Natural Home Remedies For Stomach Ulcers: सकाळी उठल्यावर, आंघोळ केल्यावर अनेकांना पोटात जळजळ जाणवते. काही खाल्लं नसेल तर हा त्रास अधिकच वाढतो. पण खाल्लं की बरं वाटेल हा एवढाच उपाय यावर काम करत नाही. सुरुवातीला केवळ ऍसिडिटी वाटणारी ही जळजळ पोटाच्या अल्सरचे लक्षण असु शकते. वेळीच लक्ष न दिल्यास पोटदुखी, उलटी, मळमळ असेही त्रास वाढू शकतात. पोटाचा अल्सर वाढून आतड्यांना सुद्धा इजा होऊ शकते. आतड्यांच्या आतील बाजूस पोटातील ऍसिड हल्ला करू लागते ज्यामुळे आरोग्याला मोठा धोका निर्माण होतो. आज आपण पोटाच्या अल्सरवर एक नामी आयुर्वेदिक उपचार पाहणार आहोत.
आवळ्याचे फायदे
आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या माहितीनुसार आवडल्यात असणाऱ्या गॅलिक ऍसिडमुळे पोटातील म्युकोसल लायनिंग म्हणजेच ऍसिड व पोटाच्या त्वचेच्या मध्ये असणारा पडदा सुरक्षित राहण्यास मदत होते. यामुळेच पोटाचा अल्सर अगोदर असल्यास त्यातही आराम मिळू शकतो. आवळ्याला स्त्राव विरोधी व अल्सर विरोधी म्हणून ओळखले जाते. आवळा भूक वाढवूनही तुम्हाला जळजळीपासून सुरक्षित ठेवू शकतो. यामुळे परिणामी गॅस्ट्रोइन्टेस्टाइनल समस्यां कमी होण्यास मदत होते.
आवळ्यात पोषक तत्व व व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. आवळ्यात संत्र्याच्या तुलनेत आठ पट अधिक व्हिटॅमिन सी व जांभुळापेक्षा दुप्पट अँटिऑक्सिडंट असतात. आवळ्याला सुपरफूड म्हणूनही ओळखले जाते. थंडीच्या दिवसात आवळे बाजारात येतात, निदान या काळात तरी ताजे आवळे खाल्ल्याने वर्षभर आरोग्य ठणठणीत राहण्यास मदत होते. आपण आवळे सुकवून किंवा रस बनवून ठेवून वर्षभरही सेवन करू शकता.
आवळ्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती कमी होण्यास मदत होते. इतकेच नव्हे तर चेहरा, केस व रक्त यासंबंधित महत्त्वाच्या समस्या दूर करण्यासही आवळा मदत करतो. तुम्हाला दूरचे दिसत नसेल तरी आवळा तारणहार ठरू शकतो. आणल्याने पचनप्रक्रिया सुधारून ऍसिडिटी सुद्धा कमी होण्यास मदत होते.
हे ही वाचा<< युरिक ऍसिडचा त्रास झटक्यात कमी करा; काजू बदमासह ‘हे’ पाच नट्स करतील अमृतासमान काम
आवळ्याचे किती व कसे सेवन करावे?
आचार्य बाळकृष्ण यांच्या माहितीनुसार आवळ्याचा मुरंबा रिकाम्या पोटी खाल्ल्याने शौचास न होणे व ऍसिडिटी अशा समस्या दूर होण्यास मदत होते. एका दिवसात आपण निदान दोनवेळा आवळ्याचे सेवन करणे फायद्याचे ठरू शकते. एक चमचा आवळ्याचा रस व एक चमचा मध मिसळून सेवन केल्याने पॉट डिटॉक्स होण्यात मदत होते. तुम्हाला तोंडात सतत छोट्या फोडी येण्याचा त्रास असल्यास एक चमचा आवळा पूड, अर्धा चमचा बडीशेप, अर्धा चमचा जिरे पूड एकत्र करून खाल्ल्यास या फोड्या कमी होण्यास मदत होते. प्रवासात उलटीचा त्रास होत असेल तरीही हे घरगुती चूर्ण नेहमी जवळ ठेवावे.