Antibiotics : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात लोकांना स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. अशा वेळी अनेकदा लोक आजारी पडले की त्यावर त्वरित उपचार कसा मिळवता येईल, याचा विचार करतात आणि जवळच्या फार्मासिस्टच्या सल्ल्यानुसार अँटीबायोटिक्स किंवा पेनकिलरची औषधे घेतात, पण ही औषधे घेऊनही ते आजारातून बरे होत नाही.
सर्दी-तापासाठी अँटीबायोटिक्स घेतल्यामुळे किती गंभीर परिणाम होतात, याविषयी दिल्लीतील टॉप मेडिसीन स्पेशालिस्ट डॉ. तरुण साहनी यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली. ते सांगतात, “असे अनेक लोक आमच्या ओपीडीमध्ये येत असल्याचे आम्ही पाहतो. या अँटीबायोटिक्स किंवा पेनकिलर औषधांच्या अतिवापरामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.”

हेही वाचा : Heart Attack : ‘Sticky Cholesterol’मुळे कमी वयात हार्ट अटॅक येतो का ? वाचा तज्ज्ञ काय सांगतात

Sonali Bendre was body shamed due to her long neck, people called her giraffe
“मला जिराफ म्हटलं जायचं”, सोनाली बेंद्रेवर एकेकाळी व्हायची टीका, बॉडिशेमिंगचा आरोग्यावर कसा होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Health Special Unsafe Environment and Mental Health Hldc
Health Special: असुरक्षित वातावरण आणि मानसिक स्वास्थ्य
pune Arogya sena
औषधांच्या किमती नियंत्रणात आणा, आरोग्य व्यवस्था सक्षम करा! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेनेकडून खुला जाहीरनामा
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
Chennai Doctor Attack
Chennai : कॅन्सरग्रस्त महिलेच्या मुलाचा डॉक्टरवर चाकुने हल्ला; मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
Doctor aggressive after being beaten by relatives The pediatric department of VN Desai Hospital was closed by doctors Mumbai news
नातेवाईकांकडून मारहाण झाल्याने डॉक्टर आक्रमक; व्ही. एन. देसाई रुग्णालयातील बालरोग विभाग डॉक्टरांनी ठेवले बंद
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…

डॉ. तरुण साहनी सांगतात, “अनेकजण भविष्यात होणाऱ्या त्रासापासून वाचण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या डोसपेक्षा जास्त अँटीबायोटिक्स डोस घेतात, तर काही लोक ज्या अँटीबायोटिक्समुळे त्यांच्या मित्रांना आराम मिळाला त्याच अँटीबायोटिक्स स्वत:सुद्धा घेतात. पण मित्रांना जी औषधे लागू होतात, ती औषधे तुम्हाला लागू होतीलच असे नाही.”
ते पुढे सांगतात, “नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधे खरेदी करा. जर तुमच्याकडे औषधे शिल्लक असतील तर फार्मासिस्टला परत करा किंवा त्या दान करा. या औषधांचा जबाबदारीपूर्वक वापर करणे गरजेचे आहे.”

अँटीबायोटिक्सचे दुष्परिणाम

अँटीबायोटिक्स या अत्यंत प्रभावशाली औषधी आहेत, ज्या बॅक्टेरिया किंवा कोणत्याही संसर्गातून बरे होण्यास मदत करतात; पण अँटीबायोटिक्सचा गैरवापर आणि अतिवापर चुकीचे आहे. यामुळे अँटीबायोटिक्सची प्रतिकारक्षमता कमी होऊ शकते. अँटीबायोटिक्सच्या अतिवापरामुळे एकदा उपचार करून बरे होणारे आजारसुद्धा बरे होत नाही. अशी स्थिती रुग्णासाठी खूप आव्हानात्मक असू शकते.

