सुभाष घई यांच्या ‘ताल’ या प्रतिष्ठित चित्रपटाला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. अनिल कपूर, ऐश्वर्या राय आणि अक्षय खन्ना यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट २७ सप्टेंबर २०२४रोजी पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित होत असताना, ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर यांनी चित्रपटाच्या शूटिंगशी संबंधित एक मनोरंजक किस्सा सांगितला आहे. ताल चित्रपटाच्या क्लायमॅक्स शॉटच्या शूटिंगपूर्वी अनिल कपूर चिंताग्रस्त आणि तणावग्रस्त होते. त्यांनी सांगितले “मी सकाळी उठलो आणि मी माझ्या पत्नीला सांगितले, ‘मी जात नाही, हा खूप मोठा सीन आहे आणि ते (दिग्दर्शक सुभाष घई) शेवटच्या क्षणी संवाद देतील आणि मला माझे सर्वोत्तम काम करायचे आहे. सकाळचे ७ वाजले होते… ८ वाजले होते… मी पद्मिनी कोल्हापुरेला माझ्यावर रेकी करायला बोलावले. मी खूप तणावग्रस्त, चिंताग्रस्त होतो. ती आली, तिने माझ्यावर रेकी केली.”

रेकी म्हणजे काय?

रेकी, एक “उपचार” पद्धत आहे जी जपानमधून आली आहे. ही उपचार पद्धती वैयक्तिक अनुभव आणि पूर्वेकडील तत्त्वज्ञानावर (Eastern philosophy) आधारित आहे, परंतु रेकी ही जपानपुरतीच मर्यादित राहिली नाही. सांस्कृतिक सीमा ओलांडून जपानच्या पलीकडे जात ती जगभर विस्तारली. RayKee हा उच्चार जपानी भाषेतील शब्दाचा आहे, जिथे ‘Ray’ म्हणजे दैवी किंवा वैश्विक आणि ‘Kee’ म्हणजे जीवन शक्ती असा आहे. युनिव्हर्सलचा सरळ अर्थ असा आहे की, “ती विश्वात सर्वत्र आढळणारी ऊर्जा आहे,” असे मानसी गुलाटी, फेस योगा आणि रेकी अभ्यासक यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.

Reshma Shinde
‘रंग माझा वेगळा’मध्ये सावळ्या मुलीला का घेतलं नाही? ‘अशी’ झालेली रेश्मा शिंदेची निवड; मालिकेच्या लेखकानं सांगितलं कारण
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
shivani rangole shares beautiful birthday wish post for kavita medhekar
“ताई तुझ्याकडून कायम…”, ऑनस्क्रीन सासूबाईंसाठी शिवानी रांगोळेची खास पोस्ट! कविता मेढेकर कमेंट करत म्हणाल्या…
Hardik Pandya Trolled For His Behavior and Showing Attitude to Arshdeep Singh in IND vs SA 2nd T20I
IND vs SA: “आता उभा राहून मजा बघ…”, हार्दिक पंड्याला मोठेपणा करणं पडलं भारी, अर्शदीपला बोललेल्या वाक्यानंतर होतोय ट्रोल
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”

हेही वाचा –“कोणताही दिग्दर्शक माझा श्रीमंत व्यक्ती म्हणून भूमिकेसाठी विचार करत नाही..”; मनोज बाजपेयींना असे का वाटते? तज्ज्ञांनी केला खुलासा

रेकी या उपचार पद्धतीचा शोध कोणी लावला?

रेकी ही जपानमधील मिकाओ उसुई (Mikao Usui) यांनी शोधून काढलेली उपचार पद्धती आहे. रेकी ही ऊर्जेतून औषधोपचार करण्याचा एक प्रकार आहे आणि एक पवित्र ऊर्जा उपचार पद्धती आहे, जी शारीरिक आरामाच्या पलीकडे जाते. ही उपचार पद्धती शारीरिक, भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिक अवस्थांमध्ये संतुलन पुनर्संचयित करण्यासाठी आहे, असे सोमा चॅटर्जी यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले. चॅटर्जी या आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित रेकी मास्टर शिक्षक आणि इनर विस्डम लाइटचे संस्थापक आहेत.

हेही वाचा –केटो डाएटमध्ये वापरले जाणारे खाद्यतेल खरंच वजन कमी करण्यास मदत करू शकते का? जाणून घ्या आहारतज्ज्ञ काय सांगतात

रेकीचा वापर कसा केला जातो ?

गुलाटी यांच्या मते, “रेकीची ऊर्जा अभ्यासकांच्या हातातून बाहेर पडते.” “अभ्यासक सामान्यतः त्यांच्या हाताचे तळवे व्यक्तीच्या डोक्यावर ठेवून किंवा ग्राहकांपासून काही इंच दूर हात धरून ऊर्जा प्रसारित करतात. रेकी कमी किंवा दूर अंतरावरही प्रसारित केली जाऊ शकते. तुम्ही खाली न वाकता तुमच्या पायांना रेकी देऊ शकता किंवा रेकी प्रॅक्टिशनर्स एका खोलीतून, संपूर्ण शहरातून, संपूर्ण राज्यातून आणि जगभरात दूरपर्यंत रेकी पाठवू शकतात. रेकी एखाद्याला विशिष्ट ठिकाणी ऊर्जा पाठवून देता येते किंवा काळाच्या पलीकडे जाऊन भूतकाळ किंवा भविष्यकाळात एखाद्या विशिष्ट वेळी ऊर्जा पाठवली जाते.

