बऱ्याच वेळा लहान मुले किंव्हा तरुण मुले- मुली घरी तक्रार करतात की रोज तीच तीच भाजी आहे आणि बाहेरून काहीतरी चमचमीत मागवू या. काही व्यक्तींना तर शिक्षण किंवा कामानिमित्त रोजच सकाळ- संध्याकाळ बाहेरचे खावे लागते. आज स्वीगी किंव्हा झोमॅटो या सारख्या अॅप वरून जेवण कुठेही सहजपणे मागिवले जाते. ही सुविधा म्हणून उत्तम आहे परंतु त्यामुळे आपण नेहमीच्या जेवणापासून जास्त तेलकट किंवा जास्त कॅलरीयुक्त खातो. साधारण: आपण असे निश्चितपणे समजतो की नेहमीसाठी बाहेरचे जेवण खाणे ही चांगली कल्पना नाही आणि आरोग्यासाठी ते योग्यही नाही. त्याशिवाय बाहेरचे खाणे सहसा महाग असते. तसेच जे पदार्थ आपण निवडतो ते आपल्यासाठी इतके चांगले नसतात. शिवाय, आपण नेमके काय खात आहोत किंवा ते कसे तयार केले आहे हे ही आपल्याला माहीत नसते. परंतु चवीपेक्षा त्या जेवणाचे शास्त्रीयदृष्ट्या आपल्या शरीरावर काय परिणाम होतात हे आपण पाहू या.

आणखी वाचा: Health Special: ऋतूबदल झाला की, रोगजंतूंना दूर ठेवण्यासाठी ‘हे’ टाळा!

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Jaggery on empty stomach
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे?
Many students in Pune face fatigue and mental stress due to lack of inadequate food intake
शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांची आबाळ, आरोग्य सर्वेक्षणातून काय झाले उघड?
Dragon fruit benefits for skin and hair
त्वचा आणि केसांसाठी ड्रॅगन फ्रूट फायदेशीर; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ
satish wagh murder case mohini wagh and 5 others remanded to police custody till 30 december
खून करण्यामागे कारण आर्थिक की अनैतिक संबंध? सतीश वाघ खून प्रकरणात पत्नीला पोलीस कोठडी
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी
chatura loksatta marathi news
स्त्री आरोग्य : नववर्षाचा संकल्प; फिट राहा!

बाहेरच्या जेवणात नेहमीपेक्षा जास्त कॅलरीज

नेहमी बाहेर जेवण केल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो याचा विचार केला तर, तुम्हाला नवनवीन प्रकारचे पदार्थ खायला तर मिळतात आणि रसना तृप्तही होते परंतु, त्याचे काही वाईट परिणामही आहेत आणि म्हणूनच नेहमी जेवणासाठी बाहेर जाण्यापूर्वी आपण निश्चितपणे याचा विचार करणे आवश्यक आहे. हॉटेलमध्ये किंवा पार्टीमध्ये अथवा लग्नामध्ये तुम्ही नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात जेवण घेता.

आणखी वाचा: Health Special: आपल्या वेदनेशी संबंधित ‘SIMS आणि DIMS’ आहेत तरी काय?

तुम्ही घरी जेवताना योग्य पण कमीच पदार्थ तयार करता. त्यापेक्षा तुम्ही बाहेर जेवताना जास्त खाण्याची शक्यता असते. एकतर पार्टीज मध्ये खूप स्टार्टर्स असतात. ते बरेचसे तेलकट असतात. अनेक हॉटेल्स ऑर्डरसोबत फुकट गोष्टी देतात जसे की चिप्स आणि साल्सा किंवा ब्रेड व ऑइल, शीतपेय, पापड, पाणीपुरी इत्यादी. त्याचे प्रमाणही जास्त असते. त्याबरोबर तुम्ही मद्यपान किंवा इतर ड्रिंक्स घेत असाल तर त्यातून व त्याबरोबर असलेले शेंगदाणे, चीजलिंग्स आदी अधिक खाणे होतेच. हे सर्व मेंदू आणि शरीराला गोंधळात टाकते. तुम्हाला असे वाटते की तुम्ही अजूनही स्टार्टर्सचे सेवन करत आहात परंतु तुम्ही जेवणापेक्षा जास्त कॅलरींचे सेवन केले असते. वास्तविकता अशी आहे की त्या खाद्य पदार्थांचा वाटा नेहमींपेक्षा खूपच जास्त असतो. शास्त्रीय अभ्यासात असे आढळले आहे की, बाहेर जेवताना आपण अनेकवेळा २५०-३०० उष्मांक (कॅलरी) जास्त घेतो. नेहमी बाहेरचे खाण्याची सवय असेल तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर नंतर दिसतो.

