ऋतुसंधिकाळाचे मानवी आरोग्यामधील हे महत्त्व आपल्या पूर्वजांच्या कधीच लक्षात आले होते. या दिवसांमध्ये मानवाने आपल्या आरोग्याला जपायला हवे, हेसुद्धा त्यांच्या ध्यानात आले होते. त्यासाठी काय-काय काळजी घ्यायला हवी याचासुद्धा त्यांनी अभ्यास केला होता आणि त्यानुसार ते आपले आरोग्य सांभाळत होते. ऋतुसंधीकाळामध्ये घ्यावयाची महत्वाची काळजी म्हणजे आधीच्या ऋतुचर्येचा अचानक त्याग न करणे आणि अर्थातच पुढे येणार्‍या ऋतुचर्येचा स्वीकार अकस्मात न करणे.

नेमके सांगायचे तर ऋतुसंधीकाळामध्ये पहिल्या ऋतूच्या शेवटच्या आठ दिवसांमध्ये त्या ऋतुचर्येचा सावकाश त्याग करावा आणि पुढील आठ दिवसांमध्ये येणार्‍या ऋतुचर्येचा क्रमाने स्वीकार करावा. सावकाशीने त्याग व क्रमाने स्वीकार या गोष्टीला आयुर्वेदाने इतके महत्त्व दिले आहे की ग्रंथामध्ये ते कसे करावे हेसुद्धा पटवूने दिले आहे. जसे की हिवाळा आहे म्हणून तुम्ही गरम मसाले वापरत असाल आणि उन्हाळा सुरू होईल तेव्हा गरम मसाल्याचे प्रमाण कमी करायचे असेल, तर ते अचानक न करता हिवाळ्यातल्या शेवटच्या आठ दिवसांमध्ये रोज १।८ एवढ्या प्रमाणात कमी करत जाऊन आठव्या दिवशी पूर्ण थांबवावे. तसेच उन्हाळ्यानंतर पाऊस आला म्हणून अचानक गरम पाणी प्यायला लागू नये. सुरुवातीला साधे पाणी, नंतर कोमट, मग थोडे गरम असे पाणी स्वीकारावे. हा नियम आहारविहारातल्या शक्य तेवढ्या गोष्टींना शक्य तितका लागू करावा. ऋतुसंधीकाळामध्ये आरोग्य अबाधित ठेवण्याचा हा एक सोपा मंत्र आहे.

India Meteorological Department issues yellow alert for rain in Vidarbha and Marathwada
आज दूपारनंतर पावसाला सुरुवात, विदर्भ आणि मराठवाड्याला ‘येलो अलर्ट’
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Nagpur people excited about New Year house party
नववर्षाच्या ‘हाऊस पार्टी’ची नागपूरकरांना हौस…
Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
Special local trains on New Year Local trains will run at night on Central and Western Railways
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विशेष लोकल; मध्य, पश्चिम रेल्वेवरून रात्री धावणार लोकल
Tourists unaware of public holiday rules crowd in front of Veermata Jijabai Bhosale Park
सार्वजनिक सुट्टीच्या नियमाबाबत अनभिज्ञ पर्यटकांची राणीच्या बागेसमोर गर्दी
Having trouble starting your car in winter
हिवाळ्यात गाडी सुरू करण्यात अडचणी येतायत? ‘या’ गोष्टी एकदा तपासून पाहा
chatura loksatta marathi news
स्त्री आरोग्य : नववर्षाचा संकल्प; फिट राहा!

अपथ्य टाळा

ऋतुसंधीकाळामध्ये आपले आरोग्य टिकवण्यासाठी घ्यावयाची महत्त्वाची काळजी म्हणजे अपथ्य टाळणे. अपथ्य म्हणजे जे-जे तुमच्या आरोग्याला अनुकूल नाही ते टाळणे. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, अग्नी (भूक-पचनशक्ती व चयापचय), शरीराची बांधणी, रोगप्रतिकारशक्ती, बल, वय, जीवनशैली हे भिन्न-भिन्न असते. साहजिकच प्रत्येक व्यक्तीच्या शरीराची ऋतुबदलाशी सामना करण्याची रीतही वेगवेगळी असते. ऋतुबदल होत असताना प्रत्येक व्यक्तीचे शरीर त्या ऋतुबदलाला कसे सामोरे जाईल, कसे प्रतिसाद देईल हे सर्व वरील घटकांवर निर्भर असते. त्यामुळेच ऋतुसंधीकाळामध्ये कोणाला- कोणता त्रास होईल याचे भाकीत करणे तसे कठिण असते. प्रत्येक व्यक्तीला मात्र व्यक्तीशः आपल्याला ऋतुसंधीकाळामध्ये काय त्रास होतो व तो कशामुळे होतो, याची स्पष्ट कल्पना असते, जी अनुभवाने तयार होते. तुम्हाला ऋतुसंधीकाळामध्ये ज्या गोष्टींमुळे त्रास होतो, त्या सर्व गोष्टी या अपथ्य आहेत, एवढे समजून त्या-त्या गोष्टी ऋतुसंधीकाळामध्ये टाळाव्यात. आरोग्य सांभाळण्याचा हा साधासा मात्र प्रत्यक्षात प्रभावी असा उपाय आहे.

