Celery water for liver health: लिव्हर हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे जो रक्त शुद्ध करतो आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतो. तेलकट-मसालेदार अन्न, तूप, लोणी, मलईदार दूध आणि मटण यासारखे आहार घेतल्यास फॅटी लिव्हर होऊ शकते किंवा लिव्हरच्या आजारांचा धोका वाढू शकतो. अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे लिव्हर खराब होण्याचा धोका देखील वाढतो.

लिव्हर मध्ये बिघाड झाला की त्याची लक्षणे शरीरात दिसू लागतात. भूक न लागणे, उलट्या होणे, झोप न लागणे, दिवसभर थकवा आणि आळस येणे, जलद वजन कमी होणे ही लिव्हरच्या समस्यांची लक्षणे असू शकतात. लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी आहाराची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
painkillers, addiction, Pune, Young woman arrested,
पुणे : वेदनाशामक औषधांचा नशेसाठी वापर, तरुणी अटकेत; औषधांच्या १६० बाटल्या जप्त
Jaggery on empty stomach
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे?
Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Many students in Pune face fatigue and mental stress due to lack of inadequate food intake
शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या अनेक विद्यार्थ्यांची आबाळ, आरोग्य सर्वेक्षणातून काय झाले उघड?
The work on six water tanks of Pune Municipal Corporation is still not complete Pune print news
सहा टाक्या, तरी पाणी मिळेना! पुण्यातील प्रकार

लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी ओवा खूप प्रभावी ठरतो. ओवा किचनमध्ये उपलब्ध असलेला असा मसाला आहे जो औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. यामध्ये भरपूर मात्रा मध्ये तेल असते. जे अनेक बायोएक्टिव्ह संयुगे बनलेले आहे. या तेलामुळेच त्याचे औषधी महत्त्व अधिक आहे. ओवा हा एक मसाला आहे जो पाचक फायबरचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे आतड्याचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. ओव्यामध्ये जबरदस्त उपचारात्मक गुणधर्म आहेत.

औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या ओव्याचा वापर लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी खूप प्रभावी ठरतो. आयुर्वेद तज्ज्ञ आचार्य बालकृष्ण यांच्या मते, ओव्याचे पाणी उकळल्यानंतर त्याचा वापर केल्यास लिव्हरच्या आजारांपासून आराम मिळतो. ओवा लिव्हर कसे निरोगी ठेवते आणि त्याचे सेवन केल्याने कोणते रोग बरे होतात ते जाणून घेऊया..

( हे ही वाचा: मासिकपाळीत तीव्र वेदना होणे ‘या’ ५ आजारांचे असू शकते लक्षण; वेळीच जाणून घ्या)

ओव्याचे पाणी लिव्हर बरे करण्यासाठी प्रभावी आहे

जर तुम्ही जास्त मद्य प्यायले असेल किंवा अल्कोहोल प्यायल्याने लिव्हर खराब झाला असेल तर तुम्ही ओव्याचे पाणी प्यावे. दारूच्या व्यसनापासून मुक्त होण्यासाठी ओव्याचे पाणी देखील प्रभावी आहे. ओव्याच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने लिव्हरचे कार्य सुरळीत होण्यासह अन्नातून पोषक तत्वांचे शोषण वाढण्यास मदत होते.

ओव्याचे पाणी बनवण्यासाठी १०० ग्रॅम ओवा घ्या आणि ८०० मिली पाण्यात ते पाणी २५० मिली पर्यंत कमी होईपर्यंत उकळा. हे पाणी गाळून बाटलीत भरून ठेवा आणि दररोज जेवणापूर्वी एक कप पाणी प्या. याचे सेवन केल्याने लिव्हर निरोगी राहते आणि दारूच्या व्यसनातूनही सुटका होते.

ओव्याचे पाणी हृदय निरोगी ठेवते

अँटी-ऑक्सिडंट गुणधर्माने समृद्ध असलेले ओव्याचे पाणी हृदयरोग्यांसाठी वरदान आहे. अँटिऑक्सिडंट खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते आणि हृदय निरोगी ठेवते.

Story img Loader