Gurmeet Choudhary’s Superhuman Routine: बॉलीवूड आणि टीव्ही सिनेस्टार अभियनासह त्यांच्या फिटनेससाठी ओळखले जातात. ‘मिर्झापूर’फेम अभिनेता अली फझलने नुकतेच भारती सिंग व हर्ष लिंबाचिया यांच्या टॉक शोमध्ये हजेरी लावली. यावेळी त्याने अभिनेता गुरमित चौधरीच्या फिटनेसविषयी सांगितले. अली फझल म्हणाला की, गुरमित फिटनेसबाबत अतिशय शिस्तप्रिय आहे. “तो एक सुपरह्युमन आहे. तो पहाटे ४ वाजता उठतो. मी त्याच्याबरोबर बाहेर शूट केले आहे. मला त्याची दिनचर्या माहीत आहे.”
विशेष म्हणजे गुरमित चौधरीने यापूर्वी पहाटे उठून व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे. “पहाटे ४ वाजता उठून व्यायाम करण्यात एक वेगळी जादू असते. हे फक्त वर्कआउट नाही, तर ती एक परंपरा आहे.”
गुरमितने सांगितले आहे की, तो फक्त उकडलेले अन्न खातो. त्याने १५ वर्षांपेक्षा जास्त काळापासून समोसा खाल्ला नाही. तो धान्य आणि साखरेपासून दूर राहतो. गुरमितने एकदा रोहित रॉयला सांगितले होते, “जर तुम्ही तुमचे ९९ टक्के वजन आहाराद्वारे नियंत्रित करू शकत असाल, तर तुम्ही तंदुरुस्त आहात. गेल्या सहा-सात महिन्यांत मी साखर खालेल्ली नाही एवढंच काय, तर फळांच्या स्वरूपातही साखरेचं सेवन केलेलं नाही. तांदूळ, चपाती, ग्लुटेन असं काहीही खाल्लेलं नाही.”
आपल्या डाएटविषयी गुरमित सांगतो की, आतड्याच्या चांगल्या आरोग्यासाठी तो रिकाम्या पोटी एक चमचा देशी तूप खातो.
“आतड्यांसाठी चांगले फॅट्स आवश्यक आहे. मी तूप कॉफीबरोबर घेतो.” चौधरी पुढे सांगतो, “त्यानंतर हिरव्या फळांचा आणि भाजीचा रस घेतो. नंतर मी व्यायाम करतो.”
“मग मी माझा नाश्त्यामध्ये ८-१० अंडी अॅव्होकॅडोसह घेतो. अडीच तासांनंतर, मी उकडलेले चिकन खातो. मग रात्री मी भिजवलेले बदाम खातो किंवा बदाम दूध बनवून पितो. मी रात्रीच्या जेवणात म्हणजे ग्रील्ड चिकन किंवा ब्रोकोली व मशरूमसह उकडलेले चिकन घेतो आणि रात्री प्रोटीन शेक घेतो”, असे गुरमित सांगतो
शिस्तप्रिय जीवनशैली अंगीकारण्यासाठी काय आवश्यक?
शरीराचा फिटनेस आणि आरोग्य हे व्यक्तीच्या मानसिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे घटक आहे. आव्हाने स्वीकारणे आणि त्या आव्हानांचा सामना करून शिस्त निर्माण करणे यांचे अनेक मानसिक फायदे आहेत. “त्यामुळे मेंदूचा नैसर्गिक मूड वाढवणारा अँडॉर्फिनसारख्या हार्मोन्सला प्रोत्साहन मिळते, ज्यामुळे तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत होते. वर्कआउट पूर्ण करण्यासाठी आणि शिस्तप्रिय जीवनशैली स्वीकारण्यासाठी आवश्यक असलेले मानसिक आरोग्य निरोगी राहणे गरजेचे आहे.” असे दिल्ली येथील ‘श्री बालाजी ॲक्शन मेडिकल इन्स्टिट्यूट’चे वरिष्ठ सल्लागार व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत गोयल सांगतात.
ते पुढे सांगतात, “शारीरिक हालचालींमुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. विशेषत: तुम्ही जर एखाद्या शारीरिक समस्येचा सामना करीत असाल, तर तुम्ही तुमच्या शरीराचे ऐकणे गरजेचे आहे आणि शरीराला नाहक त्रास होईल अशा गोष्टी टाळणे महत्त्वाचे आहे.”