Can Fish Actually Make Eyes Beautiful: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही विविध मंत्रीपदं भूषवलेल्या व आता नव्या सरकारमध्ये आदिवासी विकास खात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या विजयकुमार गावित यांनी केलेले एक विधान चांगलेच चर्चेत आले आहे. गावित यांनी एका कार्यक्रमात बोलत असताना विश्वसुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचे डोळे हे मासे खाल्ल्यामुळे सुंदर झाले असल्याचे म्हटले आहे. गावित यांनी आपले म्हणणे पटवून देण्यासाठी काही प्रमाणात माशांमधील पोषण सत्वांविषयी सुद्धा माहिती दिली पण खरोखरच गावित यांच्या बोलण्यात तथ्य आहे का? मासे खाल्ल्याने खरोखरच डोळे सुंदर दिसू शकतात का? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील काही वर्षांमध्ये संशोधकांना असे आढळून आले आहे की आठवड्यातून किमान दोनदा रावस आणि ट्यूना सारखे मासे खाल्ल्याने डोळ्यांचे आजार टाळता येऊ शकतात.वयानुरूप स्नायू कमकुवत होऊ लागल्याने येणारे अंधत्व व जीवनशैलीतील बदलांमुळे होणारे नुकसान या दोन्हीसाठी हे मासे एक औषध सिद्ध होऊ शकतात.

टफ्ट्स युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार, माशांमध्ये आढळणारे ओमेगा 3 फॅटी ऍसिड डोळ्यांच्या आजारापासून संरक्षण देते, असे ब्रिटिश मीडियाने म्हटले आहे. या अभ्यासासाठी, संशोधकांनी ३००० लोकांना त्यांच्या सामान्य आहाराबद्दल प्रश्न विचारले आणि त्यानंतर आठ वर्षांमध्ये त्यांच्यातील बदलांचे निरीक्षण केले. यातील निम्म्या गटाला दैनंदिन सप्लिमेंटचे काही प्रकार देण्यात आले, ज्यात व्हिटॅमिन सी आणि ई आणि बीटा-कॅरोटीन यांसारख्या अँटिऑक्सिडंट्सचा समावेश होता.

निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की ज्यांनी ओमेगा 3 फॅटी ऍसिड समृध्द आहार घेतल्याने डोळ्यांच्या आजारांची वाढ होण्याची शक्यता २५ टक्के कमी होती. ‘ब्रिटिश जर्नल ऑफ ऑप्थॅल्मोलॉजी’ मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, ज्यांनी अँटिऑक्सिडंट्स तसेच झिंक आणि बीटा-कॅरोटीन घेतले त्यांना डोळ्यांचे आजार होण्याची शक्यता ५० टक्के जास्त होती.

अभ्यासात असेही आढळून आले आहे की रक्तप्रवाहात हळूहळू साखर सोडणारे संपूर्ण धान्याचे पदार्थ सुद्धा रोगाच्या वाढीपासून संरक्षण करू शकतात.ओमेगा 3 फॅटी ऍसिडचे उच्च स्तर आणि कमी कार्बोहायड्रेट आहार एकत्र केल्यास प्रगत रोग होण्याचा धोका आणखी ५० टक्क्यांनी कमी होतो, असेही अभ्यासात आढळून आले आहे.

पोषणतज्ज्ञ डॉ. सीमा खन्ना यांच्या माहितीनुसार, माशांचे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत, सर्वांसाठी फायदे जाणून घेऊया..

निरोगी मेंदूसाठी

मेंदूची वाढ आणि विकासासाठी ओमेगा ३ फॅटी ऍसिडस् आवश्यक आहेत.ग्रे मॅटर ही तुमच्या मेंदूतील प्रमुख कार्यशील ऊतक आहे ज्यामध्ये न्यूरॉन्स असतात जे माहितीवर प्रक्रिया करतात आणि आठवणी साठवतात. अभ्यासातून असे दिसून आले आहे की जे लोक दर आठवड्याला मासे खातात त्यांच्या मेंदूच्या मध्यभागी जास्त ग्रे मॅटर असतात जे भावना आणि स्मरणशक्ती नियंत्रित करतात. अभ्यासात असेही आढळून आले आहे की मासे खाणाऱ्या लोकांमध्ये नैराश्य येण्याची शक्यता कमी असते. माशांमधील ओमेगा-३ फॅटी अॅसिड डिप्रेशनवर फायदेशीर ठरते. फॅटी ऍसिडस् उच्च रक्तदाबाचा धोका कमी करून हृदयाचे संरक्षण करण्यात मदत करतात.

फिश ऑइल आणि मधुमेह

मासे व संबंधित उत्पादने व्हिटॅमिन डीचे सर्वोत्तम स्रोत आहेत. जे लोक मासे खाऊ शकत नाहीत, ते दररोज कॉड लिव्हर ऑइल कॅप्सूल किंवा १ टेबलस्पून कॉड लिव्हर ऑइल घेऊ शकतात. मासे किंवा माशाच्या तेलाचा वापर लहान मुलांमधील टाइप 1 मधुमेह तसेच प्रौढांमधील स्वयंप्रतिकार मधुमेह कमी करू शकतो. फिश सॅल्मन, हेरिंग, मॅकरेल, सार्डिन, अँकोव्हीज आणि ट्राउट, सर्वांमध्ये ओमेगा 3 फॅट्स असतात जे त्वचेच्या पेशींच्या पडद्याला मजबूत करण्यास मदत करतात आणि त्वचेच्या कर्करोगाच्या काही प्रकारांचा धोका देखील कमी करू शकतात.

हे ही वाचा<< ३० दिवस जेवणात तेल वापरणं बंद केल्यास वजन कमी होऊन हृदय राहील स्वस्थ? एका महिन्यात शरीरात काय बदलेल? 

माशांमुळे ऍलर्जी होऊ शकते का? लक्षणे का

माशांच्या ऍलर्जीमुळे त्वचेवर पुरळ, मळमळ, पोटात पेटके, डोकेदुखी, श्वास घेण्यात अडचण आणि रक्तदाब कमी होऊ शकतो, ज्यामुळे चेतना नष्ट होऊ शकते. कधीकधी, एकाच व्यक्तीच्या शरीरात वेगवेगळ्या वेळी भिन्न प्रतिक्रिया सुद्धा शकते. असे त्रास होत असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा वेळीच सल्ला घेणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya rai eyes beautiful because of fish how to improve eye vision eating fish affect brain diabetes health news svs