आरोग्य जगतात सुपरफूड खूप लोकप्रिय आहेत. ती जीवनसत्त्वे, खनिजे व अँटिऑक्सिडंट्ससारख्या चांगल्या घटकांनी समृद्ध आहेत. सुपरफूड खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य आणि त्वचेच्या समस्यांसारख्या अनेक आरोग्य समस्यांमध्ये मदत होऊ शकते. सुपरफुड्समुळे तुमच्या दिवसभराच्या जेवणाचे नियोजन न करता, तुम्हाला आवश्यक असलेली सर्व पोषक घटक मिळवणेदेखील सोपे होते. ही बाब कोणतीही कमतरता त्वरित भरून काढण्यासारखी आहे.

हे पदार्थ नक्कीच निरोगी आहाराचा भाग असू शकतात; परंतु ते खाल्ल्याने आपोआपच तुमच्या आरोग्यामध्ये परिवर्तन होईल ही कल्पना एक मिथक आहे.

सुपरफूड्स खरोखरच सुपरफूड आहेत का?

निरोगी आरोग्य केवळ एकाच प्रकारचे अन्न सेवन करण्याने मिळू शकणार नाही; मग ते कितीही पौष्टिक का असेना. तर, संतुलित व वैविध्यपूर्ण आहार, नियमित शारीरिक हालचाली, पुरेशी झोप आणि इतर जीवनशैली सांभाळणारे घटक जसे की तणाव व्यवस्थापन यांमुळे निरोगी आरोग्य लाभते. पौष्टिकतेच्या किंवा आरोग्याच्या इतर सामान्य पैलूंकडे दुर्लक्ष करून, फक्त सुपरफूड खाल्ल्याने तुमच्या आरोग्यात चमत्कारिक बदल होणार नाहीत.

हेही वाचा –हिवाळ्यामुळे तुम्हाला सर्दी होण्याची अधिक शक्यता का असते? तज्ज्ञांनी केला खुलासा….

तुमच्या आहाराचे नियोजन कसे करावे

आपल्या शरीराला चांगल्या प्रकारे कार्य करण्यासाठी विविध पोषक घटकांची आवश्यकता असते आणि कोणत्याही एकाच प्रकारचे अन्न असे सर्व पोषक घटक पुरवू शकत नाही. सुपरफूड्स विशिष्ट पोषक घटक उच्च प्रमाणात देऊ शकतात. जसे की अँटिऑक्सिडंट्स, ओमेगा -3 फॅटी अॅसिडस् किंवा फायबर. परंतु, त्यांना विविध आणि संतुलित खाण्याच्या योजनेत समाविष्ट करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ- ब्ल्यूबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात; ज्यामुळे दाहकता कमी होण्यास मदत होऊन, पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते. परंतु, ब्ल्यूबेरी शरीराच्या कार्यांसाठी आवश्यक असलेली प्रथिने, निरोगी चरबी आणि जीवनसत्त्वे यांसारख्या इतर महत्त्वाच्या पोषक घटकांची जागा घेऊ शकत नाहीत. म्हणूनच फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, लीन प्रोटीन व निरोगी चरबी यांसह विविध अन्नपदार्थांचा आहारात समावेश करावा, असा आग्रह केला जातो.

त्याचप्रमाणे पालकासारख्या पालेभाज्यांचा समावेश केल्याने तुमच्या शरीरात ए, सी व के या जीवनसत्त्वांची भर पडण्यास मदत होते. तर, नट्स् आणि बिया हृदयासाठी निरोगी चरबी आणि प्रथिने देतात. “सुपरफूड्स उत्तम आहेत; परंतु तुमचे शरीर नियमित व्यायाम आणि चांगल्या झोपेच्या सवयींसाठी त्यांचा वापर करण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेता तेव्हा शरीराला त्या सुपरफूड्सचे फायदे अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकतात.”

हेही वाचा –फक्त पेरु नव्हे तर पेरुची पाने देखील आहेत गुणकारी! रोज पेरुची पाने चघळण्याची सहा कारणे

सुपरफूडबाबतचे आणखी एक मिथक असे आहे, ‘सुफरफूडचे सेवन केल्याने औषध घेण्याची आवश्यकता भासणार नाही.’ हळद आणि आले यांसारख्या काही सुपरफूड्समध्ये दाहकविरोधी गुणधर्म असतात आणि ते रोगप्रतिकार शक्तीला समर्थन देऊ शकतात; परंतु ते वैद्यकीय उपचाराला पर्याय ठरू शकत नाहीत. मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे रोग यांचा दीर्घकालीन त्रास असलेल्यांना योग्य वैद्यकीय सल्ल्याशिवाय केवळ सुपरफूडवर अवलंबून राहू नये, असा सल्ला दिला जातो. पोषण हे वैद्यकीय उपचारांना पूरक ठरू शकते; पण औषधांऐवजी त्यांचा पर्याय म्हणून वापर करता येऊ शकत नाही.

तिसरा समज असा आहे, ‘सुपरफूड हे महाग असून, ते सहजपणे उपलब्ध होत नाहीत आणि त्यामुळे अनेक लोक आपल्या आहारात त्यांचा समावेश करीत नाहीत. पण, पालक, गाजर व सफरचंद यांसारखी स्थानिक फळे आणि भाज्यादेखील त्यांच्यातील उच्च पोषक घटकांमुळे परवडणारे सुपरफूड मानले जातात. मार्केटिंग लेबलांद्वारे ते कसे पॅकेज केले जाते यापेक्षा त्यात पोषण घटक किती आहेत हे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे.

(डॉ. गुप्ता इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्स, नवी दिल्ली येथे अंतर्गत औषध विशेषज्ज्ञ आहेत)

Story img Loader