Pumpkin seeds Benefits: निरोगी शरीरासाठी आहारात फळे, भाजीपाल्याचा समावेश करावा, असा सल्ला तज्ज्ञ देतात. प्रत्येक भाजीत भरपूर पोषणमूल्ये असतात. त्यामुळे भाज्यांचे सेवन आरोग्यासाठी लाभदायक ठरते. काही भाज्यांची साले आणि बियादेखील आरोग्यासाठी उत्तम असतात. भोपळा हा त्यापैकीच एक. भोपळा या भाजीमध्ये अनेक पोषक घटक असतात. ही भाजी खाण्यासही स्वादिष्ट आहे आणि आपण ती वेगवेगळ्या प्रकारे तयार करू शकता. बहुतेक लोक भोपळा वापरतात आणि त्याच्या बिया फेकून देतात. मात्र, भोपळ्याच्या बियांमध्ये फायबर, जीवनसत्त्वे अ, क, ई, लोह, कॅल्शियम, नियासिन, रिबोफ्लेविन, जस्त व फोलेट यांसारखे पोषक घटक असतात.

भोपळ्याच्या बिया आपल्या शरीरासाठी एखाद्या खजिन्यापेक्षा कमी नाहीत. भोपळ्याच्या बिया आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेल्या अनेक पोषक घटकांनी समृद्ध असतात. मधुमेह, हृदयविकार, कर्करोग यांसारखे गंभीर आजार टाळण्यासाठी भोपळ्याची भाजी उपयुक्त ठरते. तसेच भोपळ्याच्या बियादेखील आरोग्यासाठी चांगल्या असतात. या बियांमधील अनेक पोषक घटकांमुळे आरोग्याशी संबंधित समस्या दूर ठेवण्यास साह्य मिळते. त्याचप्रमाणे बाजारामध्ये मिळणारे निळ्या रंगाचे एक फळ आरोग्यासाठी फार गुणकारी आहे. या निळ्या फळाला ब्ल्यूबेरी, असे म्हणतात. चवीला आंबट असणारे हे फळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. भोपळ्याच्या बिया आणि ब्ल्यूबेरी संध्याकाळच्या नाश्त्यात खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळू शकतात. पोषणतज्ज्ञ ईशांका वाही यांनी याबाबत माहिती दिल्याचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. आपण त्याबाबत सविस्तर जाणून घेऊ.

Liver health 5 Fruits That Will Hydrate Your Liver And Keep It Running Smoothly
यकृत निरोगी ठेवायचं? यकृताच्या आरोग्याची चिंता सतावतेय? ‘ही’ फळे खा अन् टेन्शन विसरा!
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
Chia Seeds Benefits Can Eating Chia Seeds Every Morning Help With Fat Loss? Here's The Truth
रोज सकाळी उपाशीपोटी चिया सीड्सचं पाणी प्यायलं तर शरीरावर काय परिणाम होतील? वजन कमी करत असाल तर हे वाचाच
These simple tips will help to make a delicious food
जेवण बनवताना खूप धावपळ होते? ‘या’ सोप्या टिप्स रूचकर जेवण बनवण्यासाठी करतील मदत
सतीश आळेकर यांना ‘जनस्थान’; १० मार्च रोजी नाशिकमध्ये पुरस्काराने गौरव
tabebuia rosea trees bloom along vikhroli highway
टॅब्यूबियाच्या फुलांनी विक्रोळी परिसर बहरला
What Happens To Your Body When You Eat A Clove Daily?
रिकाम्या पोटी दररोज एक लवंग खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होईल?; वाचाच एकदा डॉक्टरांनी सांगितलेले आश्चर्यकारक फायदे…

(हे ही वाचा : जेवणानंतर ग्रीन टी प्यायल्याने झपाट्याने वजन कमी होऊ शकते? जाणून घ्या तज्ज्ञांकडून…)

भोपळ्याच्या बिया सेवन करण्याचे फायदे

१. भोपळ्याच्या बियांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते आणि त्यामुळे पचनसंस्था मजबूत होते. तसेच बद्धकोष्ठता दूर होण्यासही मदत मिळते. टाईप-२ मधुमेहींसाठीही त्यांचे सेवन करणे चांगले आहे.

२. भोपळ्याच्या बियांमध्ये क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते; जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यात प्रभावी ठरते. त्यामुळे बदलत्या ऋतूत होणारे संसर्गजन्य आजार टाळता येतात.

३. भोपळ्याच्या बियांमध्ये असंतृप्त चरबीसह अल्फा लिनोलेनिक अॅसिड आढळते. त्यामुळे हृदय मजबूत होते. भोपळ्याच्या बिया रक्तप्रवाह वाढवून रक्तदाब कमी करतात हे अनेक अभ्यासांमध्ये सिद्ध झाले आहे. तसेच कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत होते. अशा प्रकारे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

४. भोपळ्याच्या बिया त्वचेच्या अनेक समस्या दूर करतात. त्यामधील फायबरमुळे पोट भरलेले राहते आणि त्यामुळे वजन कमी होते. भोपळ्याच्या बिया मेंदूलाही निरोगी ठेवतात.

५. आजकाल व्यग्र जीवनशैली आणि झोपेचा अभाव यांमुळे दिवसभर थकवा जाणवतो, अशा वेळी भोपळ्याच्या बियांचे सेवन अवश्य करा. कारण- त्यामुळे रक्त व ऊर्जा वाढते आणि मग तुम्ही नव्या जोमाने काम करू शकाल.

त्याच प्रमाणातील ब्ल्यूबेरी आहारातील फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स, विशेषत: अँथोसायनिन्सने समृद्ध असतात. ते वजन व्यवस्थापनासाठी एक आदर्श नाश्ता ठरू शकतो. कारण- त्यातील उच्च दर्जाच्या फायबरमुळे निरोगी पाचक प्रणाली राखण्यास मदत मिळते आणि तृप्ती वाढते. ब्ल्यूबेरीमध्ये असलेली संयुगे त्यांच्या शक्तिशाली दाहकविरोधी आणि कर्करोगविरोधी गुणधर्मांसाठीदेखील ओळखली जातात.

ब्ल्यूबेरीच्या सेवनाचे फायदे

१. वजन कमी करण्यासाठी ब्ल्यूबेरीचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते. ब्ल्यूबेरीमध्ये असलेले पोषक घटक आणि गुणधर्म वजन कमी करण्यासाठी आणि शरीरातील चयापचय व्यवस्थित ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

२. ब्ल्यूबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. त्यात क जीवनसत्त्व भरपूर असते; जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते.

३. त्यात आढळणारे जीवनसत्त्वे, खनिजे व फायटो न्यूट्रिएंट मेंदूच्या पेशींचे संरक्षण करतात. त्याचबरोबर सेंट्रल नर्व्हस सिस्टीमचे आरोग्यदेखील चांगले राखले जाते.

४. ब्ल्यूबेरीमधील अँटिऑक्सिडंट्स हे त्यांच्या दाहकविरोधी गुणधर्मांसह जळजळ कमी करून आणि रक्तप्रवाह सुधारून निरोगी हृदयाला प्रोत्साहन देऊ शकतात.

५. ब्ल्यूबेरी हा आहारातील फायबरचा एक चांगला स्रोत आहे; जे बद्धकोष्ठता रोखून पाचक आरोग्यास प्रोत्साहन देते. त्याशिवाय फोड आणि पोटाशी संबंधित इतर समस्यांपासून आराम मिळतो.

Story img Loader