Exercise On Weekend: आपले शरीर फिट ठेवण्यासाठी वर्कआउट करणे गरजेचे आहे. जे लोक दिवसभर तासन् तास ऑफिसच्या एका खुर्चीवर बसून काम करतात. त्यांच्यासाठी व्यायाम, वर्कआउट यांची जास्त आवश्यकता असते. नियमित व्यायाम, संतुलित आहार यांच्या मदतीने तुम्ही फिट राहू शकता. परंतु, रोज व्यायाम करून घाम गाळणे जेवढे गरजेचे, तितकेच तुमच्या शरीराला पुरेपूर विश्रांती देणेही गरजेचे आहे. काही लोकांचा असा गैरसमज झालेला असतो की, जेवढे तुम्ही वर्कआउट कराल, तेवढेच तुमचे वजन कमी होईल किंवा मसल्स गेन होतील. मात्र, ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. वर्कआउट तुम्ही तेवढेच करायला हवे, जेवढे तुमच्या शरीराला आवश्यक असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी भरपूर प्रमाणात वर्कआउट करू नका. तुमच्या शरीराला जितके गरजेचे आणि तुम्हाला जितके झेपेल तेवढेच वर्कआउट करा.

अशातच एक प्रश्न तुम्हालाही पडला असेल, आठवड्यातून किती दिवस वर्कआउट करणे हे आपल्या शरीरासाठी योग्य असेल? पाच दिवस वर्कआउट करणे हे प्रभावी ठरेल की आठवड्यातील दोन दिवस? दरम्यान, शास्त्रज्ञांनी सुमारे ९० हजार लोकांचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये आठवड्यातून एक किंवा दोन दिवस व्यायाम करणार्‍या गटातील आणि संपूर्ण आठवडाभर व्यायाम करणार्‍या गटातील लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकच्या जोखमीमध्ये समान घट आढळून आली. इलेक्ट्रोफिजिओलॉजिस्ट शान खुर्शीद यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

police file case for forcing girl to perform obscene act in shelter home
धक्कादायक : लेस्बियन असल्याचे सांगून निरीक्षणगृहात मुलीवर बळजबरी, अधिपरिचारिकेविरुद्ध गुन्हा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Kolkata Rape Case
Kolkata Rape Case : “मुलीच्या वेदना आठवल्या तरी…”, कोलकाता प्रकरणातील पीडितेच्या आईची भावनिक प्रतिक्रिया; म्हणाल्या…
abortion, rape victim, High Court,
गर्भपात करावे की नाही हा सर्वस्वी बलात्कार पीडितेचा अधिकार, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
morality Act to impose restrictions on women by the Taliban government of Afghanistan
संपूर्ण शरीर झाकणारा पोशाख… मोठ्या आवाजात बोलणे नाही, गाणी नाही… महिलांसाठी अफगाण नैतिकता कायद्यातील अजब तरतुदी! 
Loksatta anvyarth Supreme Court bulldozer questions justice system
अन्वयार्थ: ‘बुलडोझर’ला लगाम!
Justice Abhay Oak critical comment that only the court has the power to punish the accused
आरोपीला शिक्षा देण्याचा अधिकार केवळ न्यायालयाचा; न्यायमूर्ती अभय ओक यांचे परखड भाष्य
Loksatta anvyarth Bombay High Court decision Ganesha idol Immersion Ganeshotsav
अन्वयार्थ: राज्य कायद्याचे की अस्मिताकारणाचे?

दोन्ही पद्धती सारख्याच प्रभावी आहेत का?

डॉ. वीरेंद्र सरवाल यांच्या मते, आजकालच्या व्यग्र जीवनशैलीत वीकेंडला व्यायाम करणे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. अतिरिक्त चरबी कमी करणे आणि हृदयासाठी नियमित व्यायाम करणे जास्त फायदेशीर ठरते. शनिवारी व रविवारी म्हणजेच वीकेंडला जे व्यायाम करतात, त्यांनी अतिउत्साही होऊ नये किंवा जास्त व्यायाम करू नये. काही वेळा लोक आठवडाभराचा व्यायाम दोन दिवसांत करण्याचा प्रयत्न करतात; मात्र त्यामुळे हानी होऊ शकते. हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आरोग्यासाठी व्यायामासोबतच आहारही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे आहाराकडेही लक्ष दिले पाहिजे.

जेवणानंतर व्यायाम करु नका

डॉ. सुधीर सक्सेना यांच्या मते, फिटनेस तज्ज्ञ दिवसातून किमान दररोज २० ते २५ मिनिटे व्यायाम करण्याचा सल्ला देतात. दररोज २० ते २५ मिनिटे दोरी उड्या मारल्याने अंदाजे ३०० कॅलरीज बर्न होऊ शकतात आणि आपला स्टॅमिना वाढू शकतो. चालणे, धावणे, सायकल चालवणे व पोहणे हे व्यायाम हृदय निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. तसेच जेवणानंतर लगेच व्यायाम न करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. व्यायामापूर्वी पाच मिनिटे वॉर्म अप करणेही आवश्यक आहे. डॉ सक्सेना म्हणतात की, थंड हवेत, वारा व धुके असताना आणि अतिउष्ण व दमट हवामानात बाहेर जाणे टाळावे आणि घरामध्येच व्यायाम करावा.

डॉ. करुण बहल यांच्या मते, शनिवार व रविवार व्यायाम करणे चुकीचे नसून, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी हा व्यायाम फायदेशीर ठरू शकतो. डॉ. जित राम कश्यप यांच्या मते- व्यायाम न करण्यापेक्षा दोन दिवस तरी व्यायाम करणे फायदेशीर ठरते. हृदय निरोगी ठेवण्यासाठी मध्यम तीव्रतेचा व्यायाम सर्वोत्तम आहे.

एका जागेवर जास्त वेळ बसू नका

वरिष्ठ सल्लागार, डॉ. परविंदर चावला यांच्या मते- एका जागेवर जास्त वेळ बसणे टाळले पाहिजे. आपल्या शरीराची सारखी हालचाल होणे गरजेचे असून, एका जागेवर जास्त वेळ बसल्यामुळे चरबी वाढू शकते.

हेही वाचाव्यायाम करताना ‘स्पोर्ट्स ब्रा’ का वापरावी? जाणून घ्या काय आहेत फायदे

दररोज किंवा आठवड्याच्या शेवटी व्यायाम, दोन्ही पद्धती वापरु शकता

  • तुम्हाला जर रोज व्यायाम करणे शक्य होत नसेल, तर वीकेंडला व्यायाम करू शकता. हा व्यायामही तेवढाच फायदेशीर ठरू शकतो.
  • जेवणानंतर व्यायाम करू नका; जे दुर्दैवाने बहुतेक लोक करतात.
  • जास्त हार्ड व्यायाम करण्यापूर्वी पाच मिनिटे वॉर्म अप करणे अत्यावश्यक आहे.
  • थंड हवेत, वारा व धुके असताना आणि अतिउष्ण व दमट हवामानात बाहेर जाणे टाळावे आणि घरामध्येच व्यायाम करावा.