आजकाल सोशल मीडियावर आहारामध्ये काय खावे किंवा काय खाऊ नये याबाबत सल्ला देणारे अनेक व्हिडीओ आपण पाहतो. आहारााविषयी दिले जाणारे हे सल्ले कोणताही वैज्ञानिक पुरावा किंवा पौष्टिक गुणवत्ता यांच्यावर आधारित नसतात. म्हणूनच सध्या ‘नाईटशेड व्हेजिटेबल्स’च्या सेवनाबाबत दिल्या जाणाऱ्या सल्ल्यांबाबत तज्ज्ञांकडून सावधगिरीचा इशारा दिला जातो. नाईडशेड व्हेजिटेबल्स म्हणजे अशा वनस्पती ज्यामध्ये अल्कलॉइड्स असतात. उदाहरणार्थ, बटाटा, वांगे, टोमॅटो, शिमला मिरची व मिरची. या भाज्यांशिवाय आपला आहार पूर्ण होऊ शकत नाही. या भाज्यांशिवाय आपला आहार पूर्ण होऊ शकत नाही. पण, काही सेलिब्रिटीज आणि इन्फ्लुएन्सर्स अशा भाज्यांचे सेवन हळूहळू कमी करून नंतर आहारातून पूर्णपणे काढून टाकण्याचा सल्ला देतात. कारण- या भाज्यांमध्ये असेलल्या विषारी घटकांमुळे काही लोकांना ते पचत नाहीत; पण सत्य अगदी उलट आहे. खरं तर या भाज्यांच्या सेवनामुळे आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होतात हे सिद्ध करणारे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. त्याचबरोबर या भाज्यांमध्ये दोन महत्त्वाचे अन्नगट आहेत; जे तंतुमय पदार्थ, सूक्ष्म पोषक घटक व चयापचयासाठी (Metabolic Health) महत्त्वपूर्ण आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

”आपल्याला माहीत असलेल्या भाज्यांमधील अल्कलॉइड्स हानिकारक आहेत हे सिद्ध करणारा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. त्याशिवाय या भाज्या तळण्यामुळे बहुतेक अल्कलॉइड्स नष्ट होतात. तेव्हा या भाज्यांच्या पौष्टिक फायद्यांकडे दुर्लक्ष करू नका”, असे मुंबईमधील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाच्या मुख्य आहारतज्ज्ञ भक्ती सामंत यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

बटाटा

नाईटशेड या अशा वनस्पती आहेत की, ज्यामध्ये सोलॅनिन (एक कडू चव असलेले स्टिरॉइडल अल्कलॉइड सॅपोनिन) आहे; जे किटकांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी वनस्पती सेंद्रियपणे (Organically) विकसित होतात. आता काही अल्कलॉइड्सचा शरीरावर सकारात्मक परिणाम होतो; तर इतर काहींचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ- तंबाखूच्या वनस्पतींमध्ये आढळणारी रसायने कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात.

पण, आहारात बटाट्याच्या वापराद्वारे सोलॅनिनचे सर्वाधिक प्रमाणात सेवन केले जाते. बटाट्याच्या रोपाचे खोड आणि पानांमध्ये अल्कलॉइड ग्लायकोसाइड्सचे प्रमाण जास्त असते; तर कंद आणि सालीमध्ये सोलॅनिनची थोडीशी मात्रा असते आणि बटाट्याचा जो भाग आपण खातो, त्यामध्ये सोलॅनिन नसते. फक्त हिरवे बटाटे खाल्ल्याने धोका निर्माण होतो. जेव्हा प्रकाश किंवा योग्य हवामानाच्या संपर्कात कंद‌ येतात, तेव्हा ते हिरवे होतात किंवा त्यांना कोंब येतात. सुरुवातीला बटाट्यावर दिसणारे डाग हे ‘डोळे’ आल्यासारखे दिसतात. या प्रकारचे सोलॅनिन असलेल्या बटाट्यांच्या अतिसेवनाने शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. या दुष्परिणामांची सामान्य लक्षणे म्हणजे _मळमळ होणे, अतिसार होणे, उलट्या होणे, पोटात पेटके येणे, घशात जळजळ होणे, ‘हार्ट अर्थेमिया’ (Heart Arrhythmia), डोकेदुखी व चक्कर येणे.

हेही वाचा – मेटाबॉलिजम कशामुळे प्रभावित होते? डॉक्टरांकडून जाणून घ्या तुम्ही काय केले पाहिजे?