आणखी वाचा: Health Special: ऋतू बदलताना (ऋतूसंधीकाळ) आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

सोडियम आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते

शरीरात जास्त सोडियम आणि वाढलेले कोलेस्टेरॉल हे डोकेदुखीपासून लठ्ठपणापर्यंत अनेक नकारात्मक शारीरिक प्रभावांचा धोका वाढवते व प्राणघातक आजारांना निमंत्रण देते. हॉटेल्स मधील व पॅकेट्स मधल्या सर्व पदार्थांमध्ये सरासरी सोडियम जास्त असते. ते पदार्थ पॅकेट्स/ टीन्स मध्ये चांगले राहावेत म्हणून त्यामध्ये मिठाचा वापर जास्त असतो. सोडियम जास्त असलेल्या आहारामुळे शरीरावर होणार्‍या परिणामांमध्ये रक्तदाब वाढणे, डिहायड्रेशन (शरीरात निर्जलीकरण होते) आणि संभाव्य किडनी रोगांचा त्रास होवू लागतो.

जास्त संतृप्त चरबी आणि ट्रान्सफॅट्स

रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांमध्ये, विशेषत: फास्ट फूडच्या पदार्थांमध्ये, तुम्ही स्वतः तयार केलेल्या जेवणापेक्षा खूप जास्त संतृप्त चरबी आणि ट्रान्स फॅट्स असतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी आहारातील चरबीचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण जास्त चरबीयुक्त आहार कोलेस्टेरॉलची पातळी वाढवतो. भरपूर जेवण बाहेर खाल्ल्याने हृदयविकार किंवा पक्षाघाताचा धोका वाढतो. चरबी, कोलेस्टेरॉल आणि साखरयुक्त आहारामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. बाहेर जेवताना, शर्करायुक्त मिष्टान्न आणि अतिमसाल्याचे चविष्ट पदार्थ खाण्याचा अधिक मोह होतो. अतिरिक्त पिष्टमय आणि मांसयुक्त पदार्थ हे योग्य प्रमाणातच खाल्ले पाहिजेत, अन्यथा हे आजाराला निमंत्रणच आहे.

हृदयरोग किंवा पक्षाघाताचा वाढता धोका

परदेशातील एका अभ्यासात प्रथिनांचा वापर आणि स्ट्रोकचा धोका यांच्यातील दुव्याचे मूल्यांकन केले गेले. त्यांना असे आढळून आले की जे लोक दररोज जास्त लाल मांसाचे सेवन करतात त्यांना स्ट्रोकचा धोका ४१% जास्त असतो. रेस्टॉरंटमध्ये लाल मांसाचा भाग जास्त असतो. चविष्ट जेवणासाठी बाहेर भरपूर खाल्ल्याने तुमचा हृदयरोग किंवा पक्षाघाताचा धोका वाढतो. चरबी, कोलेस्टेरॉल आणि साखरयुक्त आहारामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

बाहेरचे खाल्ल्याने phthalates (एक रासायनिक संयुक्त) जे पोटात अति जाणे चांगले नसते त्याची शरीरात जास्त आवक होते. phthalates ची व्याख्या “सिंथेटिक रसायनांचा एक वर्ग म्हणून करतात, ज्याच्या संपर्कामुळे शरीरातील अंतःस्रावी कारभारात व्यत्यय येतो. शरीरातील हार्मोन्सवर परिणाम करतात,” रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ, प्लास्टिक पॅकेजिंग, फूड हॅण्डलिंग ग्लोव्हज, फूड ट्युबिंग आणि इतर खाद्यपदार्थ मुळे phthalates या सारख्या रसायनांच्या संपर्कात शरीर येते. तुमच्या खाण्याच्या पद्धतींवर आधारित phthalates फक्त दिवसभर शरीरात राहतात व त्यामुळे तुम्हाला त्याचा धोका पोहोचू शकतो.

