How Many Almonds To Eat In Day: तुम्हाला बर्‍याचदा हृदयरोगतज्ज्ञ हेल्दी स्नॅक्ससाठी बदाम खाण्याचा सल्ला देतात. बदाम हे मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्सने समृद्ध असतात, ज्यांना चांगले फॅट्ससुद्धा म्हटले जाते. डॉ. सीमा गुलाटी यांच्या माहितीनुसार, बदामाच्या सेवनाने लिपोप्रोटीन किंवा खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते. शिवाय यातून शरीराला आवश्यक असे चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होऊ शकते. हे चांगले कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवू शकते. बदामातील ऑक्सिडेटिव्ह गुणधर्म तुमचे ताणतणाव कमी करतात शिवाय यातील दाहकविरोधी गुणधर्म शरीराला थंड ठेवण्यास मदत करू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बदाम हे फायबरचे समृद्ध स्रोत आहेत, जे शरीरातून अतिरिक्त कोलेस्टेरॉल बाहेर काढण्यासाठी उत्तम ठरतात. बदाम हे प्रथिने, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, अँटिऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स आणि व्हिटॅमिन ई समृद्ध आहेत. हे पोषक घटक शरीराच्या अनेक कार्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ऊर्जा उत्पादन, पेशीवाढ आणि रोगप्रतिकारक कार्य करण्यासाठी बदाम हा हेल्दी व चविष्ट स्नॅक ठरतो.

याशिवाय बदाम हे ग्लुकोजची पातळी नियंत्रणात ठेवून चयापचयाचा वेग वाढवू शकतात, ज्यामुळे मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते.
बदामाच्या तपकिरी त्वचेमध्ये पॉलिफेनॉल असतात, जे आतड्याची स्वच्छता करण्यास उपयुक्त ठरतात.

भारतात, २०१७ मध्ये “टाइप-२ मधुमेह असलेल्या भारतीयांमध्ये ग्लायसेमिया आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या जोखीम घटकांवर बदामाचा प्रभाव” अशा हेडिंगसह एक संशोधन प्रसिद्ध झाले होते. तब्बल २४ आठवड्यांमध्ये केलेल्या निरीक्षणावर आधारित हा अभ्यास होता. यात २४ आठवडे एकूण ऊर्जासेवनाच्या २० टक्के ऊर्जा ही बदामाच्या सेवनाने प्राप्त करण्यास सांगितलेले होते. यामुळे ग्लायसेमिक आणि लिपिड पॅरामीटर्स सुधारण्यास मदत होते. यामुळे ग्लायसेमिक आणि लिपिड पॅरामीटर्स सुधारण्यास मदत होऊन कंबरेचा घेर आणि कंबर- ते- उंची रेशो (WhTR) हे लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे नोंदवले गेले.

मुख्य म्हणजे प्रत्येकी एक टक्का कोलेस्ट्रॉल कमी झाल्याने कोरोनरी हृदयरोगाचा धोका १ ते २ टक्के कमी झाल्याचे सुद्धा दिसून आले. ज्या लोकांना हृदयविकाराचा एक झटका येऊन गेला आहे त्यांना एचएस-सीआरपी पातळी अधिक असल्यास दुसरा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. परंतु त्यांची एचएस-सीआरपी पातळी ठराविक श्रेणीत असताना धोका कमी होतो.

हे ही वाचा<< पोटाची चरबी ७ दिवसांत कमी होते? बेली फॅट्ससाठी कार्डिओला पर्यायच नाही? डॉक्टरांनी सोडवले मुख्य पाच प्रश्न

याच पार्श्वभूमीवर पुढे झालेल्या अभ्यासात असे दिसून आले की, तुम्ही दिवसाच्या तीन प्रमुख जेवणांपैकी प्रत्येक जेवणाच्या सुमारे ३० मिनिटे आधी २० ग्रॅम बदामाचे सेवन केल्यास वरील फायदे मिळू शकतात. तसेच रक्तातील ग्लुकोजच्या वाढीला २० टक्क्यांनी कमी करू शकते. विशेषत: मधुमेहाच्या अवस्थेत असलेल्या लोकांमध्ये, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका मर्यादित होतो. एक मूठभर किंवा २८ ग्रॅम बदाम किंवा अंदाजे २३ बदाम हे आरोग्याची पातळी राखण्यास फायदेशीर ठरू शकतात. यामध्ये मीठ किंवा अन्य मसाले घालू नयेत.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Almonds make bad cholesterol thrown out via poop how many nuts to include daily routine should you soak almonds health news svs