150-second walking workout to burn calories: चालणे हा ताण कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे. चालणे हा एक व्यायामाचा उत्तम प्रकार मानला जातो, ज्यामुळे शरीराला असंख्य फायदे मिळतात. रोजच्या चालण्यामध्ये सातत्य ठेवल्याने मानसिक स्वास्थ्यदेखील सुधारते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पायी चालण्यासाठी तुम्हाला निश्चित अशी वेळ ठरवण्याची काहीच गरज पडत नाही. दरम्यान, चालताना तुम्ही दररोज किती पावले टाकली पाहिजेत आणि चालताना कोणत्या प्रकारचे पाऊल उचलले पाहिजे, तसेच त्याचे अनेक फायदे आज आपण जाणून घेऊयात. जे लोक वर्क फ्रॉम होम करतात, तसेच पावसाळ्यात ज्यांना घराबाहेर पडता येत नाही, अशा लोकांनी घरातच कशाप्रकारे चालले पाहिजे यासंदर्भात बेंगळुरूमधील ॲस्टर व्हाईटफिल्ड हॉस्पिटलचे मुख्य फिजिओथेरपिस्ट डॉ. राजाराम एम यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

जर तुम्ही रोज फिरायला जाऊ शकत नसाल, पण तुम्हाला चालायचा व्यायाम करायचा असेल आणि वजन कमी करायचे असेल तर तुम्ही हा वर्कआउट करून पाहा.

Keep Your Hands And Feet Warm In Marathi
Keep Your Hands And Feet Warm : हिवाळ्यात हात-पाय खूप थंड पडतात? शरीर उबदार ठेवण्यासाठी ‘हे’ सोपे उपाय करून पाहा
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Himanshi Khurana's Weight Loss Secret
दररोज पराठा खाणाऱ्या हिमांशी खुरानाने केले ११ किलो वजन कमी? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात?
Nutritious ragi cutlets recipe
फक्त ३० मिनिटांत बनवा नाचणीचे पौष्टिक कटलेट; वाचा साहित्य आणि कृती
Morning Mantra
Morning Mantra: मॉर्निंग वॉक करताना चालावे की धावावे? वजन कमी करण्यासाठी कोणता व्यायाम ठरेल जास्त फायदेशीर?
How Less Exercise give Better Health Benefits
हिवाळ्यात कमी वर्कआउट करून आरोग्यास कसा फायदा मिळू शकतो? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….
how to to Manage thyroid level
थायरॉइड कमी करण्यासाठी दररोज करा हा व्यायाम, Viral Video एकदा पाहाच

३० सेकंदांसाठी उभे राहून पाय लांब करणे, ३० सेकंद एका जागेवर उड्या मारणे, ३० सेकंद पायाच्या बोटांवर उभं राहून गुडघे उंच करा, खाली वाकणे पुन्हा वर येणे. ३० सेकंद एकाच जागेवर हळू हळू धावा, एकदा उजव्या बाजूला एकदा डाव्या बाजूला खाली वाका. अशाप्रकारचा व्यायाम तुम्ही घरबसल्या करू शकता. प्रत्येक व्यायाम १० फेऱ्यांसाठी पुन्हा करा, अशामुळे तुम्ही सहज कॅलरी बर्न करू शकता.

अशा प्रकारचे साधे व्यायाम किंवा हालचाली सक्रिय होण्यासाठी एक चांगली सुरुवात आहे. परंतु, हे समजून घ्या की साधे व्यायाम कठीण वर्कआउटची जागा घेऊ शकत नाहीत. शारीरिक तंदुरुस्तीसारखी दीर्घकालीन आरोग्य उद्दिष्टे साध्य करण्यासाठी समतोल राखणे आवश्यक आहे. डॉ. राजाराम यांच्या मते, यांसारख्या छोट्या छोट्या आणि साध्या व्यायामाचा फायदा होऊ शकतो. मात्र, निरोगी जीवन जगण्यासाठी शरीराला अधिक चांगल्या प्रकारच्या वर्कआउट्सची गरज असते.

हेही वाचा >> AC Side Effects: तुम्हीही दिवसभर एसीमध्ये बसता का? शरीरावर काय परिणाम होतो? वाचा…

चालण्याचे फायदे

आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी चालणे चांगले आहे. यामुळे तुमचे शरीर सक्रिय राहते आणि अन्नाचे पचन व्यवस्थित होते. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी सतत चालावे. ताणतणाव, चिंता, झोप न लागणे, एकाग्रता नसणे इत्यादी गोष्टी यामुळे दूर होतात. आजारी आणि वृद्ध व्यक्ती जे जास्त व्यायाम करू शकत नाहीत, त्यांना चालण्यामुळे आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. चालण्याचा एक फायदा म्हणजे हा व्यायाम तुम्ही कोणत्याही वयात करू शकता. चालण्याने रक्तदाबही नियंत्रित राहतो आणि डोळ्यांसाठीही फायदेशीर असल्याचे सांगितले जाते.

Story img Loader