हेही वाचा – द ब्लफ’च्या शूटिंगदरम्यान आठवड्यातील सहा दिवस १२ तास काम करीत होती प्रियांका चौप्रा! शरीरावर काय होतो परिणाम; तज्ज्ञ काय सांगतात….

रेकी घेण्यामुळे काय फायदे होतात?

चॅटर्जी यांनी सांगितले की, “जेव्हा “रेकीची ऊर्जा अभ्यासकाच्या हातातून प्रवाहित होते, तेव्हा ती रेकी घेणाऱ्या व्यक्तीचे अडथळे दूर करण्यासाठी आणि तणावमुक्त करण्यासाठी कार्य करते. रेकी घेतल्यामुळे व्यक्तीला शांत आणि सर्वांगीण कल्याणाची प्रगल्भ भावना निर्माण होते. चॅटर्जी म्हणाले, “या सरावामुळे तुम्हाला नको असलेला ताणतणाव आणि सामाजिक अपेक्षांचे थर काढून टाकता येतात, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मूळ रुपाशी पुन्हा जोडण्याचा आणि तुमच्या मूळ मूल्यांशी जुळणारे जीवन जगण्यास मदत होते.”

गुलाटी पुढे म्हणाले की, “रेकी त्वरित आणि सुरक्षितपणे तणाव कमी करते.” “रेकी वेदना कमी करू शकते, रक्तदाब नियंत्रित करू शकते आणि पचन आणि उत्सर्जन दोन्ही सुधारते. “रेकी एखाद्याचे जैविक दोष रीसेट (Reset) करते असेही म्हणू शकता”, असा दावा गुलाटी यांनी केला.

हेही वाचा –तुम्हाला जीवनसत्वे बी समृद्ध आहाराची गरज का आहे? कोणत्या पदार्थांमधून मिळते B12 आणि B3? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…

रेकी म्हणजे जादू नव्हे

“ही जवळजवळ प्रत्येकासाठी योग्य असलेली एक सुरक्षित प्रथा आहे”, असा दावा करताना चॅटर्जी म्हणाले की, “रेकी कदाचित “अत्यंत संशयी” लोकांशी जुळत नाही. रेकीच्या गैर-आक्रमक स्वभावामुळे (non-invasive nature) रेकी घेणारा व्यक्ती त्याची शुद्ध, उच्च-कंपनक्षम ऊर्जा प्राप्त करण्यास इच्छुक असेल तरच ती कार्य करते. हा मोकळेपणा महत्त्वाचा आहे, कारण रेकी म्हणजे बदल घडवून आणणे किंवा जादूवर विश्वास ठेवणे नाही; ही उपचार ऊर्जा जिथे सर्वात जास्त आवश्यक आहे तिथे उर्जा वाहू देण्याबद्दल आहे,” असे चॅटर्जी म्हणाले.

रेकी हा “वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाही”, तर एक पूरक दृष्टिकोन आहे, जो एकंदर सर्वांगीण तंदुरुस्त आरोग्याचे समर्थन करतो, यावरही प्रॅक्टिशनर्स जोर देतात. चॅटर्जी म्हणाले, “रेकीवर खोलवर शोध घेण्यास इच्छुक असलेल्यांसाठी ती अधिक प्रामाणिकपणे आणि सामंजस्याने जगण्याचा एक सुंदर आणि परिवर्तनशील मार्ग देते.

हेही वाचा –फॅटी लिव्हर आजाराकडे दुर्लक्ष केल्यास शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

ही अंधश्रद्धा जास्त आहे का? (Is it more of a superstition?)

गुलाटी म्हणाल्या, “मी योग, रेकी, ॲक्युप्रेशर आणि ध्यानावर मनापासून विश्वास ठेवते. हे सर्व प्राण (ऊर्जेच्या) प्रवाहाशी संबंधित आहेत, जे आपण सराव करतो तेव्हा आपल्याला जाणवते. हे आम्हाला सर्व परिस्थितीत भावनिकदृष्ट्या स्थिर, मानसिकदृष्ट्या मजबूत आणि शारीरिकदृष्ट्या अतिशय तंदुरुस्त होण्यास मदत करते.”

चॅटर्जी यांनी सांगितले की, “माझ्याकडे असे अनेक लोक आले आहेत जे रेकीला अंधश्रद्धा म्हणून नाकारू शकतात. मी जगभरात अशा असंख्य व्यक्ती पाहिल्या आहेत, ज्यांनी त्याचे फायदे प्रत्यक्ष अनुभवले आहेत. रेकी आणि एनर्जी हिलिंगसह माझ्या परिवर्तनीय प्रवासात मला असे आढळले आहे की ते आंतरिक शांती, उद्देश, सर्वांगीण संतुलन आणि आपल्या खऱ्या आत्म्याशी अधिक संबंध शोधण्यात मदत करते, ज्यामुळे ते आपल्या संपूर्ण आरोग्याच्या प्रवासासाठी एक मौल्यवान पर्याय ठरते.”