Amla Tea Better Than Green Tea : आपल्यातील बरेच जण चहाप्रेमी आहेत. तसेच अनेक जण ग्रीन टी, ब्लॅक टी किंवा दूध टाकून चहा पिणे पसंत करतात. तुम्ही आतापर्यंत चहाचे वेगवेगळ्या प्रकारे सेवन केले असेल. पण, तुम्ही कधी आवळा किंवा गुसबेरीच्या चहाचे सेवन केले आहे का ? नाही… शेफ व्यंकटेश भट यांच्या मते, ग्रीन टीपेक्षा या चहामध्ये २,५०० पेक्षा जास्त अँटीऑक्सिडंट्स आहेत (Amla Tea Benefit ). शेफ व्यंकटेश भट यांनी सोशल मीडियावर त्यांच्या शोदरम्यानची एक क्लिप शेअर केली आहे. या क्लिपमध्ये ते आवळा, आले, पुदिन्याची पाने, ओवा आदी पदार्थांपासून तयार केलेल्या चहाची रेसिपी शेअर करताना दिसले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साहित्य –

१ आवळा ठेचून घ्या, ४ पुदिन्याची पाने, १ इंच – आले, ओवा, पाणी इत्यादी.

कृती –

१. पाणी उकळवा आणि त्यात ठेचून घेतलेला आवळा, पुदिन्याची पाने, आले, ओवा आदी सर्व साहित्य घाला.
२. नंतर पाणी उकळू द्या.
३. तयार मिश्रण गाळून घ्या आणि चहाचे सेवन करा.

शेफ व्यंकटेश भट यांच्या मते, हा चहा(Amla Tea Benefit ) छातीत जळजळ आणि हृदयाच्या आरोग्यासाठी एक चांगला उपाय आहे आणि वृद्धत्वाला लांब ठेवण्यासदेखील मदत करतो. आवळा, पुदीना, आले व ओवा यांच्या या मिश्रणात २,५०० पेक्षा जास्त अँटिऑक्सिडंट्स असतात आणि ग्रीन टीमध्ये १० अँटिऑक्सिडंट्स असतात. अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असल्यामुळे हा चहा रोज बनवा आणि प्या. ग्रीन टीमध्ये कॅटेचिनसारखी संयुगे असतात, जो पॉलिफेनॉलचा एक प्रकार आहे. त्यामुळे आवळ्याच्या चहाचे अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म आणि असंख्य आरोग्य फायदे आहेत.

हेही वाचा…Shalini Passi : शालिनी पासीने सांगितला झोपेसाठी रामबाण उपाय; फक्त कोमट पाण्यात ‘हा’ पदार्थ मिक्स करून प्या; वाचा डॉक्टरांचे मत

व्हिडीओ नक्की बघा…

मग ग्रीन टीपेक्षा आवळ्याचा चहा चांगला आहे का? (Amla Tea Benefit )

हे जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने, क्लिनिकल डाएटिशियन ​(आहारतज्ज्ञ) गरिमा गोयल यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या मते, आवळ्याच्या चहामध्ये ग्रीन टीपेक्षा २,५०० पट जास्त अँटीऑक्सिडंट्स असल्याचा दावा ‘एक्साग्गेर्टेड’ म्हणजेच अतिशयोक्तीपूर्ण (exaggerated) आहे.

१. चहा कसा बनवला जातो? चहाच्या स्वरूपात अँटिऑक्सिडंट्स सामग्री चहा कशा प्रकारे तयार केला जातो यावर अवलंबून असते. ताजा आवळा आणि वाळलेला आवळा पावडर दोन्ही अँटिऑक्सिडंट्समध्ये फरक आहे. जेव्हा तुम्ही चहा बनवता तेव्हा काही अँटिऑक्सिडंट्स फळ किंवा पावडरमधून पूर्णपणे पाण्यात जात नाहीत, असे गरिमा गोयल म्हणाल्या आहेत.

२. सर्व्हिंग साईज – सर्व्हिंग आकार आणि प्रत्येक फॉर्ममधील अँटिऑक्सिडंट्सची जैवउपलब्धता यांची तुलना लक्षात घेतली पाहिजे.

३. गोयल यांनी स्पष्ट केले की, आवळा चहा खरोखरच अँटिऑक्सिडंट्सचे पॉवरहाऊस आहे आणि ग्रीन टीच्या तुलनेत प्रतिसर्व्हिंगमध्ये अधिक अँटीऑक्सिडंट देऊ शकते. पण, उदाहरणार्थ २,५०० पट जास्त अँटीऑक्सिडंट्स असल्याचा दावा हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे आवळ्याचा चहा, ग्रीन टी या दोन्हींचे वेगवेगळे आणि खास फायदे आहेत. तसेच त्यांचे सेवन करणे हा आरोग्यदायी आहाराचा भाग असू शकतो.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amla tea vs green tea which better chef share recipe read health benefits asp