Akshay Kumar’s Health and Fitness Mantra : अक्षय कुमार फक्त त्याच्या शिस्तप्रिय जीवनशैलीसाठीच ओळखला जात नाही, तर त्याबरोबर त्याच्या फिटनेसचीसुद्धा नेहमी चर्चा होते. सध्या अक्षयची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने आरोग्याविषयी भाष्य केले आहे. “स्वत:वर प्रेशर घेऊन मला आरोग्य खराब करायचे नाही. माझ्यासाठी आरोग्य सर्वांत जास्त महत्त्वाचे आहे. माझ्या मते, निरोगी माणूस सर्वांत श्रीमंत आहे. मला हे खूप महत्त्वाचे वाटते आणि प्रत्येक व्यक्तीला निरोगी राहायला आवडते.” हा व्हिडीओ रणवीर अलाहाबादियाच्या यूट्यूब कार्यक्रमातील आहे.
पण, ही पहिली वेळ नाही की, ५७ वर्षीय अक्षय कुमार हा त्याच्या आयुष्यातील आरोग्य आणि फिटनेसचे महत्त्व सांगतोय. यापूर्वी त्याने सांगितले होते की, तो सकाळी पत्नी ट्विंकल खन्ना आणि त्याच्या मुलांच्या आधी अडीच तासांपूर्वी उठतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा : रोज बडीशेप आणि ओव्याचे पाणी प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांनी केला खुलासा

अक्षय कुमारचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आरोग्य आणि फिटनेस या गोष्टी सर्वांत जास्त का महत्त्वाच्या आहेत, हे समजून घेऊ…

कल्ट येथील फिटनेस एक्स्पर्ट, स्पुर्थी एस. सांगतात की, स्वत:ची वेगळी ओळख (व्हर्जन) ही तुम्ही स्वत:ला दिलेली सर्वांत मौल्यवान भेट आहे. “नियमित योग्य तो पोषक आहार घेणे आणि नियमित व्यायाम करणे, या सवयी जर तुम्ही अंगीकारल्या आणि दीर्घकाळ त्या टिकवल्या, तर तुम्ही वयानुसार निर्माण होणार्‍या आरोग्याच्या समस्यांपासून दूर राहू शकता,” स्पुर्थी सांगतात.

स्पुर्थी यांच्या मतानुसार आपण दररोजच्या जीवनशैलीत समावेश करणे आवश्यक असलेल्या बाबी खालीलप्रमाणे :

स्ट्रेंथ ट्रेनिंग- जसजसे वय वाढते, तसतसे आपले स्नायू कमकुवत होतात आणि हाडे ठिसूळ होतात. “जर तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करायला सुरुवात केली, तर स्नायू आणि हाडे मजबूत होऊ शकतात. आठवड्यातून किमान तीन दिवस वजन उचला आणि स्नायू मजबूत करा. त्यामुळे सांध्यांचे दुखणे दूर होईल आणि आरोग्य सुधारू शकते.”

माइंडफुलनेसला प्राधान्य द्या- तणावमुक्त आयुष्य जगण्यासाठी तणाव दूर करण्याच्या पद्धती आणि झोपेवर लक्ष केंद्रित करा. असे करण्यामुळे तुमच्या शरीराला पुरेशी ऊर्जा मिळेल आणि तुम्ही नेहमी ताजेतवाने राहाल.

निरोगी जीवनशैली अंगीकारा– तुमचे आवडते पदार्थ खाणे कधीही थांबवू नका; पण ते मर्यादित प्रमाणात खा. खूप जास्त जेवण करू नका. जेवणामध्ये फळे किंवा भाज्यांसह प्रोटीन्सला प्राधान्य द्या. प्रक्रिया केलेले पदार्थ आणि अल्कोहोलचे सेवन कमी करा. जेवताना मन शांत ठेवा आणि जेवणावर लक्ष केंद्रित करा. यांसारख्या सोप्या सवयी तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करू शकतात.