Heart Attack Signs and Symptoms: ‘अनुपमा’ फेम टीव्ही अभिनेता नितेश पांडे यांचे ५३ व्या वर्षी अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यानंतर पुन्हा एकदा ५० च्या दशकातील भारतीय पुरुष हृदयाशी संबंधित आजारांचे कसे बळी ठरतात, हा मुद्दा चर्चेत आला आहे. इंडियन हार्ट असोसिएशनच्या मते, भारतीय ५० टक्के पुरुषांमध्ये हृदयविकाराचा झटका ५० वर्षांखालील किंवा त्यापेक्षा कमी वयात येतो. बहुतेक मृत्यू हे सडन कार्डिअॅक अरेस्ट (SCA) मुळे होतात, ही अशी स्थिती जिथे हृदय कोणत्याही सूचनेशिवाय किंवा संकेतांशिवाय काम करणे थांबवते. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई येथील कार्डियाक डिव्हाइस आणि हार्ट रिदम सेवांचे प्रमुख सल्लागार, कार्डिओलॉजिस्ट आणि इलेक्ट्रोफिजियोलॉजिस्ट, डॉ. वेंकट डी नागराजन यांनी सांगितल्यानुसार, “जेव्हा हृदयाच्या ठोक्यांचे समन्वय साधणारे विद्युत सिग्नल योग्यरीत्या कार्य करत नाहीत तेव्हा असे घडते.”

कोरोनरी आर्टरी डिसीज (CAD) आणि SCA चा धोका का वाढतो?

मणिपाल हॉस्पिटल, बंगळुरू येथील हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी थोरॅसिक शस्त्रक्रिया विभाग सल्लागार, डॉ. मोहम्मद रेहान सईद यांच्या मते, “सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आनुवंशिक पूर्वस्थिती! अभ्यासातून असे दिसून आले आहे की, भारतीयांना त्यांच्या पाश्चात्त्य समवयीन पुरुषांपेक्षा किमान दहा वर्षे आधी हृदयविकाराच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. सामान्यत: भारतीय प्रौढांमध्ये हृदयविकाराच्या समस्या ४० व्या वर्षाच्या सुरुवातीपासून विकसित होऊ लागतात. भारतीयांच्या शरीरात वाईट कोलेस्टेरॉल (LDL आणि ट्रायग्लिसराइड्स) जमा होण्याची आनुवंशिक समस्यादेखील असते. या खराब कोलेस्टेरॉलच्या वाढीचे व साठण्याचे कारण मुख्यत्वे आहाराच्या सवयी नसून विशिष्ट एन्झाइमॅटिक कमतरता असू शकते. हे खराब कोलेस्ट्रॉल (LDL) आणि ट्रायग्लिसराइड्स हृदयासाठी वाईट असतात कारण ते CAD चा धोका वाढवतात.”

ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
desi jugaad room heater made of brick
देसी जुगाड! थंडीपासून वाचण्यासाठी पठ्ठ्याने विटेपासून बनवला रुम हीटर; Video पाहून युजर्स शॉक, म्हणाले, “मृत्यूला…”

अलीकडील आकडेवारीनुसार, भारतात १८ वर्षांवरील सुमारे ७७ दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. सुमारे २५ दशलक्ष लोक पूर्व-मधुमेहाचे रुग्ण आहेत. याचा अर्थ त्यांना भविष्यात मधुमेह होण्याचा मोठा धोका आहे.

“अर्थात आनुवंशिकतेशिवाय जीवनशैलीचे घटक आणि उच्च रक्तदाब हेसुद्धा नक्कीच कारण आहे. “बहुसंख्य लोकसंख्येची लहानपणापासूनच बैठी जीवनशैली असते ज्यामुळे त्यांना अनेक आरोग्य समस्या आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका निर्माण होतो. अशात अचानक HIIT (हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग) आणि जिमिंगसारख्या शारीरिक हालचाली सुरू केल्यास हृदयाच्या समस्यांमध्ये वाढ होऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो,” असे डॉ. सईद म्हणतात.

‘हृदयविकाराचा झटका आणि मृत्यू’ या घटनांमध्ये पुरुषांची संख्या अधिक का?

