शांत आणि गाढ झोप ही आपल्या निरोगी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. आरोग्य, तंदुरुस्ती आणि ऊर्जा पुन्हा मिळवण्यासाठी गाढ आणि चांगल्या गुणवत्तेच्या झोपेचे महत्त्व आरोग्यसेवा तज्ज्ञ अनेकदा अधोरेखित करतात. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की याचा नेमका अर्थ काय? जीवनशैली प्रशिक्षक ल्यूक कौटिन्हो (Luke Coutinho) यांनी अलीकडेच इन्स्टाग्राम व्हिडीओमध्ये सांगितले की, “गाढ झोप हे औषध आहे.”
“काल रात्री किती जण गाढ झोपले आणि सकाळी उठताच तुम्हाला ताजेतवाने आणि पुढील दिवसासाठी तयार आहात असे वाटते? तुमच्यापैकी किती जणांना हे जाणवले आहे की, “गाढ झोप तुमचे आरोग्य/स्थिती, त्वचा, केस आणि हार्मोन्स चांगले करते,” असेही त्यांनी यावेळी विचारले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ काय सांगतात हे जाणून घेऊ या..

गाढ आणि चांगल्या दर्जाच्या झोपेचे महत्त्व समजावताना परेल येथील ग्लेनिगल्स हॉस्पिटलच्या फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट, डॉ. आरती उल्लाल (Dr Aarti Ullal) यांनी सांगितले की, झोपेतून उठताच तुम्हाला थकल्यासारखे वाटत असेल, ताजेतवाने झाल्यासारखे वाटत नसेल आणि लक्ष केंद्रित करण्यात आणि नवीन गोष्ट शिकण्यात अडथळा येत असेल किंवा रोजची कामे करताना त्रास होत असेल आणि दिवसा झोप येत असेल तर ही सर्व लक्षणे गाढ झोप न मिळाल्याची असतात.

विविध शारीरिक कार्यांना चालना देण्यासाठी झोप अत्यंत महत्त्वाची आहे हे सांगताना त्या म्हणाल्या, “जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असता तेव्हा तुमचे शरीर पेशींना दुरुस्त करण्याचे काम करते, कारण त्यामुळे स्नायू पुन्हा तयार होऊ लागतात आणि पेशी बऱ्या होतात. विशेषतः तीव्र शारीरिक व्यायाम केला असेल तर हे शरीराला जलदगतीने बरे होण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.”

डॉ. उल्लाल यांनी सांगितले की, “रात्रीची चांगली झोप केवळ रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करत नाही तर स्मरणशक्तीदेखील वाढवते, म्हणूनच रात्रीची चांगली झोप घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. गाढ झोप तुमच्या शरीरासाठी चमत्कार करू शकते. तणावपूर्ण आणि धावपळीच्या दिवसानंतर ते तुम्हाला आराम करण्यास आणि शांत होण्यास मदत करू शकते. तुम्ही झोपेत असताना कॉर्टिसोलसारखे ताण संप्रेरक कमी होतात, ज्यामुळे ताण कमी होण्यास मदत होते. चांगली झोप तुम्हाला मूड पातळी वाढवण्यास, तणाव कमी करण्यास, विविध आरोग्य समस्यांचा धोका कमी करण्यास आणि लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करू शकते,” असे डॉ. उल्लाल यांनी स्पष्ट केले.

दररोज किमान आठ ते नऊ तास झोप घेण्याचे ध्येय असले पाहिजे यावर त्यांनी भर दिला. पण, “झोपेची गरज प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकते आणि ती तुमच्या वयानुसारदेखील बदलते.”

ती म्हणाली की,”केवळ झोपेच्या प्रमाणावरच नव्हे तर झोपेच्या गुणवत्तेवरही लक्ष केंद्रित केले पाहिजे. “पण, ज्याप्रमाणे गाढ झोप किती फायदेशीर आहे, त्याचप्रमाणे जास्त वेळ झोपणे तुमच्या शरीरासाठी हानिकारक असू शकते. जेव्हा तुम्ही तुमच्या नेहमीच्या वेळेपेक्षा जास्त झोपण्याचा प्रयत्न करता तेव्हा एखाद्याला खूप थकवा जाणवू शकतो. चांगल्या झोपेसाठी, झोपण्यापूर्वी कॅफिनयुक्त पेये पिणे किंवा डिजिटल स्क्रीन वापरणे टाळण्याचा प्रयत्न करा,” असे डॉ. उल्लाल म्हणाले.