाचा… सनस्क्रीन लावताच डोळ्यांमध्ये जळजळ होते? मग तज्ज्ञांनी सांगितलेला ‘हा’ सल्ला लक्षात ठेवा

जर तुम्हाला खाज, कोरडेपणा किंवा लालसरपणाचा त्रास होत असेल, तर डोळे चोळू नका, असे कॉर्निया, कॅटॅरॅक्ट व रिफ्रॅक्टिव सर्जन, हिरानंदानी हॉस्पिटल, वाशी-ए फोर्टिस नेटवर्क हॉस्पिटल येथील डॉ. हर्षवर्धन घोरपडे यांनी स्पष्ट केले. “त्याऐवजी आयड्रॉप्स वापरा आणि जर डोळ्यांमध्ये संसर्ग झाल्याचा संशय असेल, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. डोळ्यांइतके संवेदनशील असलेले अवयव जपण्यासाठी सर्वांत चांगला मार्ग म्हणजे हवेचे प्रदूषण कमी करणे. पण, ते शक्य नसल्यास आपल्याला सर्व शक्य त्या सावधगिरीच्या उपायांचा अवलंब करावा लागेल; ज्यामुळे आपल्या दृष्टीला धोका पोहोचणार नाही,” असे डॉ. घोरपडे यांनी सांगितले.

Story img Loader