मुक्ता चैतन्य

टीनजर्सच्या सायबर वर्कशॉपमध्ये ऑनलाईन डेटिंग या विषयावर गप्पा सुरु होत्या. हल्ली ऑनलाईन डेटिंग वयाच्या दहाव्या अकराव्या वर्षीही सुरु होतं. त्या वयात कुणीही मुलं नात्यासंदर्भात गंभीर नसतात. हे डेटिंग बहुतेक वेळा पिअर अ‍ॅक्सेप्टन्ससाठी असतं. म्हणजे आपल्या मित्रमैत्रिणींच्या गटात आपल्याला स्वीकारलं जावं, आपण डेटिंग करत नाही किंवा केलेलं नाही म्हणून कुणी आपल्याला नावं ठेवू नयेत, बुली करु नये यासाठी असतं. साधारण पंधरा वर्षांपर्यंत जे काही ऑनलाईन डेटिंग चालतं त्यात कुणीही सिरिअस नसतं…

Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
success story of utham gowda started his own startup owner of captain fresh company
जास्त पगाराची नोकरी सोडली अन् घेतली ‘ही’ जोखीम, आता आहेत कोटींचे मालक; वाचा उथम गौडा यांचा प्रेरणादायी प्रवास
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
Dev Diwali 2024
देव दिवाळीला गजकेसरी योगामुळे ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब उजळणार! अचानक धनलाभाचा योग, मिळेल पैसाच पैसा
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी

पंधराव्या वर्षानंतर मग मात्र ही पिढी स्वतःच्या डेटिंग जगाकडे निरनिराळ्या पद्धतीने पाहायला सुरुवात करते. खरंतर हे सगळं पूर्वीच्या पिढ्यांमध्येही होतच होतं. बॉय फ्रेण्ड/ गर्ल फ्रेण्ड फक्त कुणी बावळट म्हणू नये म्हणून हवे हा प्रकार पूर्वीही होताच. आता चोवीस तास बारा महिने हातात फोन, त्यात इंटरनेट असल्यामुळे या गोष्टी फार लहान वयात सुरु झाल्या आहेत. आणि म्हणूनच या पिढीशी डेटिंग, नातेसंबंध, त्यातला स्वीकार, परवानगी या गोष्टी बोलण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा… Health Special: पावसाळ्यातील थंडीत हिवाळ्याप्रमाणे भूक का लागत नाही?

तर, टीनएजर वर्कशॉपमध्ये डेटिंग असा विषय सुरू होता. सुरुवातीला आपापसात हसणारी, कुजबुजणारी मुलं हळूहळू बोलती झाली. ऑनलाईन डेटिंग का केलं जातं, त्यातल्या सोयी- गैरसोयी, ऑनलाईन ब्रेकअप्स, डेटिंग अ‍ॅप्स या सगळ्याबद्दल बोलत असताना एक मुलगा म्हणाला, “मी सिच्युएशनशिप मध्ये आहे. आणि तेच मला सध्या तरी बरं वाटतंय.” मी विशीत होते तेव्हा ‘फ्रेण्ड्स विथ बेनिफिट’ असा प्रकार सुरु झालेला होता. म्हणजे नात्याची कमिटमेंट नाही, एकमेकांविषयी ओढ आहे म्हणजे त्याचा शेवट थेट लग्नात झालाच पाहिजे असंही नाही, प्यार एक बार होता है ची भानगड नाही… जोवर नात्यात राहण्याची इच्छा असेल तोवर राहा. नाहीतर बाहेर पडा. हे ‘लिव्ह- इन’ पेक्षाही वेगळं. इथे कुणी कुणाबरोबर एकत्र राहायला सुरुवात करत नसतं. फक्त नात्याची बांधिलकी आणि त्याबरोबर येणारी ओझी नकोत असा एकूण प्रकार होता. सिच्युएशनशिप यापेक्षा वेगळं काही आहे का हे समजून घ्यायचं होतं. मग त्या मुलाला म्हटलं, म्हणजे काय?

तर म्हणाला, “आम्ही फक्त मित्र नाही. मैत्रीपेक्षा अधिक काहीतरी आमच्यात आहे पण आम्हाला इतक्यात कमीट करायचं नाहीये. डेट करायचं नाहीये. आम्ही एकमेकांचे गर्लफ्रेण्ड/ बॉयफ्रेण्ड नाहीयोत.”

एकमेकांना असं कमिट न करण्यामागे काही कारण? – मी विचारलंच.

