Amla Health Benefits In Marathi : चांगले केस आणि त्वचा कोणाला नको असते? तर याचबाबतची माहिती पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवाने गुंजन तनेजाबरोबर झालेल्या पॉडकास्टमध्ये दिली. सोनम बाजवा म्हणाली, “आनुवंशिकदृष्ट्या चांगले केस आणि त्वचेचा आशीर्वाद तिला मिळाला आहे. पण, सांगायचे झाल्यास आवळा हे असं एक फळ आहे, ज्याचा मी बऱ्याच काळापासून विविध रूपांत उपयोग करते आहे. जर आवळ्याचा रस पिणे शक्य नसेल, तर मी ते फळ इतर कोणत्याही स्वरूपात खाते. पण, जर मला शक्य असेल, तर रोज आवळ्याचा रस पिणे मी पसंत करते.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आवळ्याचे फायदे समजून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने मुंबईच्या झिनोव्हा शाल्बी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ जिनल पटेल यांच्याशी चर्चा केली. आवळ्याचे भारतात मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. कारण- त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत (Amla Health Benefits).

आवळा, ज्याला भारतीय गुसबेरी (gooseberry) म्हणतात. हे लहान फळ हिरव्या रंगाचे दिसते. आवळा व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स, फायबर व खनिजे यांसारख्या आवश्यक पोषक घटकांनी समृद्धसुद्धा आहे. कच्चा आवळा, आवळा ज्यूस, आवळा पावडर, आवळा कँडी ते आवळा तेल अ आवळ्याचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. तसेच आवळा खायला अनेकांना आवडतो. कारण- तो आंबट आणि किंचित कडू असतो. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठता, पोट फुगणे, गॅस व अपचनाचा त्रास असलेल्या लोकांनी आवळा खाण्याचा प्रयत्न करावा (Amla Health Benefits), असे जिनल पटेल म्हणाल्या आहेत.

हेही वाचा…Fake Or Adulterated Butter: तुम्ही बनावट बटर तर खात नाही ना? खरं बटर कसं ओळखावं? तज्ज्ञांनी सांगितल्या ‘या’ टिप्स

आवळ्यातील प्रथिने भुकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात (Amla Health Benefits)

जिंदाल नेचरक्योर इन्स्टिट्यूटच्या मुख्य आहारतज्ज्ञ पीएस सुषमा यांनी सांगितले की, आवळ्याच्या नियमित सेवनाने इन्फेक्शन, तसेच सर्दी आणि इतर आजारांपासूनही चांगले संरक्षण मिळू शकते. आवळ्यातील प्रथिने भुकेवर (cravings) नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतात आणि त्यामुळे वजन व्यवस्थापनासाठी आवळा एक उत्तम उपाय ठरू शकतो. आरोग्यदायी खाण्याच्या सवयींमध्ये भूक कमी करण्यासाठी आवळा योगदान देऊ शकतो, असे सुषमा म्हणाल्या आहेत.

आवळ्याच्या इतर आरोग्यदायी फायद्यांमध्ये त्वचेचे चांगले आरोग्य, केस मजबूत करणे आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे या गोष्टींचा समावेश असू शकतो. आवळ्यातील अँटिऑक्सिडंट्स, सी रॅडिकल्सशी लढून आणि कोलेजन उत्पादनास समर्थन देऊन निरोगी त्वचेसाठी योगदान देतात. आवळ्याचे नियमित सेवन केल्याने नैसर्गिक तेज आणि त्वचेचा टेक्श्चर सुधारण्यास मदत मिळू शकते.

तुम्ही काय लक्षात ठेवलं पाहिजे ?

मात्र, आवळा जास्त खाणे शरीरासाठी हानिकारकसुद्धा ठरू शकते. पोटात पेटके, गॅस, गोळा येणे किंवा ॲलर्जी यांसारख्या अनेक प्रकारच्या समस्यांचा अनुभव येऊ शकतो. तुमच्या नियमित आहारात नवीन गोष्टी किंवा पदार्थांचा समावेश करण्यापूर्वी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या. निर्णय घेण्यासाठी तुमचे डॉक्टर तुम्हाला फायदे आणि साइड इफेक्ट्स सांगण्यात आणखीन मदत करू शकतात. लक्षात ठेवा, संयम महत्त्वाचा आहे, असे जिनल पटेल म्हणाल्या आहेत.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amla helps improve digestive tract people with constipation bloating gas and indigestion should try eating in different way asp