Fruits Good for Diabetes:  मधुमेह ही समस्या जगभरात चिंतेचा विषय ठरत आहे. दिवसेंदिवस याचे रुग्ण वाढत आहेत. बदलती जीवनशैली आणि चुकीच्या पद्धतीने खाणे, पिणे अशा अनेक कारणांमुळे लोक मधुमेहाचे बळी ठरत आहेत. मधुमेह हा एक गंभीर आणि लवकर बरा न होणारा आजार आहे. त्यामुळे अनेकांना मधुमेह आणि मधुमेहपूर्व आजाराबरोबर जगताना रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवावी लागते. त्यासाठी खाण्या-पिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्यावे लागते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेक जण काही फळे मधुमेहावर फायदेशीर असल्याचा सल्ला देतात. विशेषत: हिवाळ्यात संत्री आणि सफरचंद मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे यातील कोणती फळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याच विषयावर अपोलो रुग्णालयाच्या मुख्य पोषण तज्ज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना मधुमेहाच्या रुग्णांनी आहारात कोणत्या फळाचा कशा प्रकारे समावेश करावा याविषयी माहिती दिली आहे.

दरम्यान, कोणत्याही फळाचे आरोग्यदायी फायदे त्याच्या आकार आणि सेवनावर अवलंबून असतात. कारण- फळातील कॅलरीज लक्षात घेऊन, ते किती प्रमाणात सेवन केले पाहिजे हे ठरवावे लागते. तसेच कोणतेही फळ सेवन करताना त्यात १५ ग्रॅमपेक्षा जास्त कर्बोदके नसावीत. अशा वेळी हिवाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांनी सफरचंद किंवा संत्री खाणे कितपत फायदेशीर ठरू शकते ते जाणून घेऊ..

मधुमेह ते हृदयविकार, दालचिनीचे सेवन करण्याचे ‘हे’ पाच जबरदस्त फायदे तुम्हाला माहितेय का? डॉक्टर काय सांगतात? वाचा

मधुमेहाच्या रुग्णांसाठी सफरचंद खरचं फायदेशीर ठरु शकते का?

सफरचंदांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते; जे साखरेच्या पचनाची क्रिया मंद करते आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी अचानक वाढ होण्यापासून रोखते. त्यामुळे तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते. सफरचंदातील पॉलिफेनॉल इन्सुलिन निर्मितीसाठी जबाबदार असलेल्या बीटा या पेशींची झीज रोखतात.

शरीरातील कर्बोदकांचे प्रमाण नियंत्रित ठेवायचे असेल, तर लहान आकाराचे सफरचंद खा. कारण- लहान सफरचंदांमध्ये सुमारे १५ ग्रॅम कर्बोदके असतात. सफरचंदाबरोबर थोडीशी प्रथिने किंवा हेल्दी फॅट्स वाढवण्याचा विचार करीत असाल, तर तुम्ही मूठभर डायफ्रूट्स किंवा पनीरचा तुकडा खाऊ शकता.

एका मध्यम आकाराच्या सफरचंदात चार ग्रॅम फायबर असते. तसेच मध्यम आकाराच्या एका सफरचंदात ८.३७ मिग्रॅ इतके क जीवनसत्त्व असते. सफरचंदाच्या सालींमध्ये हृदयाचे संरक्षण करणारे अँटिऑक्सिडंट्स असतात. ३६ ग्लायसेमिक इंडेक्स आणि सहा ग्लायसेमिक असलेल्या सफरचंदांमध्ये साखरेचे प्रमाण खूप कमी असते.

संत्र्याच्या सेवनाने मधुमेहाचे प्रमाण नियंत्रणात राहते का?

लिंबूवर्गीय फळांमध्ये समाविष्ट असलेले संत्रे हे फळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. फायबर आणि जीवनसत्त्वाने समृद्ध या फळात ग्लायसेमिक इंडेक्स ३१ ते ५० च्या दरम्यान असतो. मध्यम आकाराच्या संत्र्यामध्ये साधारणपणे १५ ग्रॅम कर्बोदके असतात. दररोज एका मध्यम संत्र्याचे सेवन केल्यास तुम्हाला एका दिवसाला आवश्यक असलेले जीवनसत्त्व क (६३ मिलिग्रॅम) मिळेल.

एका मध्यम संत्र्यामध्ये फोलेट (२४ mcg) असते; जे लाल रक्त पेशी तयार करण्यास मदत करते आणि पोटॅशियम (२३८ mg); जे रक्तदाब नियंत्रित करते.

दोन्ही फळांचे सेवन करण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती?

दोन्ही फळे उत्तम आहाराचा भाग म्हणून किंवा स्नॅक्स म्हणून खाणे आरोग्यदायी ठरू शकते. ही फळे रक्तातील साखरेचे वाढते प्रमाण रोखण्यास मदत करतात. पण रिकाम्या पोटी फळे खाणे टाळा; विशेषत: झोपायच्या आधी. कारण- यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण लवकर वाढू शकते. जर तुम्ही दिवसाच्या सुरुवातीला या फळांचे सेवन करीत असाल, तर तुमच्या शरीरातील नैसर्गिक साखरेवर प्रक्रिया करण्यासाठी जास्त वेळ मिळतो.

मधुमेहाच्या रुग्णांनी फळं खाण्यापूर्वी लक्षात ठेवाव्यात ‘या’ गोष्टी :

१) लहान आकाराची फळे निवडा : आपल्या आहारातील कर्बोदकांचे सेवन प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी लहान आकाराची फळे निवडणे गरजेचे आहे. तसेच फळाचा आकार मोठा असल्यास त्याचे लहान लहान तुकडे करा.

२) ज्यूसपेक्षा असेच फळ खा : फळांचा ज्यूस बनवण्यापेक्षा असेच संपूर्ण फळ खा; ज्यामुळे त्यातील फायबरचे प्रमाण तसेच ठेवता येते.

३) समतोल राखण्यासाठी फळांची पेअरिंग करा : फळ खाताना त्याबरोबर थोडे प्रोटीन आणि हेल्दी फॅट्सने समृद्ध पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित करता येऊ शकते; तसेच आहारातही समतोल राखता येतो.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An apple or an orange which fruits is best for blood sugar control sjr
Show comments