“आम्ही शिकतो आहोत, स्वतःला शोधतो आहोत, आता पासून डेट करायला सुरुवात केली तर अपेक्षा वाढणार, त्या पूर्ण झाल्या नाहीत तर इमोशनल ड्रामा होणार… ब्रेकअप झालं तर त्याचा त्रास होणार.. हे सगळं आता इतक्या लवकर कशाला हवं? आता आम्हाला आमच्या करिअरवर फोकस करायचं आहे, पण एकमेकांविषयी मैत्रीपेक्षा जास्त काहीतरी वाटतंय. सो, आम्ही सिच्युएशनमध्ये आहोत. फक्त फ्रेण्ड्स नाही पण डेटिंगही नाही, आमच्यात कुठलंही फिजीकल रिलेशन नाही. कुठलीही कमिटमेंट नाही.”

हे असं नातं इथे असणाऱ्या किती मुलामुलींचं आहे? बरेच हात मोकळेपणाने वर आले. मग सिच्युएशनशिपमध्येही असलेले विविध प्रकार मुलामुलींनी सांगितले. सिचुएशनशिप कधी निवडली जाते? दोघं दोन शहरात असतील आणि वरचेवर भेटी शक्य नसतील तेव्हा. आठ दहा वर्षांची मुलं- मुली ज्यांना डेटिंगबद्दल आकर्षण असतं ते ऑनलाईन डेटिंग करतात आणि सिचुएशनशिपमध्ये आहेत असं सगळ्यांना सांगतात. काही यंग ऍडल्टसही सिच्युएशनशिपमध्ये असतात. ज्यांना लग्न नको असतं, कमिटमेंट नको असते, लिव्ह इन पण नको असतं. यांच्यात काहीवेळा शारीरिक संबंध असू शकतात.

हेही वाचा… Health Special: इंजेक्शन न देताही रूट कॅनॉल शक्य!

समलिंगी टीन्स ज्यांनी त्यांचा लैंगिक अग्रक्रम घरात सांगितलेला नसतो किंवा सांगितला असेल तर त्याला घरुन पाठिंबा नसतो. अशावेळी त्यांच्या पसंतीच्या व्यक्तीबरोबर ते ऑनलाईन सिच्युएशनशिपमध्ये असू शकतात. यातला अजून एक ट्रेण्ड असाच समजला, तो म्हणजे, जर दोन व्यक्ती सिच्युएशनशिपमध्ये असतील आणि ते त्यांच्या मित्रमैत्रिणींच्या वर्तुळात माहीत असेल तर त्यांना इतर कुणीही डेटसाठी विचारायचं नसतं, हा अलिखित नियम आहे. पण सिच्युएशनशिपमध्ये असलेले दुसऱ्या व्यक्तीला डेट करु शकतात. त्या दोघांची एकमेकांशी कसलीही बांधिलकी नसल्याने ते इतरांना डेट करु शकतात.

थोडक्यात, जिथे बॉय फ्रेण्ड आणि गर्ल फ्रेण्ड होण्यात, नात्याच्या बंधनात अडकण्याचा कुठलाही प्लान नसतो, मैत्री पलीकडे आकर्षण असतं, पण यालाच प्रेम म्हणायचं का याची खात्री नसते, फार इमोशनल घोळ नको असतो, कुणी कुणाला धोका दिला वगैरेची भानगड नको असते, काहीवेळा फक्त शारीरिक आकर्षण असतं अशा विविध कारणांसाठी टीनजर्स आणि यंग ऍडल्टस सिच्युएशनशिपमध्ये असतात. वयाच्या विशीत असलेल्या काही जणांनी सांगितलं, ज्या वेळी ‘सेटल’ होण्याचा विचार मनात यायला लागतो, म्हणजे लग्नाचा किंवा लिव्ह इनचा; तेव्हा ही सिच्युएशनशिप ते संपवतात.

हेही वाचा… Health Special: दातांवरचा खर्च कमी करण्यासाठी ‘हे’ न विसरता कराच!

प्रत्येकच पिढीमधले तरुण तरुणी त्यांच्या प्रेमाच्या, देहाच्या नातेसंबंधांबद्दल प्रयोग करत असतात. जेन झी ही काही असे प्रयोग करणारी पहिली पिढी नाही. आजची पिढी उथळ आहे असं सरसकट म्हणण्याआधी त्यांच्या जगण्याचा ‘पॅटर्न’ समजून घेतला पाहिजे. सिचुएशनशिपमध्ये असण्याचे फायदे त्यांना माहीत आहेत, पण नात्यामध्ये जपाव्या लागणाऱ्या अनेक नाजूक गोष्टींबद्दल जाणीव करुन देणंही तितकंच महत्वाचं आहे. डेटिंग असो, सिच्युएशनशिप असो नाहीतर अजून काहीही तिथे कमी अधिक प्रमाणात भावनांची गुंतवणूक असतेच. आपली भावनिक ऊर्जा नक्की आपण कशासाठी देणार आहोत याची जाणीव या पिढीला करुन द्यायला हवीये फक्त. बाकी नात्यांशी कसं ‘डील’ करायचं त्याचे मार्ग त्यांचे ते शोधतीलच!