सुभाष घई यांच्या ‘ताल’ या प्रतिष्ठित चित्रपटाला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. अनिल कपूर, ऐश्वर्या राय आणि अक्षय खन्ना यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट २७ सप्टेंबर २०२४रोजी पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित होत असताना, ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर यांनी चित्रपटाच्या शूटिंगशी संबंधित एक मनोरंजक किस्सा सांगितला आहे. ताल चित्रपटाच्या क्लायमॅक्स शॉटच्या शूटिंगपूर्वी अनिल कपूर चिंताग्रस्त आणि तणावग्रस्त होते. त्यांनी सांगितले “मी सकाळी उठलो आणि मी माझ्या पत्नीला सांगितले, ‘मी जात नाही, हा खूप मोठा सीन आहे आणि ते (दिग्दर्शक सुभाष घई) शेवटच्या क्षणी संवाद देतील आणि मला माझे सर्वोत्तम काम करायचे आहे. सकाळचे ७ वाजले होते… ८ वाजले होते… मी पद्मिनी कोल्हापुरेला माझ्यावर रेकी करायला बोलावले. मी खूप तणावग्रस्त, चिंताग्रस्त होतो. ती आली, तिने माझ्यावर रेकी केली.”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा