ज्या लोकांना दिवसा पटकन ऊर्जा हवी असते किंवा दिवसभरात विश्रांतीसाठी थोडा वेळ हवा असतो अशा व्यक्तींमध्ये दिवसा डुलकी घेणे ही एक लोकप्रिय प्रथा झाली आहे. झोप पंधरा मिनिटांची असो किंवा मोठी असो, हे आवर्जून घेतेलेले हे ब्रेक मनाला ताजेतवाने, सतर्क ठेवतात आणि शरीरातील ऊर्जेचं उत्पादन वाढवण्यास मदत करू शकतात. पण, तुम्हाला माहीत आहे का, दिवसा थोडा वेळ झोपण्यासाठी नियमितपणे वेळ काढणे तुमच्या मेंदूसाठी चांगले असते आणि ते मेंदूला जास्त काळ कार्यरत ठेवण्यास मदत करते?

दिवसा ३० मिनिटांची झोप घेतल्यामुळे मेंदूचे आरोग्य सुधारते

‘युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन’ ( आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ द रिपब्लिक इन उरुग्वे’ येथील संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. संशोधनात आढळले की, दिवसा ३० मिनिटांची झोप घेतल्यामुळे मेंदूचे आरोग्य सुधारते आणि स्मृतिभ्रंश होण्याचा धोका कमी होतो. जर्नल स्लिप हेल्थमध्ये प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासानुसार, ‘संशोधनात ४० ते ६९ वयोगटांतील सुमारे चार लाख ब्रिटिश व्यक्तींकडून मिळालेली माहिती एकत्रित केली आहे.’

Chia Seeds Benefits Can Eating Chia Seeds Every Morning Help With Fat Loss? Here's The Truth
रोज सकाळी उपाशीपोटी चिया सीड्सचं पाणी प्यायलं तर शरीरावर काय परिणाम होतील? वजन कमी करत असाल तर हे वाचाच
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
deepseek safe use
अमेरिकन कंपन्यांची झोप उडवणारे ‘डीपसीक एआय’ वापरणे सुरक्षित आहे? जाणून घ्या चीनच्या चॅटबॉटविषयी महत्त्वपूर्ण गोष्टी
Car bike accident bike hit the car brutal accident video viral on social media
“अरे, झोपला होता काय?”, भरवेगात आला अन् जोरात कारवर आदळला, अपघाताचा थरारक VIDEO व्हायरल
what happens when you keep a pillow between your legs while sleeping
तुम्ही देखील झोपताना पायामध्ये उशी ठेवता का? ‘ही’ झोपण्याची योग्य पद्धत आहे का? तज्ज्ञांनी केला खुलासा…
Brain Fog symptoms 4 Expert-Approved Foods To Sharpen Your Mind And Reduce Brain Fog
तुम्हालाही छोट्या-छोट्या गोष्टी विसरण्याची सवय आहे? वेळीच सावध व्हा, ‘या’ आजाराचं असू शकतं लक्षण
waking up at 4 am offers numerous benefits
पहाटे ४ वाजता उठल्यावर शरीराला होतात ‘हे’ फायदे; गोविंदाची पत्नी Sunita Ahuja फॉलो करते ‘हा’ फिटनेस फंडा? पण, ‘या’ चुका टाळा
How to Increase Deep Sleep
रात्री निवांत झोप येण्यासाठी काय करावे? ‘हे’ उपाय दूर करतील तुमचा निद्रानाश

त्यात असे आढळून आले की, नियमित झोप घेतल्याने मेंदूचे आकुंचन कमी होऊ शकते आणि वृद्धत्वाची प्रक्रिया सात वर्षांनी पुढे ढकलली जाऊ शकते. पुढे, संशोधकांनी हे देखील शोधून काढले की, सवयीनुसार डुलकी घेणाऱ्यांमध्ये आणि डुलकी न घेणाऱ्यांमध्ये मेंदूच्या आकारमानात किंवा अवयवांच्या आकारात सरासरी २.६ ते ६.५ वर्षे वयोमानाचा फरक जाणवला आहे.

“आमचे निष्कर्ष असे सूचित करतात की, ‘काही लोकांसाठी, दिवसा छोटीशी झोप घेणे हे एका रहस्याचा भाग असू शकते, जे आपण वृद्ध होत असताना मेंदूचे आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करू शकते.” असे ‘एमआरसी युनिट फॉर लाइफलाँग हेल्थ ॲण्ड एजिंग’ येथील ज्येष्ठ लेखिका डॉ. व्हिक्टोरिया गारफिल्ड यांनी यूएलसीला सांगितले.

