त्वचा हा शरीराचा सगळ्यात मोठा अवयव आहे. स्पर्श, वेदना, तापमान यांच्या संवेदना निर्माण करणारा हा अवयव. तसेच मनातल्या भावनांचे प्रकटीकरण करणाराही हाच अवयव. आपले वाक्प्रचार आपल्याला हेच सांगतात. लाजून कोणाच्या गालावर लाली चढते आणि कोणी रागाने लालबुंद होतं, भीतीने घाम फुटतो आणि अंगावर काटा उभा राहतो!

गर्भाची वाढ होताना सर्वात बाहेरच्या थरापासून त्वचा आणि मेंदू असे दोन महत्त्वाचे अवयव निर्माण होतात आणि म्हणून दोन्हींवर सारख्याच अंतर्द्रव्यांचा आणि रसायनांचा परिणाम होतो. अर्भकावस्थेत आईच्या स्पर्शातली माया बाळाला समजते आणि पुढे जाऊन त्याच्या मनात स्वतःबद्दल चांगली प्रतिमा तयार व्हायला मदत होते. शरीर आणि मन यांच्यातील दुवा व्यक्त करणारा त्वचा हा महत्त्वाचा अवयव ठरतो. साधारण ३०% त्वचारोगांच्या रुग्णांमध्ये मानसिक विकारांचे किंवा समस्यांचे प्रमाण आढळते. त्वचेचे विकार सुरू होण्यात, त्यांची लक्षणे वाढण्यात, लवकर नियंत्रणात न येण्यास मानसिक घटक कारणीभूत असतात, तसेच त्वचेच्या रोगांमध्ये निर्माण होणारी विद्रूपता, लक्षणांची तीव्रता यांचा मनावर खोलवर परिणाम होतो.

hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
Fear, man behaviour, courage,
‘भय’भूती : …तर भयमुक्ती होईल
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कुणासमोरही झुकत नाही; प्रचंड स्वाभिमानी असतात, जाणून घ्या स्वभाव
Loksatta kutuhal Fear of misuse of artificial intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गैरवापराची भीती

सुशील १२ वर्षांचा मुलगा. अगदी लहानपणापासून त्याला एक त्वचारोग होता- atopic dermatitis. शरीर कधी फुलून यायचे, खाज सुटायची, लालेलाल व्हायचे, सहन व्हायचे नाही. कोणताही स्पर्श नको वाटायचा. आईलासुद्धा त्याला स्पर्श करताना विचार करायला लागायचा. कपडे कोणते घ्यायचे, कोणता पोत त्याला सहन होईल याचा विचार करावा लागायचा. हवामान कसे आहे, ऊन किती आहे, घाम किती येतो आहे याच्याकडे लक्ष ठेवावे लागायचे. जेव्हा आजाराची तीव्रता कमी असे, तेव्हा पूर्ण बाह्यांचे कपडे घालून घराबाहेर जाणे, इतर मुलांशी खेळणे शक्य होई; नाहीतर घरातच थांबावे लागे. इतर मुलेही त्याला आपल्यात सामील करून घ्यायला नाखूष असत. त्यामुळे तो ही एकलकोंडा झाला होता.

हेही वाचा… स्मृतीभ्रंश झालेल्या रुगांची काळजी घेणाऱ्यांनी कशी घ्यावी स्वत:ची काळजी? जाणून घ्या सोप्या टिप्स

केवळ एक मित्र होता त्याचा. शाळेत जे घडे ते वेगळेच. त्याच्या शेजारी बाकावर बसायला कोणी तयार नसे. काही दांडगट मुले त्याला चिडवत, नावे ठेवत; वाळीत टाकल्याप्रमाणे करत. तब्येत बिघडली की त्याची शाळाही बुडे. पण सुशील आभासात हुशार होता. परीक्षेचे त्याला टेन्शन येई. घरातही वातावरण बिघडले की त्याला फार त्रास होई. कोणताही ताण वाढला की त्याचा त्रास वाढे. घरात भांडण झाले की त्याला रडू यायला लागे, रात्री झोप यायची नाही. शाळेत खूप चिडवले की शाळेत जायची इच्छाच व्हायची नाही. असा सुशीलचा त्याच्या त्वचारोगाशी लहानपणापासून लढा सुरू होता.

