Indian spices: भारतातील अनेक पदार्थांमध्ये हिंग आणि जिऱ्याचा तडका दिला जातो, ज्यामुळे या पदार्थांना खास चव येते. आपल्या नियमित आहारातील डाळीला तडका देण्यासाठी अगदी पूर्वीच्या काळापासून जिऱ्याचा आणि हिंगाचा वापर केला जातो. परंतु, हिंग आणि जिरा हे आरोग्यासाठी लोकप्रिय पर्याय आहेत का? इंडियन एक्स्प्रेस डॉट.कॉमने आरोग्य तज्ज्ञांशी बोलून याबाबत माहिती जाणून घेतली.

आयुर्वेद काय म्हणतो?

आयुर्वेदाच्या पारंपरिक औषध पद्धतीनुसार, जिरे आणि हिंगाचे असंख्य फायदे आहेत आणि ते व्यक्तीच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत.

painkillers, addiction, Pune, Young woman arrested,
पुणे : वेदनाशामक औषधांचा नशेसाठी वापर, तरुणी अटकेत; औषधांच्या १६० बाटल्या जप्त
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Needle Free Shock Syringes for painless medical treatments
वेदनाविरहित वैद्यकीय उपचारासाठी सुई विरहित शॉक सिरिंज; आयआयटी मुंबईचे संशोधन
Government Nursing Training School , Bhandara ,
भंडारा : गुण वाढवण्यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थिनींकडे केली शरीरसुखाची मागणी
50 percent vacancies in FDA, FDA, drug licensing,
‘एफडीए’मध्ये ५० टक्के पदे रिक्त, औषध परवाना व औषध तपासणीवर परिणाम
Alcohol Addiction and Treatment in marathi
अभिनेत्री पूजा भट्टप्रमाणे तुम्हालाही दारूचं व्यसन सोडवायचंय? डॉक्टरांचे ‘हे’ उपाय करून पाहा, पुन्हा दारूकडे ढुंकूनही बघणार नाही
Mumbai municipal corporation land auction
पालिकेचे भूखंड विकासकांना नकोसे, प्रतिसाद न मिळाल्यामुळे पुनर्निविदा काढण्याची पालिकेवर नामुष्की, मलबार हिलचा भूखंड वगळणार
How Cold Weather Impacts Men's Sexual Health
हिवाळ्यात पुरुषाच्या लैंगिक आरोग्यावर कसा परिणाम होतो? तज्ज्ञांनी सांगितले, कशी घ्यावी काळजी?

वीरूट्सचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, डॉ. बिजू केएस यांनी सांगितले की, “जिरे हा शब्द स्वतः जीरनामवरून आला आहे, ज्याचा अर्थ पचन आहे आणि अशा प्रकारे जिरे आतड्याच्या आरोग्यास चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते. तसेच मूळचे अफगाणिस्तानातून भारतात आलेले हिंग हे आतड्याच्या आरोग्याला चालना देण्यासाठी अधिक प्रसिद्ध आहे.”

त्यांनी सांगितले की, दोन्ही मसाले त्यांच्या मधुमेहविरोधी, वजन कमी करणारे, अँटी-वॉर्म आणि मायक्रोबायोमवर्धक प्रभावांसाठी प्रसिद्ध आहेत.

विज्ञान काय सांगते?

हैदराबाद येथील केअर हॉस्पिटल्स, बंजारा हिल्स येथील क्लिनिकल डायटीशियन सुषमा यांच्या मते, दोन्ही मसाले तडका म्हणून घातल्यावर त्यांची चव वाढवण्याच्या गुणधर्मांसाठी पारंगत आहेत. हिंगाचा वापर अनेकदा लसूण आणि कांद्याच्या चवीला वाढवण्यासाठी केला जातो, ज्यामुळे ते शाकाहारी पदार्थांमध्ये एक मसालेदार चव आणतात.”

सुषमा म्हणाल्या की, हिंग पोट फुगणे, गॅस आणि इतर पचन समस्या कमी करण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जाते. हे पाचक एन्झाइमचे उत्पादन उत्तेजित करण्यास मदत करते आणि शरीरातील जळजळ कमी करते.

“दमा आणि ब्राँकायटिस यांसारख्या श्वासोच्छ्वासाच्या आजारांपासून आराम देण्यासाठी पारंपरिक औषधांमध्ये हिंगाचा वापर केला जातो. काही अभ्यासांनी असे सुचवले आहे की, जिरे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकतात, ज्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी ते फायदेशीर ठरते,” असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा: कढीपत्त्याच्या बियांचे सेवन मधुमेहींसाठी फायदेशीर आहे? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या…

त्यांच्या मते, जिरे पाचक एन्झाइम्सचा स्राव उत्तेजित करते, जे चांगले पचन आणि पोषक तत्वांचे शोषण करण्यास मदत करते. तसेच पोट फुगणे आणि गॅसपासून मुक्त होण्यास मदत होते.

त्या असे म्हणाल्या, “जिरे बियाणे अँटिऑक्सिडंट्सने भरलेले असतात, जे शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करतात. या बियांमध्ये लोह आणि इतर पोषक घटकदेखील असतात, जे निरोगी रोगप्रतिकारक शक्ती राखण्यासाठी आवश्यक असतात.”

Story img Loader