Blood Pressure: मसालेदार, तिखट पदार्थांचा हृदयाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो याविषयी अनेकांची वेगवेगळी मते आहेत. काहींना विश्वास आहे की, हे पदार्थ खाल्ल्याने हृदयासंबंधित कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. तर काहींना या पदार्थांचे जास्त सेवन करणे हृदयासाठी घातक वाटते.

केअर हॉस्पिटल हायटेक सिटी, हैदराबाद येथील सल्लागार हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विनोद यांच्या मते, मसालेदार, तिखट पदार्थांचे नियमित सेवन आणि हृदयविकाराचा झटका यांचा थेट संबंध नाही. खरं तर, मसालेदार पदार्थांचे मध्यम सेवन, विशेषत: कॅप्सेसिन असलेले अन्न अनेक आरोग्यदायी फायदे देऊ शकते.

Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी वैद्य खडिवालेंनी सांगितलेलं सोपे पथ्य
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
A glass of milk a day could help keep bowel cancer away
Milk: रोज एक ग्लास दूध प्यायल्याने आतड्यांच्या कर्करोगाचा धोका कमी होतो का? वाचा काय सांगतात डॉक्टर
Amla kadha benefits
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आवळ्याचा काढा खरंच फायदेशीर आहे का?
Health benefits associated with boiled food
Gurmeet Choudhary: दीड वर्ष साखर, चपाती, भात अन् भाकरी खाल्लीच नाही तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? वाचा तज्ज्ञांचे मत…
What happens to your body if you eat raw onions every day
तुम्ही रोज कच्चा कांदा खाल्ला तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…
gul poli
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!” संक्रातीनिमित्त झटपट बनवा खमंग खुसखुशीत तिळाची पोळी! ही घ्या रेसिपी
Dark chocolate benefits and side effects In marathi
Dark Chocolate: रोज डार्क चॉकलेट खाल्ल्याने शरीरावर कसा परिणाम होतो? हृदयविकार, लठ्ठपणासाठी ठरतोय कारणीभूत; वाचा, डॉक्टर काय सांगतात…

मसालेदार अन्नाचे फायदे

  • दाहकविरोधी आणि अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म

मिरचीच्या उष्णतेसाठी जबाबदार असलेल्या कॅप्सेसिन या संयुगात शक्तिशाली दाहकविरोधी आणि अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत. हे गुणधर्म जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करू शकतात, जे दोन्ही हृदयरोगाशी संबंधित आहेत.

  • सुधारित चयापचय

Capsaicin चयापचय वाढवू शकते, जे वजन व्यवस्थापनात मदत करू शकते आणि हृदयरोगाचा धोका कमी करू शकते.

  • रक्तदाब कमी करणे

काही अभ्यासामध्ये असे सुचवले आहे की, कॅप्सेसिन रक्तदाब कमी करण्यास मदत करू शकते, हृदयावरील ताण कमी करते.

खबरदारी काय घ्यावी?

मसालेदार अन्न खाण्याचे अनेक फायदे आहेत; परंतु ते कमी प्रमाणात सेवन करणे महत्त्वाचे आहे. जास्त प्रमाणात मसालेदार पदार्थांच्या सेवनामुळे पचनाशी संबंधित समस्या आणि अस्वस्थता निर्माण होऊ शकते, ज्याचा अप्रत्यक्षपणे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

ज्या व्यक्तींना आधीपासून हृदयाशी संबंधित समस्या आहे किंवा ज्यांची पचनसंस्था कमकुवत आहे अशा व्यक्तींनी मसाल्यांचे सेवन जास्त प्रमाणात करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

हेही वाचा: कंबरदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी डँडेलियन चहा खरंच फायदेशीर आहे का? वाचा, तज्ज्ञांचे मत…

जर तुम्हाला मसालेदार, तिखट पदार्थ खायला आवडत असेल, तर ते पदार्थ तुमच्या आहारात सुरक्षितपणे समाविष्ट करण्यासाठी डॉ. विनोद यांनी सांगितलेल्या काही टिप्स खालीलप्रमाणे

  • तुमच्या आहारात मसालेदार पदार्थांचा हळूहळू समावेश करा; जेणेकरून तुमचे शरीर समायोजित होईल.
  • शिमला मिरची, केळी मिरची यांसारखे मसाले निवडा, जे जास्त उष्णता न देता चव देतात.
  • दाहकविरोधी मसाल्यांचा वापर करा. जळजळ कमी करण्यासाठी तुमच्या स्वयंपाकात हळद, आले व लसूण यांसारखे गरम मसाल्यांचा वापर करा.
  • पचनसंस्थेला शांत करण्यासाठी आहारात मसालेदार पदार्थांसोबत दही, अॅव्होकॅडो किंवा काकडीसारख्या थंड पदार्थांचा समावेश करा.
  • भरपूर पाणी प्यायल्याने पचनातील कोणतीही अस्वस्थता दूर होण्यास मदत होते.
  • या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, तुम्ही तुमच्या हृदयाच्या आरोग्याला प्राधान्य देताना मसालेदार अन्नाचा आस्वाद घेऊ शकता.

Story img Loader