बाहेरचे अन्न आणि संसर्ग

रस्त्यावर विकल्या जाणार्‍या खाद्यपदार्थांमध्ये सामान्यतः आढळणारे अन्नजनित जिवाणू सापडतात – रोगजनक म्हणजे बॅसिलस सेरेयस, क्लोस्ट्रिडियम परफ्रिन्जेन्स, स्टॅफिलोकोकस ऑरियस आणि साल्मोनेला एसपीपी. जे रस्त्यावरील खाद्यपदार्थांचे सेवन करतात, त्यांना अतिसार, कॉलरा, विषमज्वर आणि अन्न विषबाधा यांसारख्या अन्नजन्य आजार जास्त होत असल्याची शक्यता असते व आपण नेहमी पावसाळ्यात ते पाहातो.

सतत बाहेरचे खाण्याने वजन वाढते

बऱ्याचदा लहान मुले टीव्ही बघत वेफर्स खात व कोल्ड ड्रिंक्स पित असतात. घरचे अन्न खाण्यापेक्षा बाहेर खाणे हे शरीरातील चरबी वाढवते व वजन वाढवते. या खाण्याची चटक लागल्याने भुकेपेक्षा जास्तच खाल्ले जाते. आवश्यक तेवढा व्यायाम केला नाही किंवा व्यवसाय बैठा असल्यास, हे जास्त खाणे खर्च होत नाही. असे हे खाणे मग शरीरात चरबीच्या स्वरूपात साठवले जाते. हल्ली या कारणामुळेच यकृतातील चरबीचे प्रमाण खूप वाढले आहे व त्यामुळे सिर्र्होसीस चे प्रमाण सुद्धा जास्त आहे.

जंक फूडचे मुलांवर फारच हानिकारक प्रभाव होतात आणि ते लक्षात येण्यापूर्वी गंभीर रूप धारण करतात. जंक फूडचा सर्वात सामान्य आणि लक्षात येण्याजोगा प्रभाव म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये लठ्ठपणा वाढणे पण त्याचबरोबर शिक्षण आणि स्मरणशक्ती ह्यांच्या समस्या, भूक आणि पचन कमी होणे. टाईप २ मधुमेह, कर्करोग यांचे वाढते प्रमाण या मागे जंक फूड आहे. अपुरी वाढ आणि विकास असेही शरीराला हानिकारक परिणाम होऊ शकतात. या सर्वांच्या मानसिक प्रभावामुळे नैराश्य येते, आणि देवाने दिलेले सुंदर शरीर आपण अविचाराने आणि जिभेच्या मोहाने दुर्बल आणि रॊगग्रस्त करतो.

बाहेर गेल्यावर… घरच्या जेवणाची किंमत कळते

जेव्हा तुम्ही जहाजावर किंवा ट्रेकला किंवा वसतिगृहात जाता तेव्हा तुम्हाला घरच्या जेवणाची किंमत कळते. भारतीय पद्धतीमध्ये चौरस आहार आहे. या मध्ये योग्य प्रमाणात प्रथिने, स्निग्ध व कर्बोदके असतात. सोबत लोणची, चटण्या जेवणाला चव आणतात. कोशिंबिरी व दही रायता योग्य प्रमाणात आतड्याला सारक व पाचक असतात. तसेच जड जेवणांनंतर मठ्ठा किंव्हा ताक हे पचनाला नेहमीच पूरक असते. असे चौरस व संपूर्ण अन्न बाहेर नेहमी मिळणे कठीणच. स्वच्छतेच्याबाबत तुम्ही काटेकोर राहून मोठ्या आजारांपासून लांब राहू शकता. प्रत्येकाचा जेवण करण्यात काहीतरी सहभाग असतो आणि प्रत्येकाची आवड आणि गरज जपली जाते. घरच्या जेवणाला पर्याय नाही आणि आईच्या जेवणाची चव ही अनोखी आणि न्यारीच असते.

Story img Loader