Almond Side Effect: बदाम हा जगभरात सर्वत्र प्रसिद्ध व आवडता म्हणून ओळखला जाणारा सुका मेवा आहेबदामाचे शरीरासाठीचे आपण सर्वच जाणतो. गर्भावस्थेत महिलांना बदामाचे सेवन आवर्जून करण्याचा सल्ला अनेक आहारतज्ज्ञ देतात. शिवाय शरीरातील कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास, हृदयाच्या स्वास्थ्यासाठी बदाम खाणे फायद्याचे मानले जाते. बदामामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन, खनिज, प्रोटीन, हेल्दी फॅट, अँटी ऑक्सिडंट्स व ओमेगा ३ फॅटी ऍसिड असते. मात्र तज्ज्ञांच्या माहितीनुसार काही आजारात बदाम हा एखाद्या विषारी घटकाप्रमाणे शरीरात काम करू शकतो. हे आजार कोणते व बदामाचे सेवन कोणी टाळायला हवे हे आता आपण जाणून घेऊयात..
पोट स्वच्छ होत नसल्यास.. (DIGESTIVE PROBLEM)
बदामाच्या अधिक सेवनाने आपल्याला पोट फुगणे, बद्धकोष्ठ, मळमळ व पोटदुखी अशा समस्यां जाणवू शकतात. बदामात मुबलक प्रमाणात फायबर उपलब्ध असते पण याच्या अधिक सेवनाने पचनप्रक्रियेला अडथळा निर्माण होऊ शकतो. जर आपल्याला पचनाशी संबंधित त्रास असतील तर आपणही प्रमाणापेक्षा अधिक बदामाचे नियमित सेवन करणे टाळायला हवे.
व्हिटॅमिन ई चा मारा.. (VITAMIN E OVERDOSE)
साधारण १०० ग्रॅम अर्धी वाटी बदामाच्या २५ मिलिग्रॅम व्हिटॅमिन ई असते. आपल्या शरीराला मुळात १५ मिलिग्रॅम व्हिटॅमिन ई पुरेसे असते. आपल्या गरजेपेक्षा अधिक व्हिटॅमिनइ ई चा शरीरात मारा झाल्यास आपल्याला थकवा जाणवू शकतो तसेच तुमची नजर सुद्धा धुरकट होऊ शकते.
वजन कमी करायचे असल्यास..(Bad For Weight Loss)
बदामात प्रोटीन, फायबर, कॅलरीज व हेल्दी फॅट्स असतात, यामुळे अनेकदा वजन वाढण्यासाठी बदाम उपयुक्त ठरतात. पण तुम्ही जर वजन कमी करण्याच्या मोहिमेवर असाल तर बदामाचा उलटाच प्रभाव शरीरावर होऊ शकतो. अहवालांमधून समोर आलेल्या माहितीनिमित्त १०० ग्रॅम बदामामध्ये तब्बल ५० ग्रॅम कॅलरीज असतात. नियमित बदामाचे सेवन हे वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकते.
किडनी स्टोनचा धोका (Increases the risk of developing kidney stones)
वेबएमडीच्या माहितीनुसार बदामाचे अधिक सेवन हे आपल्या किडनीसाठी मोठं धोका ठरू शकते. बदामातील सत्वांमुळे शरीरात हाय कॅल्शियम ऑक्सलेट तयार होते. ज्याला मुतखडा व किडनी स्टोन म्हणूनही ओळखले जाते. मुतखडा झाल्यास किडनीची कार्यक्षमता हळूहळू कमी होण्याचा धोका असतो. बदामाच्या अधिक सेवनाने काहींना किडनीला सूज येण्याचा सुद्धा अनुभव आला आहे.
कधी, कसा व किती खावा बदाम?
आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. सलीम जैदी (Ayurvedic Expert Dr. Salim Zaidi) यांच्या माहितीनुसार सकाळी रिकाम्या पोटी बदाम खाणे फायद्याचे ठरू शकते.दुसरीकडे डॉ. वी. के. मिश्रा यांच्या माहितीनुसार बदामाच्या सेवनाच्या बाबत नियमित विचारला जाणारा प्रश्न म्हणजे बदाम सोलून खायचा की नाही? यावर डॉक्टर मिश्रा यांनी अत्यंत सोपे उत्तर दिले आहे.
हे ही वाचा<< किडनी निकामी होण्याआधी ‘या’ अवयवांना होतात प्रचंड वेदना; युरिक ऍसिड वाढल्याचे संकेत ओळखा
वैज्ञानिक दृष्टीने बदाम हे साल न काढताच खाणे फायद्याचे ठरू शकते. बदामाच्या सालांमध्ये पॉलिफिनॉल्स नामक एक घटक असतो जो एक अत्यंत उपयुक्त अँटिऑक्सिडंट आहे. उत्तम स्वास्थ्य असणाऱ्या व्यक्तीने एका दिवसात ५६ ग्रॅम म्हणजे १० ते १२ बदामाचे सेवन करण्यास हरकत नाही.