वायू प्रदूषण ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. पायाभूत सोयी-सुविधा, नागरी वसाहती, कारखानदारी, रस्ते यांचा झपाट्याने विकास होत असताना हिरवळीचा पट्टा घटत चालला आहे. ज्या प्रमाणात सुख-सुविधा वाढत चालल्या आहेत, त्याच्या कितीतरी पटींनी अधिक प्रदूषणही वाढत आहे. वायू प्रदूषण आणि वाढत्या प्रदूषण पातळीमुळे दिल्ली एनसीआरसह अनेक उत्तर भारतीय राज्यांमधील जीवनमानावर विपरित परिणाम झाला आहे. पण, उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांना प्रदूषणाचा त्रास होतो की नाही याबाबत बऱ्याच लोकांना प्रश्न आहे. चला तर मग या संदर्भात द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना आरोग्य प्रशिक्षक डॉ. मिकी मेहता आणि वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या कन्सल्टंट चेस्ट फिजिशियन डॉ. संगीता चेकर यांनी दिलेली माहिती जाणून घेऊयात.
उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांना वाटतं, आपल्याला उंचावर प्रदूषणाचा त्रास होत नाही, मात्र “उंच उंचीवर ऑक्सिजनची पातळी जमिनीच्या पातळीपेक्षा थोडी कमी असते. अस्थिरता आणि दिशाहीनतेमुळे अवयव जलद वृद्ध होतात. यामुळे रक्तदाब, हृदय, अगदी तुमच्या श्वासावरही परिणाम होऊ शकतो, असे डॉ. मेहता यांनी इन्स्टाग्रामवर सांगितले.
वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या सल्लागार आणि चेस्ट चिकित्सक डॉ. संगीता चेकर यांनी डॉ. मेहता यांच्याशी सहमती दर्शवली आणि उंच मजल्यांवर राहणे हा एक चांगला अनुभव असू शकतो आणि एक नेत्रदीपक दृश्य प्रदान करतो, परंतु कालांतराने “घरातील हवेच्या गुणवत्तेमुळे श्वसनाच्या विविध समस्यांचा धोका वाढू शकतो. यामुळे दमा किंवा दीर्घकालीन श्वसनाच्या समस्यांसारख्या श्वसनाच्या समस्या उद्भवू शकतात” असे सांगितले.
फरीदाबाद येथील फोर्टिस हॉस्पिटलचे एमडी, एमआरसीपी पल्मोनोलॉजिस्ट, डायरेक्टर पल्मोनोलॉजी डॉ. रवी शेखर झा सांगतात, उंच इमारतींसह, तुम्ही इतर उंच ठिकाणी जाताना तेव्हाही हवेचा दाब कमी होतो. तर हैदराबाद येथील अपोलो हॉस्पिटलचे सल्लागार न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार सांगतात की, उच्च उंचीवर ऑक्सिजनची पातळी कमी होत असताना, हृदय किंवा फुफ्फुसाचे आजार असलेल्या व्यक्तींमध्ये किंवा वृद्ध लोकांमध्ये किरकोळ लक्षणे उद्भवू शकतात.
हेही वाचा >> अनेक महिला गरम पाण्याने अंघोळ करण्यास का पसंती देतात? तज्ज्ञांनी सांगितले वैज्ञानिक कारण
u
दिल्लीच्या सीके बिर्ला हॉस्पिटलचे डायरेक्टर, पल्मोनोलॉजिस्ट डॉ. विकास मित्तल यांनी सांगितले की, उंच इमारतींमध्ये राहण्यामुळे फुफ्फुसांच्या आरोग्यास धोका निर्माण होत नाही. “खरं तर, शहरी भागात जास्त उंचीवर राहिल्याने अनेकदा धूळ आणि धूर यांसारख्या प्रदूषकांचा संपर्क कमी होतो. उंच उंचीवरील योग्य ताजी हवा प्रसारित करून आणि कणिक पदार्थ फिल्टर करून घरातील हवेची गुणवत्ता वाढवते,” असे डॉ. मित्तल म्हणाले.
चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही बाजू
डॉ. कुमार यांनी नमूद केले की, प्रमुख रस्ता/महामार्गापासून ५०० मीटरच्या आत असलेल्या फ्लॅटमध्ये वायू प्रदूषण जास्त असण्याची शक्यता आहे. “आठव्या मजल्यावर किंवा त्यावरील फ्लॅटमध्ये असलेल्यांच्या तुलनेत तळमजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांमध्ये फुफ्फुसाच्या गंभीर आजाराने मृत्यूची शक्यता ४० प्रति अधिक होती. हृदयविकार असलेल्या लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण ३५ टक्क्यांनी जास्त होते आणि फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी मृत्यूचा धोका २२ टक्क्यांनी वाढला होता. एकंदरीत, तळमजल्यावर असणाऱ्यांच्या मृत्यूचा धोका आठ मजल्यांवरील किंवा त्याहून अधिक उंच फ्लॅटमध्ये असणाऱ्यांपेक्षा २२ टक्के जास्त होता. शेवटी असे दिसून येते की, उंच इमारतींमध्ये उंच मजल्यावर राहण्याच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही बाजू आहेत.