सर्वात मोठी चूक असते ती म्हणजे सामान्य सर्दी- खोकला, फ्लूसारख्या व्हायरल इन्फेक्शनसाठी अँटीबायोटिक्स घेणे. त्यामुळे अँटीबायोटिक्स व्हायरसविरुद्ध काम करण्यास अपयशी ठरतात, कारण अँटीबायोटिक्स बॅक्टेरीयाविरुद्ध काम करतात. चुकीच्या पद्धतीने अँटीबायोटिक्सचा वापर केल्यामुळे व्यक्ती आजारातून बरा तर होत नाही, पण याबरोबरच बॅक्टेरीयाविरुद्ध अँटीबायोटिक्सची प्रतिकारशक्ती मंदावते आणि तुमच्या शरीरातील चांगल्या बॅक्टेरीयाच्या कामावरही परिणाम होतो. त्यामुळे योग्य उपचार घेण्यासाठी हेल्थकेअरचा सल्ला घेणे खूप आवश्यक आहे.

हेही वाचा : Weight Loss : वजन कमी करण्यासाठी सब्जा फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात ….

पेनकिलर – तात्पुरता आराम

पेनकिलर हे औषध सामान्यत: वेदना कमी करण्यासाठी वापरले जाते. पण, तुम्ही पेनकिलरचा अति वापर करत असाल तर आताच थांबवा. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स (NSAIDs) जसे की ibuprofen आणि ॲस्पिरीन इत्यादी पेनकिलर म्हणून वापरली जातात, पण यामुळे फक्त तात्पुरता आराम मिळतो.

नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्स NSAID च्या अति वापरामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टवर विपरीत परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे अल्सर, रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो. पेनकिलरचा तुम्ही नियमित वापर करत असाल तर किडनी, हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आजार होण्याचीही शक्यता वाढते.
हेल्थकेअर स्पेशालिस्ट यांच्या मते, पेनकिलर डोस विशिष्ट कालावधीत घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला खूप वेदना होत असतील तर फक्त पेनकिलरवर अवलंबून न राहता मूळ समस्या कोणती आहे, यासाठी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

जबाबदारीने औषधे घ्या

अँटीबायोटिक्सचा वापर हा एक पर्याय आहे. ज्या लोकांना त्वरित डॉक्टरांकडे जाणे शक्य नाही ते अँटीबायोटिक्सचा फायदा घेऊ शकतात. पण, अँटीबायोटिक्समुळे तुम्हाला तात्पुरता आराम मिळतो. दीर्घकाळ आराम मिळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अँटीबायोटिक्स आणि पेनकिलर औषधांचा वापर जबाबदारीने करणे खूप महत्त्वाचे आहे.
पहिली गोष्ट म्हणजे यामुळे अँटीबायोटिक्सची प्रतिकारक्षमता टिकवून ठेवण्यास मदत होते. आवश्यकतेनुसार अँटीबायोटिक्सचा वापर करावा व स्वत:ला आणि भावी पिढीला आरोग्याच्या समस्यांपासून दूर ठेवावे.
दुसरी गोष्ट म्हणजे जबाबदारीने पेनकिलर औषधांचा वापर केल्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम दिसून येत नाही. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे पेनकिलरचा वापर करून व्यक्ती योग्य तो उपचार घेऊ शकतो, पण केवळ पेनकिलरवर अवलंबून न राहता डॉक्टरांशी संपर्क साधणेही तितकेच जास्त गरजेचे आहे.

हेही वाचा : व्हिटॅमिन डीची कमतरता आहे, हे कसे ओळखावे? जाणून घ्या त्याची लक्षणे ….

शेवटी, जबाबदारीने औषधांचा वापर करून दीर्घकाळ चांगले आरोग्य टिकवण्यासाठी चांगले आहे. अँटीबायोटिक्स आणि पेनकिलर औषधांच्या अति आणि अनियंत्रित वापरामुळे तुमच्या आरोग्यावर ताण निर्माण होऊ शकतो आणि तुम्हाला ते महागात पडू शकते. त्यामुळे अनावश्यक औषधोपचार टाळा आणि शरीराच्या गरजांना प्राधान्य देणारे संतुलित आरोग्य जपण्याचा प्रयत्न करा.