Arjun Bijlani’s Wife Neha Swami’s Weight Loss : हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे अर्जुन बिजलानी. अर्जुनच्या नवनवीन प्रोजेक्टविषयी, तसेच त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. नुकताच अर्जुन एका कार्यक्रमात त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलला. यावेळी त्याने त्याची पत्नी नेहा स्वामीने मुलाला जन्म दिल्यानंतर कसे वजन कमी केले, याविषयी सांगितले.

२०१५ मध्ये मुलगा अयानचा जन्म झाल्यानंतर नऊ वर्षांनी अर्जुन नेहाविषयी बोलताना म्हणाला, “नेहानं आता १४ किलो वजन कमी केलं आहे. तिला वाईट वाटू न देता, तिला मी सतत आरोग्याकडे लक्ष दे, असं सांगायचो. मी हार मानली नाही. मला माहीत होतं की, एकदा तिला तिनं केलेल्या मेहनतीचं फळ दिसल्यावर ती ऑटो मोडमध्ये जाईल. मी म्हणालो किंवा नाही म्हणालो तरी ती दररोज सकाळी ८ ते ८.३० वाजता जिमला जाते आणि वर्कआउट करते.”
दर एक दिवसानंतर नेहा किक बॉक्सिंगसुद्धा करते. अर्जुन सांगतो, “मला तिचा खूप अभिमान वाटतो. वजन कमी करायला खूप वेळ लागला असता; पण मी हार मानली नाही आणि तीसुद्धा हार मानणार नाही. कारण- आता हीच तिची जीवनशैली आहे. याला वेळ लागतो; पण जर तुम्ही तुमच्या जोडीदारावर प्रेम करत असाल, तर तुम्ही हार मानत नाही. तिनं जे काही मिळवलं, ते उल्लेखनीय आहे.”

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Wife murders husband with help of lover in dapoli crime news
प्रियकराच्या मदतीनेच पतीला संपवले; रत्नागिरी जिल्हात खळबळ
religious reform in india social transformation in religion hindu religious reform
पातक, प्रायश्चित्त आणि शुद्धीविचार
Walmik Karad wife reaction On Mcoca
“मनोज जरांगे समाजकंटक, त्यानं..”, वाल्मिक कराडच्या पत्नीचा आक्रोश; बजरंग सोनवणे, अंजली दमानियांवर केले आरोप
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Youth Addiction, Young Generation, Nagpur Police ,
तरुणांनो प्रेम करा, पण…
bigg boss marathi season 5 fame Ankita Walawalkar meet yogita Chavan with future husband before wedding
लग्नाआधी अंकिता वालावलकर भेटली योगिता चव्हाणला; फोटो पाहून ‘डीपी दादा’ची प्रतिक्रिया, म्हणाला, “पचणार नाही…”

हेही वाचा : Rakul Preet Singh Diet : सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत; रकुलने सांगितले डाएटचे सीक्रेट, वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….

४२ वर्षीय अर्जुन बिजलानी हा भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या कार्यक्रमात आला होता. अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर अर्जुन आणि नेहाने २०१३ मध्ये लग्न केले.

फिटनेस आणि आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी जोडीदाराची भूमिका महत्त्वाची ठरते. त्याविषयी दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांची मते जाणून घेतली.

जोडप्यांमधील संवाद हा एकाच वेळी प्रेमळ, काळजी घेणारा व व्यावहारिक असणे आवश्यक आहे. मानसशास्त्रज्ञ कामना छिब्बर सांगतात, “एकमेकांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देणं हा संवादाचा महत्त्वाचा भाग आहे. एकमेकांवर न चिडता किंवा नाराज न होता, हे सकारात्मकतेनं आपण केलं पाहिजे.”

त्या पुढे सांगतात, “खूप आग्रही असणं महत्त्वाचे आहे; पण ते त्रासदायक ठरू शकतं. संवाद नकारात्मक दृष्टीनं सुरू झाला, तर तो तिथेच संपतो आणि मग संवाद टाळण्यास सुरुवात होते. कोणतंही नातं टिकविण्यासाठी या पैलूंकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे.”

हेही वाचा : शाहरुख खानने वयाच्या ५९ व्या वर्षी सोडले धूम्रपान; जाणून घ्या धूम्रपान सोडण्याचे फायदे

फिटनेस तज्ज्ञ गरिमा गोयल यांनी फिटनेसमधील बदल अंगीकारण्यासाठी सांगितलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे :

ध्येयाची उद्दिष्टांमध्ये मांडणी – तुमचे एकूण फिटनेस ध्येयाची लहान-मोठ्या अशा व्यवस्थित उद्दिष्टांमध्ये मांडणी करा.

वेळापत्रकानुसार दिनचर्या महत्त्वाची – एक ‘वर्कआउट शेड्युल’ तयार करा; जे तुमच्या दैनंदिन दिनचर्येशी जुळेल. पण, त्यात सातत्य राखणे खूप महत्त्वाचे आहे. मग तुम्ही नियमितपणे एखादे शेड्युल फॉलो करू शकता, अशी वेळ निवडा.

आवडीनुसार क्रियाकलाप निवडा- ज्या क्रियाकलापपासून तुम्हाला खरोखर आनंद मिळतो अशा क्रियाकलापांची निवड करा. उदा. सायकलिंग, योगा, पोहणे इत्यादी. तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टी जर तुम्ही करत असाल, तर तुम्हाला व्यायाम करताना आनंद मिळतो.

फिटनेसला प्रोत्साहन देणारा जोडीदार शोधा- जर तुम्ही तुमची फिटनेस उद्दिष्टे एखाद्या व्यक्तीबरोबर शेअर केली, तर ती व्यक्ती तुम्हाला सहकार्य करू शकते किंवा प्रोत्साहन देऊ शकते.

उद्दिष्टपूर्तीनंतर यश साजरे करा- एखादा विशिष्ट टप्पा गाठल्यावर यश साजरे करा आणि स्वत:ला बक्षीस द्या. त्यामध्ये स्वत:ला पौष्टिक जेवण, एक दिवस आराम करा किंवा एखादे वर्कआउट गिअर खरेदी करा.

Story img Loader