हवामान बदलले, हवेतले प्रदूषण वाढले, ऑफिसमध्ये संघर्ष झाला की तिचा एक्झिमा वाढे. संपूर्ण अंगभर खाज सुरू होई. रात्र रात्र झोप येत नसे. वर्षानुवर्षे हा त्रास सहन करून ती पार कंटाळली होती. आताशा मनात फार निराशा येई. कोणी काही म्हटले तर पटकन रडू येई. अनेक छोट्या छोट्या गोष्टींची चिंता वाटे. मुलीचे लग्न, नवऱ्याचे आजारपण, जवळ आलेली रिटायरमेंट अशा अनेक गोष्टी मनाला पोखरत आणि तसाच एक्झिमाही वाढे.

हेही वाचा… वजन कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या केटो डाएटमुळे किडनी स्टोन होऊ शकतो? वाचा काय सांगतात तज्ज्ञ…

त्वचेचे विकार आणि मानसिक स्थिती यांच्यातल्या संबंधावर परिणाम करणाऱ्या अनेक गोष्टी असतात. काही वेळेला सोरायसिससारखे त्वचारोग अनुवांशिक असतात. मानसिक ताण तणावाचा परिणाम म्हणून शरीराच्या प्रतिकार प्रणालीमध्ये संरक्षक (immunoprotectve) असे बदल घडतात. अचानक आलेल्या परिस्थितीला(acute stress) तोंड देताना असे बदल उपयोगी पडतात. अनेक अंतर्द्रव्ये आणि रसायने या कमी उपयोगी पडतात. जेव्हा ताण हा बराच काळ राहतो,(chronic stress), तेव्हा प्रतिकार प्रणालीमध्ये होणारे बदल हे विघातक ठरतात.(immunoathological). बराच काळ राहणारा ताण त्यामुळे त्वचारोग वाढवतो.

शरीर आणि मनामध्ये लवचिकता असते. पोषण, पुरेशी झोप, अनुवांशिकता, बाह्य वातावरणातील घटक यावर ती अवलंबून असते. मानसिक लवचिकता ही सकारात्मक दृष्टीकोन, कठीण परिस्थितीला योग्य पद्धतीने सामोरे जाण्याची क्षमता, उपलब्ध भावनिक आधार अशा गुणधर्मांवर अवलंबून असते. ही लवचिकता कमी पडली की त्वचेच्या आजारांचा मनावर खोलवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्वचाविकारांमुळे स्वप्रतिमेला धक्का बसतो. स्वतःची अतिशय नकारात्मक प्रतिमा मनात तयार होते. त्यामुळे समाजात वावरताना आत्मविश्वास राहत नाही, नातेसंबंधांवर परिणाम होतो. आपल्याला लोक स्वीकारणार नाहीताशी भीती वाटते, स्वतःविषयी लाज वाटते,’ माझ्या सोरायसिसमुळे माझी सगळीकडे नाचक्की होते.’ ‘शक्यतो कोणाला मी सांगत नाही की मला त्वचारोग आहे.’ अनेकांना डिप्रेशन, चिंतेचा विकार होतो.

हेही वाचा… Knee Pain: गुडघे ठसठस करताहेत? ठणकाही लागतोय; तज्ज्ञांनी सांगितलेली ‘ही’ योगासने कराच

काही वेळेस त्वचारोग म्हणून सामोरी येणारी लक्षणे ही एखाद्या मानसिक विकाराची लक्षणे असतात. उदा. त्वचेखालून किडे वळवळताहेत, अंगावर मुंग्या धावताहेत असे अवास्तव विश्वास (delusions) मनात तयार होतात. मग पेशंट सतत खाजवत राहतात, नखाने किडे, मुंग्या काढून टाकण्याचा प्रयत्न करतात. त्यांना मनोविकारतज्ज्ञाकडे जावून औषधोपचाराची गरज असते. कधी कधी काहीही त्वचा विकाराचे निदान नसताना खाज येणे, अंगावर पुरळ येणे अशी लक्षणे दिसतात, ज्यांचा मानसिक घटकांशी संबंध असतो. मानसोपचाराचा अशा रुग्णांना काही प्रमाणात उपयोग होतो. त्वचाविकाराकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन, त्याचा स्वीकार, त्याचे मनाशी असलेले नाते ओळखून त्त्वचा विकाराचे योग्य उपाय, मानसिक संतुलनासाठी आवश्यक असे आपल्या विचार- भावनांमध्ये बदल, स्वतःकडे बघण्याच्या दृष्टीकोनात बदल या गोष्टी शरीर आणि मन सुंदर ठेवण्यास मदत करतात.