ट्रायग्लिसराइड्स आणि LDL कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतात आणि रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा तयार करतात, ज्याला एथेरोस्क्लेरोटिक प्लेक्स म्हणतात. “जेव्हा धमन्यांवर अचानक भार किंवा ताण येतो तेव्हा या प्लेक्स निखळण्यास सुरुवात होते. विखुरलेल्या प्लेक्समुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा वाढून हृदयाला रक्ताचा नीट पुरवठा होत नाही आणि मृत्यू होतो.”

डॉ. सईद सांगतात की, सर्वसाधारणपणे, महिलांपेक्षा पुरुषांमध्ये एससीए अधिक सामान्य असतात कारण, “स्त्री हार्मोन्स जसे की इस्ट्रोजेन, यामध्ये हृदयाशी संबंधित संरक्षणात्मक गुणधर्म आहेत ज्यामुळे स्त्रियांना पेरीमेनोपॉज आणि रजोनिवृत्तीचे वय होईपर्यंत हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी असतो. रजोनिवृत्तीनंतर, स्त्री आणि पुरुष यांच्यात फारसा फरक नसतो.”

कोणती चिन्हे आणि लक्षणे ओळखावीत?

अशी कोणतीही चिन्हे आणि लक्षणे नाहीत जी तुम्हाला CAD ची प्रारंभिक स्थिती ओळखण्यास मदत करू शकतात. कारण हे संकेत बहुतेकदा अस्पष्ट असतात. अगदी अॅसिडिटी, एपिगॅस्ट्रिक वेदना, छातीत हलकी कळ येणे किंवा जबडा दुखणे यांसारख्या लक्षणांमुळेही हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका ओळखता येतो. पण समस्या अशी आहे की, ही लक्षणे अन्यही त्रासांशी संबंधित असू शकतात.

CAD चा धोका ओळखण्यासाठी कोणत्या टेस्ट करता येतील?

डॉ. नागराजन म्हणतात, “CAD चा धोका ओळखण्यासाठी सामान्य ईसीजी फार प्रभावी असू शकत नाही. कॅल्शियम स्कोअर कमी आणि ३० टक्क्यांपेक्षा कमी ब्लॉकेज दाखवणारा सीटी-कोरोनरी अँजिओग्राम हा CAD च्या कमी जोखमीचा संकेत आहे. तुमची मधुमेह स्थिती निश्चित ओळखणे (HbA1C नियमित FBS आणि RBS चाचणीपेक्षा अधिक विश्वासार्ह आहे) आणि वैद्यकीय उपचार घेणे हा CAD ला दूर ठेवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. शिवाय, हृदयाशी संबंधित समस्यांचा कौटुंबिक इतिहास असल्यास, तुम्ही नियमित मास्टर हेल्थ चेकअप करून घ्या.”

वयानुसार हृदयविकाराचे प्रमाण वाढत असल्याने, ४० ते ५० वयोगटातील लोकांनी सावध राहणे महत्त्वाचे आहे. “छातीत दुखणे, धाप लागणे, धडधडणे आणि चक्कर आल्याचा भास होणे किंवा भोवळ येणे यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. मधुमेह, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉल यांसारख्या हृदयाच्या जोखीम घटकांची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. ताण आणि वजनाचे व्यवस्थापन केले पाहिजे. जर तुम्हाला मद्यपान आणि धूम्रपान करण्याची सवय झाली असेल, तर चाळिशीनंतर ताबडतोब सेवन मर्यादित करणे आवश्यक आहे.

हे ही वाचा<< पोटातील गॅस झटक्यात बाहेर काढतील ‘ही’ तीन आसने; नवशिक्यांना सुद्धा सहज मिळू शकतो आराम

डॉ. सईद सांगतात, “संयमाने खाणे आणि एकदाच न खाता दिवसातून सुमारे सहा वेळा थोडे थोडे खाल्ल्यास तुम्हाला तुमची चयापचय क्षमता टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते. तसेच वजन नियंत्रित करण्यासाठी तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग करण्याचा १४:१० नियम पाळू शकता. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, जर तुम्ही नियमितपणे व्यायाम करत नसाल किंवा तुम्ही दीर्घकाळ बसून राहिल्यास, तुम्हाला सरळ अचानक व्यायाम करणेच धोकादायक ठरू शकते. असे करण्याऐवजी हळूहळू तुमचे व्यायाम रुटीन सेट करायला हवे.”