Alkaline Diet For Arthritis Pain : संधिवात हा अतिशय वेदनादायक आजार आहे. या आजारात सांध्यांना सूज येते. काही वेळा संधिवाताचा त्रास इतका वाढतो की, सांधे निरुपयोगी होतात; ज्यामुळे शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते. संधिवातात सांधेदुखी आणि सूज यांमुळे सांध्यचे खूप नुकसान होते. त्यावर लोक औषधांपासून शस्त्रक्रिया ते घरगुती उपाय करून पाहतात; पण त्याने तितकासा फरक जाणवत नाही. मात्र, अल्कलाईन डाएट म्हणजेच अल्कधर्मी आहाराच्या सेवनातून तुम्ही संधिवाताची वेदनांपासून काही प्रमाणात का होईना आराम मिळवू शकता, असे म्हटले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यात इन्स्टाग्रामवर एका कंटेंन्ट क्रिएटरने एक व्हिडीओ पोस्ट केला होता; ज्यात म्हटले आहे की, संधिवातावर अल्कधर्मी आहार घ्या. भरपूर क्षारीय पदार्थ खा, हळदीचे सेवन सुरू करा.

या संदर्भात नवी दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्सचे ऑर्थोपेडिक्स आणि जॉइंट रिप्लेसमेंटचे वरिष्ठ सल्लागार डॉ. (प्रा.) राजू वैश्य म्हणाले की, अल्कधर्मी पदार्थांचे सेवन केल्याने शरीराची पीएच स्थिती संतुलित राखण्यास मदत होते. या सिद्धांतावर आधारित आहे. यामुळे विविध आरोग्य स्थिती रोखण्यास मदत होते. आहारात फळे, भाज्या, सुका मेवा, बिया आणि वनस्पती-आधारित प्रथिने खाण्यावर भर द्या. मांस, दुग्धजन्य पदार्थ, धान्ये आणि प्रक्रिया केलेले पदार्थ यांसारखे आम्लयुक्त पदार्थांचे मर्यादित सेवन करा.

डॉ. वैश्य यांनी दावा केला की, अल्कधर्मी आहार शरीरातील अतिरिक्त अॅसिड कमी करते आणि जळजळ कमी करण्यासह निरोगी राहण्यास मदत करते.

अल्कधर्मी आहार संधिवात बरे करू शकतो का? (Alkaline Diet Benefits)

डॉ. वैश्य सांगतात की, अल्कधर्मी आहार संधिवाताची लक्षणे बरे किंवा कमी करू शकतो. पण, या दाव्याचे समर्थन करण्यासाठी मर्यादित वैज्ञानिक पुरावे आहेत. काही समर्थकांनी असा युक्तिवाद केला की, अल्कधर्मी आहारामुळे जळजळ आणि सांधेदुखी कमी होऊ शकते, आहारातील आम्लाचा भार आणि संधिवात यांच्यातील संबंध वैज्ञानिकदृष्ट्या व्यवस्थितपणे स्थापित केले गेलेले नाहीत.

बहुतेक तज्ज्ञ असे सुचवतात की, केवळ अल्कधर्मी आहारामुळे संधिवाताची लक्षणे कमी करता येत नाहीत. त्यासाठी जीवनशैलीतील बदल, औषधे आणि थेरपीची गरज असते.

More Health News Read Here : हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित आजारांपासून दूर राहायचेय? मग तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ चार सवयी टाळा

डॉ. वैश्य यांनी अनेक नवीन उपचारपद्धतींची माहिती दिली; ज्या सांधेदुखीच्या उपचारांसाठी वापरल्या जातात. त्यात स्टेम सेल थेरपी, जीन थेरपी व बायोलॉजिकल ट्रीटमेंटचा वापर केला जातो.

स्टेम सेल थेरपीमध्ये सांध्यातील वेदना आणि जळजळ कमी करण्यासाठी स्टेम पेशी इंजेक्टचा वापर केला जातो. जीन थेरपीमध्येही जळजळ रोखली जाते.

वेदना आणि कडकपणा कमी करण्यासाठी शारीरिक क्रिया करा ( Alkaline Foods Reduce Arthritis Pain)

संधिवाताच्या वेदना आणि कडकपणा कमी करण्यासाठी शारीरिक क्रिया करा. त्यात चालणे, पोहणे व सायकल चालवणे यांसारख्या व्यायामप्रकारांचा समावेश आहे. त्यामुळे सांध्यांवर जास्त ताण न येता, सांध्याची लवचिकता आणि ताकद टिकवून ठेवण्यास मदत मिळू शकते. नियमित स्ट्रेचिंग आणि रेंज-ऑफ-मोशन व्यायामाचा यात समावेश केल्यानेही गतिशीलता सुधारण्यास मदत होऊ शकते.

आपले शरीर कोणत्या उपचारपद्धतींना साथ देते हे ओळखा. तसेच शरीर सक्रिय ठेवणे, सांध्यांवर ताण येत असेल किंवा वेदना कमी करण्यासाठी योग्य व्यायाम करा, असेही डॉ. वैश्य म्हणाले.

डॉ. वैश्य म्हणाले की, सांधेदुखीच्या उपचारांबद्दल काही सामान्य गैरसमज आहेत; जसे की, सांधेदुखी हा वृद्धत्वामुळे होणारा आजार आहे. त्यामुळे सांध्यांचे आणखी नुकसान टाळण्यासाठी व्यायाम टाळला पाहिजे आणि केवळ आहारातील बदल संधिवात बरे करू शकतात. (Alkaline Foods For Arthritis)

हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की, संधिवात ही एक जटिल आरोग्य स्थिती आहे. त्यावर प्रभावी व्यवस्थापनासाठी औषधे, शारीरिक उपचार, जीवनशैलीतील बदल आणि काही वेळा शस्त्रक्रियेची गरज भासू शकते, असेही डॉ. वैश्य यांनी स्पष्ट केले.

नुकतेच ज्याचे सांधेदुखीचे निदान झाले अशा एका रुग्णाविषयी डॉ. वैश्य म्हणाले की, स्वतःची आरोग्य स्थिती पाहून, मग त्यावरील उपचार पर्यायांबद्दल आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.

विविध उपचार आणि थेरपी वापरण्यासाठी तयार राहा. कारण योग्य उपचारांसाठी वेळ लागू शकतो, असेही डॉ. वैश्य यांनी स्पष्ट केले.