हेही वाचा… कार्यालयीन वेळेत केलेले ‘हे’ व्यायाम वाढवू शकतील तुमची कार्यक्षमता !

ताप- सर्दी- कफ- खोकल्याचा त्रास होणार्‍यांनी ऋतुसंधीकाळामध्ये थंड पाणी, थंड पदार्थ, दही-ताक-लस्सी आदी दूधदुभत्याचे पदार्थ, थंड पाणी, थंड आहार व पचायला जड आहार टाळावा. पावसाळ्यात ज्यांना हमखास सर्दी-दम्याचा त्रास होतो, त्यांनी ऋतुसंधीकाळामध्येच मासे (विशेषतः बांगडा,मुशी असे तैलयुक्त मासे), कवचयुक्त समुद्रीजीव (खेकडे,कोलंबी,कालवं), शेंगदाणे-काजू-पिस्ता अधिक पाणी असलेली कलिंगडे- काकडी- पेअर- केळे- पेरु यांसारखी फळे, आंबवलेले पदार्थ आणि पचायला जड जेवण खाणे बंद करावे. वातप्रकोप होऊन ज्यांना हाडे- सांधे-स्नायू- नसा आदी अंगांमध्ये त्रास सुरू होतात, त्यांनी थंड, कोरडा, कडू-तुरट असा आहार ऋतुसंधिकाळामध्येच टाळण्यास सुरुवात करावी. पोटदुखीचा, अपचनाचा, आंव पडण्याचा, जुलाब होण्याचा त्रास होणार्‍यांनी ऋतुसंधीकाळामध्येच बेसन, मैदा, बेकरीचे पदार्थ, छोले-सोयाबीन- चणे- पावट्यासारखी मोठी कडधान्ये, श्रीखंड-बासुंदी-गुलाबजाम- बर्फी आणि माव्याचे गोड पदार्थ, बाहेरचे अन्नपदार्थ आणि जडान्न खाण्याची चूक करू नये.

आम्लपित्ताचा, मूळव्याधीसारख्या गुदविकाराचा, रक्तस्त्रावाचा, अंगावर पित्त उठण्याचा, एकंदरच उष्णता शरीरामध्ये वाढून होणार्‍या विविध विकृतींचा त्रास होणार्‍यांनी मिरची, तिखट, आले-लसूण-मिरे वगैरे गरम मसाल्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ, काजू, पिस्ते, खजूर-खारीक वगैरे सुका मेवा,अळशी-तीळ- शेंगदाणे अशा तेलबिया, लोणचं, चहा-कॉफी, कार्बोनेटेड शीतपेये, कोंबडी, कोलंबी, मद्य वगैरे पदार्थ ऋतुसंधीकाळामध्ये कटाक्षाने टाळावेत.

हेही वाचा… Health Special: नैराश्य (डिप्रेशन) म्हणजे नेमके काय?

एकंदर पाहता जे पदार्थ आरोग्य सुस्थितीमध्ये नसताना खाऊ नये, असे सांगितले जाते असे पदार्थ ऋतुसंधीकाळामध्ये टाळणे योग्य होईल. जसे-मासे (विशेषतः मुशी- बांगडा, तार्ली यांसारखे तैलयुक्त मासे), कवचयुक्त सामुद्रजीव (खेकडा-कोलंबी-लॉबस्टर-कालवं,वगैरे), मांस, बेसन, मैदा (बेकरीचे पदार्थ), साबूदाणा, उडीद,गहू, सोयाबीन,मोठ्या आकाराची कडधान्ये (राजमां, छोले, चवळी, पावटे, वाटाणे, वाल, वगैरे), दही, चीज, मावा- खव्यापासुन केलेली व इतर साखरयुक्त मिष्टान्ने, थंड पाणी, थंड पदार्थ, मसालेदार व तळलेले पदार्थ आणि एकंदरच पचायला जड आहार टाळावा. त्याचबरोबर पोट भरेपर्यंत जेवण,आधीचे अन्न पचलेले नसताना (जठरातच असताना) पुन्हा अन्नसेवन, अतिजलपान, दिवसा झोप,रात्री जागरण,मल-मूत्र-अधो वायू अशा नैसर्गिक वेगांचा अवरोधसुद्धा करू नये.

महत्त्वाचे म्हणजे पुढे उष्ण ऋतू येणार असताना उष्ण आहारविहाराचा त्याग आणि शीत ऋतु येत असताना शीत आहारविहाराचा त्याग क्रमाने करावा. (शीत-उष्ण आहारविहाराची सविस्तर माहिती त्या-त्या ऋतुचर्येमध्ये मिळेल). याऊलट मूग, तांदूळ,गायीचे दूध, गायीचे ताक, गायीचे तूप, पिण्यासाठी गरम पाणी, हिरव्या भाज्या (विशेषतः वेलींवर येणार्‍या भाज्या) असा सहज पचणारा आहार ऋतुसंधीकाळामध्ये, तोसुद्धा मर्यादेमध्ये घ्यावा. या बाळबोध वाटणार्‍या मात्र प्रत्यक्षात उपयोगी अशा उपायांनी बरेच आजार टाळता येतील.

Story img Loader