Rujuta Diwekar shared Tips : अँटी-इन्फ्लमेशन डाएट (Anti-inflammation diets) या डाएटचे नाव आपल्यातील अनेकांनी एकदा तरी ऐकले असेल. तर पोषण क्षेत्रातील हे अँटी-इन्फ्लमेशन नवीन डाएट सध्या सर्वांनी अंमलबजावणी करायला सुरुवात केली आहे. समांथा रुथ प्रभूपासून ते विद्या बालनपर्यंत जळजळ होण्यामुळे त्रस्त असलेल्या सेलिब्रिटींनी आराम आणि पुनर्प्राप्तीसाठी या आहाराचा अवलंब केला आहे. पण, सेलिब्रिटी पोषण तज्ज्ञ रुजुता दिवेकरने (Rujuta Diwekar) सोशल मीडियावर या डाएटबद्दल तिचे मत शेअर केले आहे.
व्हिडीओच्या सुरुवातीला पोषण तज्ज्ञ रुजुता दिवेकरने (Rujuta Diwekar) अँटी-इन्फ्लमेटरी या शब्दाचा अर्थ सांगितला. अँटी-इन्फ्लमेटरी म्हणजे दाहविरोधी (जळजळ होण्याचा त्रास न होणे) असा आहे. त्यामुळे अँटी-इन्फ्लमेटरी डाएट म्हणजे असे अन्न, जे खाल्ल्याने आपल्या शरीराची जळजळ होत नाही. मात्र, रुजुता दिवेकर यांनी या डाएटला विरोध दर्शवला आहे. त्यांच्या मते जळजळ होणे ही आपल्या शरीरासाठी आवश्यक बाब आहे. मात्र, जळजळ होण्याचे प्रमाण वाढले, तर ते वाईट ठरू शकते. त्यामुळे अँटी-इन्फ्लमेटरी डाएट करण्याऐवजी पोषक आहार किंवा घरी बनवलेल्या अन्नाचे सेवन करणे फायदेशीर आहे.
कोणता आहार घ्यायचा याबद्दल सांगताना, गॅस, अपचन, पित्ताचा त्रास टाळण्यासाठी अँटी-इन्फ्लमेटरी डाएट करण्यापेक्षा घरी तयार केलेले शिजवलेले अन्नपदार्थ खाण्याचा आणि अन्न ग्रहण करताना किंवा जेवताना टीव्ही, मोबाईल व सोशल मीडियाचा वापर टाळण्याचा सल्ला त्यांनी (Rujuta Diwekar) दिला आहे. कारण- यामुळे जेव्हा आपण जेवणावर पूर्ण लक्ष केंद्रित करून जेवतो तेव्हा ते अन्न लवकर पचते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून, काही महत्त्वाच्या टिप्स कॅप्शनमध्ये नमूद केल्या आहेत.
व्हिडीओ नक्की बघा…
१. जळजळ (Inflammation) – शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया, घेत असलेले किंवा घेतलेले औषधोपचार व शारीरिक अवस्था यांमुळे आपण वेळोवेळी आजारी पडत असतो. त्यामध्ये जळजळ होण्याचा त्रास संभवतो
२. अन्न – बियाणे, स्मूदी किंवा शॉट्स, कच्चे अन्न इत्यादींचे एकत्र सेवन केल्याने जळजळ या प्रतिक्रियेचे नियंत्रण करण्यास मदत मिळणार नाही. तसेच हळदीचे पाणी, ज्यूस किंवा क्लीन्सेस हे या समस्येवरील उपचार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे,
३. व्यायाम – खूप जास्त किंवा खूप कमी व्यायाम केल्यामुळे दीर्घकाळपर्यंत तीव्र दाह (inflammation) होऊ शकतो.
४. झोप – चांगली झोप घ्या. कारण- नेहमीप्रमाणे शरीराची सुधारणा (recovery) आणि वृद्धत्व प्रक्रियेचा (ageing process) सर्वांत कमी वेग असलेला पैलू आहे. ते लक्षात घेता, पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे; अन्यथा अधिक नुकसान होऊ शकते.
५. ताण – स्वतःची काळजी घ्या आणि बाह्य प्रमाणीकरण शोधण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका.
इन्फ्लमेटरी डाएट (दाहविरोधी) आहारामध्ये काय समाविष्ट आहे?
तर याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने, श्री रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन ॲण्ड रिसर्चच्या लेक्चरर व क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट सी. व्ही. ऐश्वर्या म्हणाल्या की, दाहविरोधी संपूर्ण आहार न्यूटिएन्ट डेन्स फूड्सवर (पदार्थांवर) भर देतो,दाहविरोधी संपूर्ण आहार न्यूटिएन्ट डेन्स फूड्सवर (पदार्थांवर) भर देतात, ज्यामध्ये अँटिऑक्सिडंट, निरोगी चरबी आणि फायबर असतात. तर प्रक्रिया केलेले अन्न कमी खाल्यामुळे शरीरातील साखर आणि अनहेल्दी फॅट्स कमी करतात. तर हा दृष्टिकोन दीर्घकाळ जळजळ (क्रॉनिक इन्फ्लेमेशन) कमी करण्यात मदत करू शकतो.
जळजळ कमी करण्यास मदत करणाऱ्या पदार्थांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या शाकाहारी आणि मांसाहारी लोकांसाठी दाहकतेविरोधी आहार तयार केला जाऊ शकतो. बेरी, पालेभाज्या, क्रूसीफेरस भाज्या, संपूर्ण धान्य जसे की क्विनोआ, तपकिरी तांदूळ, नट्स , हळद, आले, लसूण यांसारखे काही मसाले हे सर्वोत्तम शाकाहारी पर्याय, तर सॅल्मन, मॅकरेल, सार्डिन, अँकोव्हीज, कमी चरबीयुक्त मासे, चिकन, अंडी हे आरोग्यदायी मांसाहारी पदार्थ आहेत; ज्यात दाहकतेविरोधी गुणधर्म आहेत.
अँटी-इन्फ्लमेशन डाएट हा एक आरोग्यदायी, पोषक आहार असू शकतो. पण, तो सर्व पौष्टिक गरजा पूर्ण करू शकतो की नाही ते विशिष्ट पदार्थ, वैयक्तिक आहारातील प्राधान्ये, त्यांचे चयापचय, जेवणाचे नियोजन आणि अधिक महत्त्वाचे म्हणजे आहाराची गुणवत्ता व प्रमाण आदी अनेक घटकांवर अवलंबून असते.