परंतु प्रत्यक्षात सोलॅनिनची विषबाधा होणे फारच दुर्मीळ बाब आहे. कारण- स्वयंपाक करण्यापूर्वी हिरवी साले आणि कोंब काढून टाकले जातात, ही सर्वांत सामान्य आणि सर्वोत्तम पद्धत आहे. याशिवाय स्वयंपाकाच्या प्रक्रियेत तळणे समाविष्ट असते; ज्यामुळे सोलॅनिनची पातळी कमी होते. अगदी सैद्धांतिकदृष्ट्या कच्च्या हिरव्या बटाट्यामध्ये फक्त एक-दशांश डोस असतो; जो मानवासाठी विषारी मानला जाऊ शकतो. अन्नसुरक्षा अभ्यासाचा अहवाल आणि शरीराचे वजन यानुसार, प्रतिकिलो पाच ग्रॅम हिरवा बटाटा दररोज सेवन केल्यास तीव्र स्वरूपाचे आजार होत नाहीत.

मग इतर फायदे लक्षात घेता, तुम्ही बटाटा आहारातून का काढून टाकू इच्छिता? उदाहरणार्थ- बटाट्यामध्ये प्रतिरोधक स्टार्च (Resistant Starch) व तंतुमय पदार्थ असतात; जे मनाला तृप्ती देतात आणि जेवणानंतर शरीरातील शर्करा वाढण्याचा वेग कमी करतात आणि म्हणूनच मधुमेहाच्या नियंत्रणासाठी ते चांगले असतात. त्यामध्ये पोटॅशियम आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते; ज्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते.

हेही वाचा – पहिला हार्ट अटॅक टाळण्यासाठी ॲस्पिरिन वापरता का? डॉक्टरांकडून जाणून घ्या; ते कसे काम करते?

वांगे

वांग्यात सोलॅनिनचे प्रमाण खूपच कमी असते. ते उकळल्याने त्यातील सोलॅनिनचे प्रमाण तीन टक्क्यांपर्यंत कमी होते. मायक्रोवेव्हमध्ये वांगे बनवल्यास त्यातील सोलॅनिनचे प्रमाण १५ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते; पण वांगे तळल्यानंतर त्यातील सोलॅनिन पूर्णपणे नष्ट होऊ शकते. याशिवाय, तुम्हाला वांगे खाण्याचे कोणतेही दुष्परिणाम होतात का हे पाहण्यासाठी एखाद्याला एकाच वेळी अर्धवट शिजवलेल्या वांग्याचे जास्त प्रमाणात सेवन करावे लागेल.

टोमॅटो

इनफ्ल्युएन्सरच्या मतानुसार, टोमॅटिन नावाच्या पदार्थामुळे पचनाच्या समस्या होऊ शकतात. फक्त या दृष्टिकोनाबाबत सांगायचे झाल्यास पिकलेल्या टोमॅटोच्या टोमॅटिनची पातळी अत्यंत कमी असते; जी अजिबात महत्त्वाची नसते. कच्चा टोमॅटो किंवा टोमॅटोच्या पानांमध्ये टोमॅटिनचे प्रमाण जास्त असते आणि तुम्हाला जर खरोखर याचे दुष्परिणाम होतात का हे पाहायचे असेल, तर त्याचे मोठ्या प्रमाणात सेवन करावे लागेल. याशिवाय, अद्याप असा कोणताही अभ्यास झालेला नाही; जो याची पुष्टी करतो की, हिरवे टोमॅटो आणि त्याची पाने खाल्ल्यानेही तुम्ही आजारी पडू शकता. सन २००० मध्ये एका अभ्यासात असे आढळून आले की, प्रयोगशाळेतील ज्या प्राण्यांनी टोमॅटिनचे सेवन केले, ते त्यांच्या शरीरामध्ये शोषले गेले नाही. खरे तर, पचनक्रियेदरम्यान हा अल्कलॉइड एलडीएल कोलेस्टेरॉलला (LDL Cholesterol) एकत्र करतो आणि मलमूत्रातून बाहेर काढतो. लक्षात ठेवा की, टोमॅटो हे अँटिऑक्सिडंट्स, ‘क’ जीवनसत्त्व व पोटॅशियम यांचा मुख्य स्रोत आहेत.

हेही वाचा – पहिला हार्ट अटॅक टाळण्यासाठी ॲस्पिरिन वापरता का? डॉक्टरांकडून जाणून घ्या; ते कसे काम करते?

तेव्हा हे लक्षात घ्या की, ऑनलाइन मिळणारी सर्व माहिती चिमूटभर तिखट-मीठ लावून सांगितली जाते. त्यामुळे टिकटॉक आणि इन्स्टाग्राम आदींवर सांगितली जाणारी प्रत्येक गोष्ट आंधळेपणाने करू नका अथवा त्यावर खात्रीशीर विश्वास ठेवू नका. आहारातील कोणत्याही प्रकारच्या अन्न अथवा पाण्याच्या अतिसेवनामुळे दुष्परिणाम होतात. म्हणून सर्व पदार्थांच्या सेवनाबाबत संयम ठेवणे हा नियम पाळला पाहिजे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Are tomatoes potatoes and eggplants safe for gut health junk online myths snk