हेही वाचा – झोप पूर्ण न झाल्यास तुम्हाला व्हर्टिगोचा त्रास होऊ शकतो का? काय सांगते संशोधन, वाचा 

दिवसा डुलकी घेणे आणि मेंदूचे आरोग्य यांच्यातील संबंध जाणून घ्या

दिवसा डुलकी घेणे आणि मेंदूचे आरोग्य यांच्यातील संबंधांबाबत सांगताना मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्सचे सल्लागार इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजिस्ट, डॉ. पवन पै म्हणाले की, नियमित डुलकी घेतल्याने मेंदूच्या आकारमानात वाढ होण्यास मदत करू शकते, जे स्मृतिभ्रंश किंवा अल्झायमरचा धोका कमी होण्याशी संबंधित आहे. वृद्धत्वादरम्यान मेंदू ज्या गतीने आकुंचित होतो ते देखील ते कमी करते.

“अशा प्रकारे, एखादी व्यक्ती त्याच्या/तिच्या संज्ञानात्मक कार्यामध्ये (Cognitive function) म्हणजेच स्मृती, सतर्कता, भाषा, निर्णय घेणे आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेमध्ये सुधारणा करण्यास आणि स्मृती अबाधित (memory intact) ठेवण्यास सक्षम असेल. नियमित दुपारची डुलकी घेणे हे चांगल्या मानसिक चपळतेशी (mental agility) संबंधित असू शकते. एखादी व्यक्ती त्याच्या/तिच्या सर्जनशील विचारसरणीला (creative thinking) वाढवण्यास देखील सक्षम असेल. दुपारच्या झोपेमुळे वयासंबंधित न्यूरोइन्फ्लेमेशन कमी होण्यास मदत होऊ शकते,” असे त्यांनी सांगितले.

तज्ज्ञांनी पुढे सांगितले की, दिवसा घेतलेल्या झोपेमुळे ऊर्जा वाढण्यास, लक्ष सुधारण्यास आणि सतर्कता आणि मानसिक स्पष्टता वाढविण्यात मदत होते. “ या विषयावरील सर्व गैरसमज दूर करण्यासाठी डॉक्टरांशी बोलणे चांगले आहे. तुम्ही किती मिनिटे झोप घेऊ शकता आणि केव्हा घेऊ शकता यांसारखे प्रश्न डॉक्टरांना विचारा. दुपारी लवकर झोप घेणे आणि एका तासासाठी नाही तर किमान सात ते दहा मिनिटे छोटी डुलकी घेणे चांगले आहे असे मानतात. जास्त वेळ झोपणे हे एखाद्याच्या दैनंदिन झोपेमध्ये व्यत्यय आणू शकते.”

हेही वाचा – दिवसाची सुरुवात Detox Drink घेऊन करावी का? काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या

दिवसा केव्हा आणि किती वेळ घ्या झोप?

हैदराबाद यांनी यशोदा हॉस्पिटल्स, सल्लागार इंटरव्हेन्शनल पल्मोनोलॉजिस्ट, डॉ. वामसी कृष्णा मुटनुरी यांनी सांगितले की, पंधरा मिनिटांपेक्षा कमी काळ टिकणाऱ्या डुलकीला brief naps म्हणतात आणि ३० मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकणाऱ्या डुलकीला long naps म्हणतात. “ long naps सतर्कता त्वरित वाढवते आणि चांगली संज्ञानात्मक क्षमता (cognitive ability ) देते परंतु हा प्रभाव एका तासापेक्षा कमी काळ टिकतो. long naps काही तासांसाठी संज्ञानात्मक क्षमता (cognitive ability ), स्मरणशक्ती आणि सतर्कता सुधारते. ९० मिनिटांपेक्षा जास्त वेळ झोपणे सहसा चांगले नसते आणि फक्त आळशीपणा जाणवतो. या डुलकींचा सहसा brief आणि long nap सारखा फायदा नसतो. दुपारच्या सुरुवातीला डुलकी घेतल्यास ते सर्वोत्तम ठरते,” असे तज्ज्ञ सांगतात.

पण, सर्व व्यक्तींच्या बाबतीत असे होऊ शकत नाही, असे डॉ. मुतनुरी यांनी अधोरेखित केले आहे. “हे एखाद्या व्यक्तीच्या झोपेच्या सामान्य पद्धती आणि दैनंदिन बदलांवर अवलंबून असते. खूप मोठी झोप घेणे रात्रीच्या झोपेत व्यत्यय आणते आणि दुसर्‍या दिवशी आरोग्यावर नको असलेले परिणाम दिसून करतात.

Story img Loader