‘पुष्पा २’फेम अभिनेता अल्लू अर्जुनने अलीकडेच ‘पिंकविला’ला माहिती देताना खुलासा केला, “मी चित्रपटासाठी ‘कडक’ आहार पथ्य पाळत नाही. मी काम करीत असलेल्या चित्रपटाच्या गरजेनुसार माझा आहार आणि फिटनेसमध्ये बदल करतो. माझा नाश्ता जवळजवळ नेहमीच सारखाच असतो. माझे दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण वेगवेगळे असते. “नाश्ता बहुतेकदा सारखाच असतो. नाश्त्यामध्ये नेहमी अंड्यांचा समावेश असतो. दिवसाचे शेवटचे जेवण काय असेल, ते परिस्थितीवर अवलंबून असते”
आपल्या सकाळच्या दिनचर्येबद्दल खुलासा करताना अल्लू अर्जून म्हणाला, “मी रिकाम्या पोटी ४५ मिनिटे ते एक तास धावतो. जर माझ्याकडे ऊर्जा बाकी असेल, तर मी आठवड्यातून सात दिवस व्यायाम करतो किंवा जर मला आळस आला असेल, तर आठवड्यातून फक्त तीन दिवस व्यायाम करतो
कॅलिस्थेनिक्स वर्कआऊटची आवड असलेल्या या अभिनेत्याने सांगितले, “फिटनेस हे मानसिकतेला आव्हान आहे. चांगल्या शरीरापेक्षा निरोगी आयुष्य असणं खूप महत्त्वाचं आहे.”
तेलगू अभिनेत्याने नमूद केले, “तो काही दुग्धजन्य पदार्थ टाळतो. कारण- त्याला त्यांची ‘ॲलर्जी’ आहे.”
अल्लू अर्जुनची फिटनेस दिनचर्या जाणून घेतल्यानंतर सकाळी रिकाम्या पोटी धावणे कसे साह्यभूत ठरते आणि आपण दररोज अंडी खावीत का ते समजून घ्या…
u
दररोज अंडी खावीत का?
अंडी हा उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत मिळते. प्रथिने तृप्तीची भावना मिळण्यासाठी प्रोत्साहन देतात आणि मग ही भावना जास्त प्रमाणात अन्न खाणे किंवा स्नॅक्स खाण्याची इच्छा व प्रमाण कमी करते”, असे बंगळुरू येथील ॲस्टर व्हाईटफिल्ड हॉस्पिटलचे मुख्य क्लिनिकल आहारतज्ज्ञ वीणा व्ही. यांनी सांगितले.
“तज्ज्ञांकडून नाश्यासाठी अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण- त्यात अ, ब२, ब५, ब१२ व ब९ यांसारख्या आवश्यक जीवनसत्त्वयुक्त पोषक घटक असतात. त्यामध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड, डीएचए व ईपीए यासारखी निरोगी चरबीदेखील असते. अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये सर्वांत जास्त चरबी असते. म्हणूनच काही जण अंड्यातील पिवळा बलक खाणे टाळण्याचा प्रयत्न करतात आणि जास्तीत जास्त प्रथिनांसाठी अंड्याचा पांढरा भाग खाण्यावर लक्ष केंद्रित करतात,” असे झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ जिनल पटेल यांनी सांगितले.
हेही वाचा – सुपरफूड्स खरोखरच सुपरफूड आहेत का? तुमच्या आहाराचे नियोजन कसे करावे ते तज्ज्ञांकडून घ्या जाणून….
रिकाम्या पोटी धावणे योग्य आहे का?
रिकाम्या पोटी धावणे हे आरोग्याला मिळू शकणाऱ्या अनेक फायद्यांशी संबंधित आहे, असे हैदराबाद अपोलो हॉस्पिटलचे सल्लागार व न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी सांगितले.
“सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चरबी आणि वजन कमी करण्यासाठी. उपवासादरम्यान व्यायाम केल्याने अॅडिपोज टिश्यूमध्ये लिपोलिसिस (चरबीचा वापर) वाढते आणि चरबीचे ऑक्सिडेशन उत्तेजित होते. परिणामी चरबीचा वापर वाढतो आणि वजन कमी होते. पोट भरलेले असताना व्यायाम करताना कर्बोदके हा मुख्य उर्जा स्रोत असतो; परंतु याउलट रिकाम्या पोटी व्यायाम करताना चरबी हा मुख्य उर्जा स्रोत असतो, ” असे डॉ. कुमार यांनी स्पष्ट केले.
आणखी एक फायदा म्हणजे लिपिड प्रोफाइलवर अनुकूल प्रभाव पडतो. जलद धावणे हे एचडीएल कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ आणि एकूण व एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्याशी संबंधित आहे,” असे डॉ. कुमार यांनी नमूद केले.
त्याशिवाय हे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत करते. तसेच जलद धावल्याने इन्सुलिनची पातळी कमी होते आणि इन्सुलिनची संवेदनशीलता चांगली होते. वेगात धावताना ग्लायसेमिक स्थिती सुधारते,” असेही डॉ. कुमार म्हणाले.
हेही वाचा – हिवाळ्यात आपण आपल्या पाळीव प्राण्यांना किती वेळा अंघोळ घालावी? तज्ज्ञ काय सांगतात….
इतर संभाव्य फायदे
- सहनशक्ती वाढते
- दाहकता कमी
- मानसिक सतर्कता सुधारते
- ऑटोफॅजी प्रक्रिया सुधारते (ऑटोफॅजी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. याेतप्रक्रिया तुमच्या शरीरातील पेशी खराब झालेले भाग, निरुपयोगी गोष्टी व हानिकारक कचरा काढून टाकतात. आणि खराब झालेल्या पेशी व प्रथिनांचा पुन्हा वापर करून नवीन, निरोगी भाग तयार करतात.)
रिकाम्या पोटी धावताना ही सावधगिरी बाळगा
रिकाम्या पोटी धावणे जास्तीत जास्त ६० ते ७५ मिनिटे (१० किमीपेक्षा कमी) मर्यादित असावे आणि वेग मध्यम (प्रति तास आठ किमी किंवा त्यापेक्षा कमी) असावा. “दीर्घ कालावधी किंवा वेगवान धावण्यासाठी आदर्शपणे नियमित अंतराने पुन्हा ऊर्जा (कर्बोदकांसह) आवश्यक आहे,” असे डॉ. कुमार म्हणाले.